Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 Capricorn horoscope makar rashi in marathi

वाचा, मकर राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:03 AM IST

येथे जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती

 • rashifal 2018 Capricorn horoscope makar rashi in marathi

  येथे जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 Capricorn horoscope makar rashi in marathi

  जॉब आणि बिझनेस : जॉब आणि बिझनेसबाबत वर्षाच्या सुरुवातीलाच सावधानता बाळगायला हवी. 3 महिन्यांनंतर कार्यक्षेत्रात स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांनी या वर्षी कोणतीही जोखीम घेऊ नये व घाईने निर्णय घेऊ नयेत. व्यवसाय करणाऱ्यांनीही मोठी गुंतवणूक टाळावी. नोकरी करणाऱ्यांनी विवादांपासून दुर राहण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या मागे तुमच्या विरोधात कट रचण्यात येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अनावश्यक चर्चेपासून दुर राहावे. नाहीतर गोत्यात येण्याची शक्यता आहे. सगळ्यांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. एखादा नवा प्रोजेक्टही मिळण्याची शक्यता आहे. विचार करुनच गुंतवणूक करावी. घाईने निर्णय घेण्यापासून दुरच राहा. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याचा व्यवसायात फायदा होईल. यावर्षी तुमचे उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक मार्ग होऊ शकतात. रेस्टॉरंट, लोखंड, स्टील, कापड आणि आयात-निर्यातीचा उद्योग केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. या वर्षी पार्टनरशीपमध्ये काम करु शकता. एखाद्या महिन्यात तुम्हाला अचानक मोठा लाभ होऊ शकतो. कामकाजासाठी केलेला प्रवासही फलदायी होऊ शकतो. तुमचे कामकाज परदेशाशी नगडित असल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. वित्तीय बाबींबद्दल अधिक सावधानता बाळगावी. कोणत्याही कागदपत्रांवर ते न वाचता स्वाक्षरी करु नये.

 • rashifal 2018 Capricorn horoscope makar rashi in marathi

  आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारावी आणि उत्पन्न वाढावे यासाठी तुम्ही जास्त मेहनत कराल. त्यात तुम्ही काही अंशी यशस्वीही व्हाल. आई-वडिलांची आणि तुमच्या पती अथवा पत्नीची यात तुम्हाला पुर्ण साथ मिळेल. पैशाबाबत विचारपुर्वक निर्णय घ्या, त्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. तुम्हाला यावर्षी उत्तम आर्थिक नियोजन करावे लागणार आहे. तुम्हाला जबाबदारीचे काम मिळू शकते. पण आर्थिक व्यवहार करताना अतिशय काळजी घ्या. ऑक्टोबर महिन्यात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. जसे चालू आहे तसेच चालु राहु द्या. पैशाबाबत हा काळ चढ-उताराचा असेल. नोकरी आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ चांगला नाही. कर्ज देण्यासाठी आणि घेण्यासाठीही हा काळ चांगला नाही. मालमत्तेबाबत या काळात तुम्हाला त्रास होऊ शकतो. खर्च देखील वाढतील. नोकरी करणाऱ्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. पगारात अपेक्षापेक्षा कमीच वाढ होईल. व्यवसायातही जोखीम घेऊ नका. मोठी गुंतवणूक करण्यापुर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. विचारपुर्वकच गुंतवणूक करा.

 • rashifal 2018 Capricorn horoscope makar rashi in marathi

  कौटुंबिक स्थिती : 
  हे वर्ष तुम्हाला संमिश्र राहणार आहे. आध्यात्माकडे तुमचा ओढा असेल. वैवाहिक जीवनात मात्र काहीशा अडचणी येतील. ही स्थिती काही दिवसांसाठीच असेल. त्यानंतर मात्र तुमचे संबंध सुधारतील आणि सर्व काही सुरळित होईल. तुमच्या आर्थिक प्रगतीतही तुमच्या घरातील व्यक्तींचे तुम्हाला सहकार्य लाभेल. विनाकारण शंका घेऊन वाद घालण्याचे मात्र तुम्ही टाळायला हवे. कदाचित त्यामुळे त्यांच्या भावना दुखावतील. यावर्षी आपण नवे घर खरेदी करु शकता. घरात मंगल कार्य घडु शकते. संतान सुःख लाभु शकते. घरातील सगळे सदस्य विशेषत: बहिण आणि भाऊ तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील. वडिलांच्या आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कुटुंबासोबत तुम्ही कदाचित फिरायलाही जाल. 

 • rashifal 2018 Capricorn horoscope makar rashi in marathi

  प्रेम आणि दाम्पत्य जीवन : वैवाहिक जीवन आणि प्रेम-संबंधांसाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या दोघांमधील संबंधात मधुरता येईल. तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. पार्टनरसोबत मतभेद होऊ नयेत याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. एकट्या असणाऱ्यांना लव प्रपोजल मिळेल. तुम्हाला काही लक्षात राहतील असे क्षण तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत अनुभवता येतील. पण तुमचा विवाह होण्यात मात्र अडचणी येतील. विवाहित लोकांच्या जीवनात मात्र सौख्य असेल. काही जणांचे ब्रेकअपसुध्दा होईल. 

 • rashifal 2018 Capricorn horoscope makar rashi in marathi

  आरोग्य : आरोग्याबाबत तुम्हाला यावर्षी विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमची जुनी दुखणी पुन्हा उद्भवू शकतात. अपघात आणि ऑपरेशन होण्याचीही शक्यता आहे. हाडांचे आणि नसेबाबत आजार होऊ शकतात. तणावामुळे डोकेदुखी सारखे आजार होऊ शकतात. स्वत:साठी वेळ काढणे तितकेच महत्वाचे असल्याचे या काळात तुमच्या लक्षात येईल. पाण्यापासून पसरणारे आजारही होऊ शकतात. पोटाचे आजार होण्याची शक्यता असल्याने अन्न सेवन करताना काळजी घ्या. आळस आणि निद्रानाशासारखे आजार अथवा सवयी जडू नयेत याची काळजी घ्या. आपल्या वडिलांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्या. गर्भवती महिलांनी थोडाही निष्काळजीपणा दाखवू नये तो त्यांना महागात पडू शकतो.

 • rashifal 2018 Capricorn horoscope makar rashi in marathi

  उपाय-
  - मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांडाचे पठण करा.
  - हनुमान मंदिरात लाल झेंडा अर्पण करावा.
  - पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.

Trending