Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 Cancer horoscope cancer rashi in marathi

वाचा, कर्क राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवनमंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:09 AM IST

येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती

 • rashifal 2018 Cancer horoscope cancer rashi in marathi

  येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 Cancer horoscope cancer rashi in marathi

  जॉब आणि बिझनेस - नव्या वर्षात नोकरीत फायदा होईल आणि त्यादृष्टीने अनेक संधी उपलब्ध होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. काही नवीन प्रोजेक्टही हाती घ्याल. बिझनेस करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल पण तरीही तुमच्या कामात कुठेही कमतरता राहणार नाही. निराश होऊ नका आणि या वर्षात कोणासोबत पार्टनरशीप करण्याचे टाळा. आर्थिक कामांतील कागदपत्री व्यवहारामध्ये सावधानी बाळगा. नव्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याची घाई करु नका. तुमच्या कामाने अधिकारीवर्ग खुशीत राहील आणि परिणामतः तुम्हाला प्रमोशन मिळण्याचीही दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये होणाऱ्या गॉसिपपासून दूर रहा यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या लाईफ पार्टनरची महत्त्वाची भूमिका राहील. केमिकल, मेडिकल, खनिज आणि टेक्नीकल फील्डशी संबंधित असलेल्या लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. मोठे फायदे होऊ शकतात आणि कामकाजासंबंधित काही दौरेही होऊ शकतात जे तुमच्या हिताचे ठरतील. विदेशी गुंतवणुकीतही तुम्हाला मोठा फायदा होईल. 

 • rashifal 2018 Cancer horoscope cancer rashi in marathi

  आर्थिक स्थिती : आर्थिक स्थितीबाबत हे वर्ष समाधानकारी असेल. एक्सट्रा इनकम होण्याचीही शक्यता आहे. जानेवारीपासून मार्चपर्यंत तुमच्यासाठी पैशांबाबतीत उत्तम वेळ आहे. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक बदल होण्याचेही संकेत मिळत आहेत. शेअर बाजारात केलेली गुंतवणुक अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर राहील. भिन्नलिंगी व्यक्तींकडून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. नोकरीत पगारवाढ होऊ शकते तर दुसरीकडे वडिलोपार्जित संपत्तीमधूनही लाभ मिळेल. मेहनतही जास्त करावी लागेल आणि त्यासाठी खर्चही होऊ शकतो. अशाप्रकारे तुमच्या सेव्हिंगवर परिणाम झालेला दिसून येईल. या दिवसांत कर्ज घेण्याचे टाळा.

 • rashifal 2018 Cancer horoscope cancer rashi in marathi

  कौटुंबिक जीवन : वर्षाच्या सुरुवातीला जोडीदारासोबत होत असलेल्या मतभेदाने त्रस्त व्हाल. तुम्ही कुटुंबाच्या इतर सदस्यांवरही रुबाब दाखवण्याचा प्रयत्न कराल. याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक संबंधावर पडेल पण हळूहळू सर्व काही पुर्वपदावर येईल. कुटुंबात शांतता नांदेल. वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबामध्ये थोडे मतभेद होतील पण या सर्वांवर तुम्ही स्वतःच समाधान शोधून काढाल. कुटुंबातील कोणत्यातरी सदस्याची तब्येत खराब झाल्याने तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. अध्यात्माकडे तुमचा ओढा राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही छोटीशी ट्रीपही काढाल. कुठल्या धार्मिक स्थळीही तुम्ही जाऊ शकता. नवीन वाहन अथवा नवीन घरातही शिफ्ट होऊ शकतात.  एकंदरीत हे वर्ष तुम्हाला खूप चांगले अनुभव देईल. यावर्षी आई-वडिलांसोबत तुमचे चांगले संबंध राहतील पण भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. हे वाद जास्त मनावर घेऊ नका. कोणताही गैरसमज तुमच्याबाबतीत पसरणार नाही याची काळजी घ्या. 

 • rashifal 2018 Cancer horoscope cancer rashi in marathi

  प्रेम आणि दांपत्य जीवन : प्रेमसंबंधासाठी हे वर्ष चांगले राहणार आहे. जर तुम्ही एकमेकांना समजून घ्याल तर तुमचे नाते अजूनच मजबुत होईल. काही सुखद बदलही यादरम्यान घडतील. यावर्षात तुम्ही रोमँटीक डेटवर जात एकमेकांसोबत खूप चांगला वेळ व्यतीत कराल. निसर्गरम्य ठिकाणी फिरायलाही तुम्ही जाऊ शकतात. लव्ह मॅरेज करणाऱ्यांनाही सफलता मिळेल. वर्षाच्या शेवटी एक्सट्रा अफेअरमुळे तुम्ही चिंतीत व्हाल. यामुळे जोडीदारावर संशयही घ्याल. पती-पत्नीच्या संबंधामध्ये या काळात सुधारणा होईल. वर्षाच्या अखेरीस तुम्हाला धोका मिळू शकतो. 

 • rashifal 2018 Cancer horoscope cancer rashi in marathi

  आरोग्य : नवीन वर्षात तुम्हाला कामासोबतच आराम करण्याची गरज आहे. मानसिकदृष्ट्या तुम्हाला थकवा जाणवेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या कामकाजाच्या ठिकाणी जाणवेल. यासाठी तुम्ही काही दिवस सुट्टी घेऊन आराम करण्याची गरज आहे. मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत वेळ घालवा यामुळे तुमच्यात एक नवीन उर्जा येईल. किडनीसंबंधित विकार डोके वर काढतील त्याकडे लक्ष असू द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. 

 • rashifal 2018 Cancer horoscope cancer rashi in marathi

  उपाय 
  - शंकराची उपासना करा 
  - रोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला.
  - शनिवारी अखंड उडदाची डाळ, काळे कपडे, मोहरीचे तेल दान करा.

Trending