राशीफळ 2018 - / राशीफळ 2018 - जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे राहील नवीन वर्ष

राशीफळ 2018 - जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे राहील नवीन वर्ष.राशीफळ 2018 - जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे राहील नवीन वर्ष.

जीवन मंत्र डेस्क

Jan 01,2018 10:09:00 AM IST

2018 मध्ये 12 पैकी 5 राशीचे लोक भाग्यशाली राहतील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अपेक्षापेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. काही लोक जॉब स्विच करू शकतात. बिझनेसमध्ये अचानक धनलाभ होण्याची शक्यता. या व्यतिरिक्त काही लोकांसाठी नवीन वर्ष अडचणी निर्माण करणारे ठरू शकते. या वर्षात काही अविवाहित लोक लग्न बंधनात अडकू शकतात. याउलट 2018 हे वर्ष काही लोकांच्या लव्ह-लाईफमध्ये चढ-उतार निर्माण करणारे राहू शकते.


येथे जाणून घ्या, तुमच्या जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राही तुमच्यासाठी यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


पुढील स्लाईड्सवर वाचा, राशीनुसार 2018 चे संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

मेष जॉब आणि बिझनेस : जॉब आणि बिझनेससाठी या वर्षी मे पासून नोव्हेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला मानला जाऊ शकतो. या काळात सॅलरी आणि पद वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही यश प्राप्त होऊ शकते. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. परंतु कामाचा ताणही तुमच्यावर राहील. तुम्ही आर्ट, फायनान्स, मीडिया, प्रिंटिंग, टुरिझम, संगीत, फॅशन डिझाईन किंवा सौंदर्य उत्पादनाशी संबंधित क्षेत्रामध्ये असल्यास तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. तुम्ही एखाद्या नवीन बिझनेसमध्ये पैसा गुंतवू शकता त्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्यावा. स्थावर मालमतेशी संबंधित कामामध्ये सावध राहावे. कामामध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये चांगल्या कामामुळे तुमचे कौतुक होईल यासोबतच सोबत काम करणारे काही लोक तुमचा द्वेष करू शकतात. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी या वर्षात मोठे फायदे होऊ शकतात. नोकरदार आणि व्यापारी दोघांसाठीही हे वर्ष उत्तम राहील. आर्थिक स्थिती : वर्षाच्या मधल्या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहील. शेअर मार्केटमधून चांगला रिटर्न मिळेल, परंतु लॉटरी आणि सट्टा बाजारापासून तुम्ही दूर राहावे. आर्थिक व्यवहारामध्ये सावध राहावे. या वर्षात तुम्ही चांगली फायनान्शिअल प्लॅनिंग करू शकता. उत्पन्नाचे नवीन सोर्स मिळतील. या वर्षात फायद्यासोबतच खर्चही वाढू शकतो. ऑक्टोबर महिन्यात तुम्ही जरा जास्तच सावध राहण्याची आवश्यकता आहे. वर्षातील इतर महिन्यांमध्ये उत्पन्न चांगले राहील. या वर्षात तुम्ही एखादे लोन घेण्याचा विचार कराल. नवीन वर्षात नवीन घर खरेदीचा मूड होईल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला काही खास लोकांची मदत मिळू शकते. या वर्षात तुम्हाला इतरांना दिलेले उसने पैसे परत मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक स्थिती : या वर्षात कौटुंबिक गोष्टींमध्ये काहीसा तणाव राहू शकतो. कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. कुटुंबासाठी फार कमी वेळ काढू शकाल. प्रवासाचे योग जुळून येत आहेत. कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचे प्लॅनिंग करू शकता. कुटुंबात एखाद्या गोष्टीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आई-वडीलांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. या वर्षात तुमचा समजूतदारपणा वाढेल, तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थितीपणे पार पाडाल. आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या जातकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही सकारात्मक राहणे आवश्यक आहे. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : या वर्षात तुम्ही प्रेम संबंधामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. पार्टनरची एखादी गोष्ट किंवा सवय तुम्हाला आवडणार नाही. अहंकारामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. क्रोधापासून दूर राहावे. लग्न झालेल्या लोकांनी एक्स्ट्रॉ अफेअरपासून दूर राहावे. या काळात काही नवीन रिलेशन निर्माण होऊ शकतात. मे पासून नोव्हेंबरपर्यंतचा काळ लव्ह-लाईफसाठी चढ-उताराचा राहील. या वर्षात लव्ह-लाईफला लग्नामध्ये बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. तुम्ही एखाद्याला पसंत करत असाल आणि प्रपोज करण्याची इच्छा असल्यास मार्चपासून मेपर्यंतचा काळ यासाठी खास राहील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराच्या आरोग्यामध्ये चढ-उताराची स्थिती राहील. बिझनेसमध्ये आपल्या पार्टनरची मदत करा, यामुळे फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत रोमँटिक आणि अविस्मरणीय प्रवासाचे योगही जुळून येत आहेत. आरोग्य : आरोग्याच्या बाबतीत वर्षातील सुरुवातीचे 3 महिने सावध राहणे आवश्यक आहे. आहारात हलगर्जीपणामुळे तुम्ही तब्येत नाजूक होत चालली आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. झेपत नसलेल्या कामामध्ये रिस्क घेऊ नये, जखम होण्याची शक्यता आहे. आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या वर्षात तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल आणि डायजेशनसंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. काम जास्त असल्यामुळे तणाव वाढू शकतो. झोपेची कमतरता जाणवू शकते. बदलत्या वातावरणामुळे छोटे-छोटे आजार, उदा सर्दी-पडसे, खोकला होण्याची शक्यता आहे. या वर्षात तुम्ही व्यसनापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. गर्भवती महिलांनीसुद्धा आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उपाय; - मंगळवारी श्वानाला गोड पुरी खाऊ घालावी. - शनिवारी हनुमान मंदिरात शेंदूर अर्पण करावा. - लहान मुलांना चॉकलेट द्यावेत.वृषभ जॉब आणि बिझनेस : या वर्षी नोकरदारांनी थोडे सबुरीने घ्यावे. अधिकारी-वरिष्ठांसोबत वाद टाळावे. विनाकारण एखाद्या गोष्टीवरुन वाद घालू नये. या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. याकाळात वरिष्ठांचे तुमच्याकडे विशेष लक्ष राहाण्याची शक्यता आहे. नव्या जॉबच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी चांगला काळ आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. बिझनेस करणाऱ्यांनी देव-घेवीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. या वर्षी तुम्हाला हळु-हळु फायदा होण्याची शक्यता आहे. नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा. शेअर, सट्टा, कमोडिटी बिझनेस करणाऱ्यांनी आर्थिक नुकसानीचा योग आहे. नोकरदार वर्गासाठी यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानचा काळ चांगला राहाणार आहे. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याचा संभव आहे. नोकरी प्रमोशनसाठी तुम्हाला थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या कामातील सातत्य आणि रचनात्मक कार्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकू शकता. त्याचेवळी याच काळात काही वादांशी तुमचे नाव जोडले जाईल. ऑफिस पॉलिटिक्सचे तुम्ही शिकार होऊ शकता. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सावध राहा. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. वादांपासून जेवढे दूर राहाता येईल तेवढे दूर राहा. आर्थिक स्थिती : आर्थिक स्थितीसाठी वर्षाच्या सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारणच्या खर्चावर कंट्रोल करा. आर्थिक चणचण निर्माण झाल्यास कुटुंबात वाद संभवतील. या वर्षाच्या मध्यात पैसे कमावण्याच्या तुम्हाला खूप संधी उत्पन्न होतील. दुसरीकडे ग्रहांची दशा सांगते की वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरनंतर तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. उत्पन्न देखील वाढेल. कामानिमित्त केलेला प्रवास फलदायी ठरेल. या वर्षी तुमचा अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रॉपर्टीसंबंध प्रकरणात गुंतवणुकीची संधी मिळेल. प्रॉपर्टीची काही प्रकरणे फायद्याची ठरु शकतात. कौटुंबिक स्थिती : यावर्षी जरा विचारपूर्वक बोला. तुमच्या एखाद्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. जानेवारीमध्ये कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतो. वर्षाचे पहिले 3 महिने कृशल आहेत. थोडे सांभाळून राहा. या काळात कोणी तुम्हाला वरचढ ठरण्याचा प्रयत्न करेल. यावर्षी कुटुंबासोबत कुठे फिरायला जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो. या प्रवासामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा आणि बाऊंडिग चांगली होऊ शकते. नाते अधिक घट्ट होईल. याशिवाय पार्टनरसोबत तुम्ही एखाद्या धार्मिक स्थिळीही जाऊ शकता. परिवारातील काही मंगलकार्य होण्याचाही योग आहे. कुटुंबात शांती आणि धन लाभ होण्यासाठी पुजा-पाठ केले जाऊ शकतात. यावर्षी कुटुंबातील काही मोठे आणि महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. यावर्षी काही खास कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पार्टनरची साथ मिळेल. वर्षाच्या याच काही महिन्यात तुम्हा भाऊ-बहीण यांचीही मदत मिळू शकते. कुटुंबात कोणी नवीन सदस्यही येऊ शकतो. संबंधांमध्ये सुधारणा होण्याचा योग आहे. आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : यावर्षी तुमच्या लव्ह-लाइफमध्ये तिसऱ्या व्यक्तीला ढवळाढवळ करु देऊ नका. यावर्षी तुमच्या पार्टनरचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस यादगार होऊ शकतो. लव्ह-लाइफमधील एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. सोबत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोजही करु शकता. यावर्षी लव्ह लाइफला विवाहात रुपांतरती करण्यात यश मिळू शकते. प्रेमी युगुलांसाठी हे वर्ष चांगले राहाणार आहे. यावर्षी तुम्ही एकमेकांसोबत अधिकाधिक काळ घालवू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत सोशल मीडिया आणि संपर्काच्या इतर माध्यमाने संपर्कात राहू शकता. प्रिय व्यक्तीसोबतच्या सततच्या भेटीने नाते अधिक दृढ होण्यास मदत मिळेल. वास्तविक वर्षाचे शेवटचे 2 महिने लव्ह-लाइफसाठी त्रासदायक राहातील. लव्ह-लाइफमध्ये पार्टनरवर संशय घेऊन दोघांमध्ये दुरावा वाढू शकतो. बोलताना थोडे सांभाळून बोलावे आणि धिराने घ्यावे. घाईत काम बिघडू शकते. आरोग्य : वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. या दिवसांमध्ये वाहन सावकाश चालवा. मशीनवर काम करत असाल तर सांभाळून काम करा. दुखापत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कामाच्या दबावातून थोडा आराम मिळावा यासाठी विश्रांती घेऊ शकता. काही दिवासांसाठी सुटी घेऊ शकता. जुन्या आजाराने ग्रस्त लोकांनी थोडी सावधगिरी बाळगा. या राशीचे काही लोक पोटाचे विकार आणि निद्रा दोषाने त्रस्त राहू शकतात. काहींना लठ्ठपणाचा त्रास संभवतो. यामुळे तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये बदल करा. यावर्षी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा. तुमच्या पार्टनरची तब्यत नाजूक राहू शकते. झोप न लागणे आणि डोकेदुखीचा त्रास संभवतो. पार्टनरच्या प्रकृतीची काळजी घ्या. यावर्षी तुमच्या तब्येतीमध्ये चढ-उतार सुरु राहातील. यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. सर्दी-खोकला-ताप, ब्लड प्रेशर आणि ह्रदया संबंधी त्रास होऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेत चला. विशेषतः एप्रिल आणि ऑक्टोबर दरम्यान विशेष काळजी घ्या. या दिवसांमध्ये मानसिक शांती भंग होऊ शकते. सोबतच खाण्या-पिण्यावर लक्ष ठेवा. योग्यवेळी आराम करा. उपाय - शुक्रवारी तांदुळ दान करा. - लक्ष्मीला पांढरी आणि पिवळी फुले चढवा. - केसरी-चंदन तिलक लावत जा.मिथून जॉब आणि बिझनेस : यावर्षी अधिकारी आणि सोबत काम करणाऱ्यांकडून मदत मिळू शकते. हे लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. या वर्षी मिथून राशीच्या नोकरदार लोकांना मोठे यश मिळण्याचे योग आहेत. तुमची एखादी आयडिया कंपनी किंवा सरकारला कामाची ठरू शकते. नोकरी स्वीच करण्याची इच्छा असलेल्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. या वर्षी चांगले ऑप्शन उपलब्ध होतील. प्रमोशनची शक्यता आहे. सॅलरी वाढण्याचे योग आहेत. मनासारखी ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. राशी स्वामी बुधच्या प्रभावाने तुम्ही घतलेले मोठे निर्णय फायद्याचे ठरतील. तुमच्या कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल होतील. या वर्षी तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडाल. नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठे बदल झाल्याचे दिसून येईल. पण मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. विचारपूर्वक पैसे गुंतवा. बिझनेस पार्टनरसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. पण लवकरच मनभेद दूर होतील. व्यवसाय वाढण्यासाठी योग्य कालावधी आहे. विदेशातील व्यवसायात फायदा होईल. दूर असलेल्या लोकांकडून बिझनेसमध्ये मदत होईल. याचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती : ऑक्टोबर २०१८ पर्यंत आर्थिक स्थिती चांगली राहिल. नवीन इन्कम सोर्स मिळतील. त्यातून उत्पन्न वाढेल. जुनपासून ऑक्टोबरपर्यंत आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा वाढेल. इन्क्रीमेंट होईल. बिझनेसमध्ये थांबलेला पैसा मिळेल. लॉटरीतून चांगली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल. या दरम्यान तुम्ही स्टील, कपडे, ब्युटी प्रोडक्ट, मिल्क प्रोडक्ट आणि पर्यटन याच्याशी निगडित व्यवसायात पैसे गुंतवल्याने फायदा होईल. लेन-देन आणि गुंतवणुकीत थोडी सावधता बाळगा. एखाद्या विश्वास माणूस तुमचा विश्वासघात करु शकतो. जोखिम असलेली गुंतवणूक टाळा. अनुभवी लोकांचा सल्ला जरुर घ्या. कौटुंबिक स्थिती : कौटुंबिक प्रकरणांमध्ये हे वर्ष तुमच्यासाठी फायदा-तोट्याचे राहू शकते. कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबासोबत वेळ घालविण्यासाठी कमीच संधी मिळेल. पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. या वर्षी तुम्ही जुने वाद सोडविण्यासाठी बसून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न कराल. यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कामकाज जास्त असल्याने वर्षाचे काही महिने कुटुंबापासून दूर राहू शकता. कुटुंबातील सदस्यांमध्ये मनमुटाव होऊ शकतो. त्याने तणाव वाढेल. सामाजिक कार्य़ांमुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. संतान प्राप्ती होण्याची शक्यता आहे. घरी धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. हळूहळू कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम वाढण्याची शक्यता. या वर्षी पिढीजात संपत्तीशी संबंधित असलेला वाद सुटण्याची शक्यता. तुम्ही नवीन फ्लॅट किंवा फ्लॉट विकत घेऊ शकता. पार्टनर आणि मुलांना खुश करण्यासाठी गिफ्ट आणि दागिने विकत घेऊ शकता. या वर्षी तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणखी मजबूत होईल. नवीन लोकांच्या संपर्कात येणार. भावांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होणार. आईवडीलांचे सहकार्य़ लाभणार. प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह मॅरेज करणाऱ्यांसाठी हे शुभ वर्ष आहे. आईवडीलांचा होकार मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरसोबत बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. या वर्षी मिथून राशीच्या लोकांना लव्ह प्रपोजल मिळू शकतात. पती-पत्नीचे संबंध सुधारतील. पार्टनरसाठी महागडे गिफ्ट विकत घेणार. तुम्ही तुमची लव्ह लाईफ आणखी रोमॅंटिक करण्यात यशस्वी व्हाल. या राशीच्या सिंगल लोकांच्या लाईफमध्ये एखादे विघ्न येऊ शकते. या शिवाय तुम्ही एखाद्याला पसंत करता आणि प्रपोज करण्याची शक्यता आहे तर काही काळ वाट बघावी लागेल. लव्ह लाईफ आणि दांपत्य जीवनासाठी वर्षाचे पहिले ४ महिने सावधान राहावे लागेल. या महिन्यात लव्ह लाईफशी निगडित कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा अफेरपासून दूर राहा. आरोग्य : तुमच्या प्रकृतीत संपूर्ण वर्ष उतार-चढाव दिसून येईल. प्रकृतीबाबत हे वर्ष तुमच्यासाठी काही खास नाही. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. अन्यता पुढे मोठे संकट उद्भवू शकते. या कारणाने कार्यस्थळी तुमचे मन रमणार नाही. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये प्रकृतीच्या प्रकरणांमध्ये सावधान राहावे लागेल. गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यंतरी लठ्ठपणा किंवा जुना आजार उफाळून येऊ शकतो. डायबिटिज आणि ब्लड प्रेशनचा त्रास जाणवू शकतो. स्कीनसंबंधी समस्या भेडसावू शकते. लिव्हर आणि पोटाच्या इतर भागांमध्ये समस्या होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवले नाही तर मानसिक आजार वाढू शकतात. अनिद्रा, डोके आणि डोळ्यांचे दुखणे होऊ शकते. वेळोवेळी चेकअप करा. तुम्ही पेशंट आहात तर सतर्क राहणे आवश्यक आहे. उपाय- - बुधवारी गणेश मंदिरात लाडू अर्पण करा. - किन्नरांचा आशिर्वाद घ्या. - रविवारी भैरव मंदिरात दूध अर्पण करा.कर्क जॉब आणि बिझनेस - नव्या वर्षात नोकरीत फायदा होईल आणि त्यादृष्टीने अनेक संधी उपलब्ध होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. काही नवीन प्रोजेक्टही हाती घ्याल. बिझनेस करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल पण तरीही तुमच्या कामात कुठेही कमतरता राहणार नाही. निराश होऊ नका आणि या वर्षात कोणासोबत पार्टनरशीप करण्याचे टाळा. आर्थिक कामांतील कागदपत्री व्यवहारामध्ये सावधानी बाळगा. नव्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याची घाई करु नका. तुमच्या कामाने अधिकारीवर्ग खुशीत राहील आणि परिणामतः तुम्हाला प्रमोशन मिळण्याचीही दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये होणाऱ्या गॉसिपपासून दूर रहा यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या लाईफ पार्टनरची महत्त्वाची भूमिका राहील. केमिकल, मेडिकल, खनिज आणि टेक्नीकल फील्डशी संबंधित असलेल्या लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. मोठे फायदे होऊ शकतात आणि कामकाजासंबंधित काही दौरेही होऊ शकतात जे तुमच्या हिताचे ठरतील. विदेशी गुंतवणुकीतही तुम्हाला मोठा फायदा होईल. आर्थिक स्थिती : आर्थिक स्थितीबाबत हे वर्ष समाधानकारी असेल. एक्सट्रा इनकम होण्याचीही शक्यता आहे. जानेवारीपासून मार्चपर्यंत तुमच्यासाठी पैशांबाबतीत उत्तम वेळ आहे. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक बदल होण्याचेही संकेत मिळत आहेत. शेअर बाजारात केलेली गुंतवणुक अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर राहील. भिन्नलिंगी व्यक्तींकडून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. नोकरीत पगारवाढ होऊ शकते तर दुसरीकडे वडिलोपार्जित संपत्तीमधूनही लाभ मिळेल. मेहनतही जास्त करावी लागेल आणि त्यासाठी खर्चही होऊ शकतो. अशाप्रकारे तुमच्या सेव्हिंगवर परिणाम झालेला दिसून येईल. या दिवसांत कर्ज घेण्याचे टाळा. कौटुंबिक जीवन : वर्षाच्या सुरुवातीला जोडीदारासोबत होत असलेल्या मतभेदाने त्रस्त व्हाल. तुम्ही कुटुंबाच्या इतर सदस्यांवरही रुबाब दाखवण्याचा प्रयत्न कराल. याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक संबंधावर पडेल पण हळूहळू सर्व काही पुर्वपदावर येईल. कुटुंबात शांतता नांदेल. वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबामध्ये थोडे मतभेद होतील पण या सर्वांवर तुम्ही स्वतःच समाधान शोधून काढाल. कुटुंबातील कोणत्यातरी सदस्याची तब्येत खराब झाल्याने तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. अध्यात्माकडे तुमचा ओढा राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही छोटीशी ट्रीपही काढाल. कुठल्या धार्मिक स्थळीही तुम्ही जाऊ शकता. नवीन वाहन अथवा नवीन घरातही शिफ्ट होऊ शकतात. एकंदरीत हे वर्ष तुम्हाला खूप चांगले अनुभव देईल. यावर्षी आई-वडिलांसोबत तुमचे चांगले संबंध राहतील पण भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. हे वाद जास्त मनावर घेऊ नका. कोणताही गैरसमज तुमच्याबाबतीत पसरणार नाही याची काळजी घ्या. प्रेम आणि दांपत्य जीवन : प्रेमसंबंधासाठी हे वर्ष चांगले राहणार आहे. जर तुम्ही एकमेकांना समजून घ्याल तर तुमचे नाते अजूनच मजबुत होईल. काही सुखद बदलही यादरम्यान घडतील. यावर्षात तुम्ही रोमँटीक डेटवर जात एकमेकांसोबत खूप चांगला वेळ व्यतीत कराल. निसर्गरम्य ठिकाणी फिरायलाही तुम्ही जाऊ शकतात. लव्ह मॅरेज करणाऱ्यांनाही सफलता मिळेल. वर्षाच्या शेवटी एक्सट्रा अफेअरमुळे तुम्ही चिंतीत व्हाल. यामुळे जोडीदारावर संशयही घ्याल. पती-पत्नीच्या संबंधामध्ये या काळात सुधारणा होईल. वर्षाच्या अखेरीस तुम्हाला धोका मिळू शकतो. आरोग्य : नवीन वर्षात तुम्हाला कामासोबतच आराम करण्याची गरज आहे. मानसिकदृष्ट्या तुम्हाला थकवा जाणवेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या कामकाजाच्या ठिकाणी जाणवेल. यासाठी तुम्ही काही दिवस सुट्टी घेऊन आराम करण्याची गरज आहे. मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत वेळ घालवा यामुळे तुमच्यात एक नवीन उर्जा येईल. किडनीसंबंधित विकार डोके वर काढतील त्याकडे लक्ष असू द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. उपाय - शंकराची उपासना करा - रोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला. - शनिवारी अखंड उडदाची डाळ, काळे कपडे, मोहरीचे तेल दान करा.सिंह जॉब आणि बिझनेस : यावर्षी कार्यक्षेत्रात अपोझिट जेंडर असलेल्या लोकांसोबत मैत्रीचे संबंध बनवण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कार्यस्थळी तुमचा मान वाढेल. यंदाच्या वर्षी तुम्हाला उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा योगदेखील आहे. ऑफिसमध्ये चालणा-या गॉसिपिंगपासून लांब राहा. वर्षातील पहिले दोन महिने तुम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यावर्षभरात कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागले, त्यामुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवू शकतो. थकव्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमेतवर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला विश्रांती घेणे गरजेचे असेल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही लोकांची मदत मिळू शकते. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये बिझनेस केला, तर जास्त फायदा होऊ शकतो. आयात-निर्यात, ट्रान्सपोर्ट, संचार याच्याशी निगडीत व्यवसाय केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. अचानक आलेली संधी तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकेल. प्रॉपर्टी, संचार, कपडे, रेस्तराँ, बेकरी, इलेक्ट्रिक यांच्याशी निगडीत व्यक्तांनी फायदा होण्याचा योग आहे. एकंदरीत हे वर्ष करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरेल. आर्थिक स्थिति : सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक स्थैर्यता देणारे आहे. वर्षभर तुम्हाला आर्थिक चणचण जाणवणार नाही. अडकलेला पैसा याकाळात परत मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याचा योग आहे. शेअर,कमोडिटी किंवा एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. जमीनत गुंतवणुक करण्याचे योग आहेत. सेविंग वाढू शकते. प्रमोशनसोबत पगारात वाढ होईल. मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक करणे योग्य ठरेल. विदेशी व्यापारातूनसुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती विकून नवीन घर खरेदी करण्याचे योग दिसतात. एक्स्ट्रा इनकम करण्यात यशस्वी व्हाल. उधार पैसे देताना सावधगिरी बाळगा. उत्साहात गुंतवणूक करण्यापासून स्वतःला रोखा. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक स्थिती : यावर्षी कुटुंबाची तुम्हाला चांगली साथ लाभेल. आईवडिलांच्या आशीर्वादाने विचारात असलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत नात्यात आणखी मधुरता वाढेल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रा कराल. कुटुंबात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. बहीणभावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. यावर्षभरात कामाच्या निमित्ताने काही काळ तुम्हाला कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. घरगुती उपयोगाच्या वस्तूंची खरेदी कराल. प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणात फायदा होऊ शकतो. नवीन घर खरेदी करण्याचे योग आहेत. प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह लाइफमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. प्रियकर-प्रेयसीचे किंवा पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. विचार पटत नसल्याने नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. आक्रमक होऊ नका. ही अनबन फार काळ टिकणार नाही, लवकरच तुमच्यातील मतभेद दूर होऊन नाते पुर्वपदावर येऊल. यावर्षी सिंगल असलेल्यांच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळतील. विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहायला हवे. एक्स्ट्रा अफेअरची स्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्य : आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. क्षमतेपक्षा अधिक कष्ट केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम घडू शकतो. जीवनशैलीत बदल करुन खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवात. अधिक मसालेदार पदार्थ खाणे टाळा. आळस टाळा आणि कामावर लक्ष केंद्रिक करा. सिंह राशीच्या लोकांना डोकेदुखी आणि टोंगळ्यांचे दुखण्याचा त्रास जाणवू शकतो. हा त्रास तुम्हाला वर्षभर राहू शकतो. गळा आणि पोटाच्या संदर्भातील तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे तब्येतीकडे विशेष लक्ष असू द्या. बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः जुन-जुलै आणि सप्टेंबर महिन्यात अधिक काळजी घ्या. गर्भवती महिलांनी जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. उपाय- - सुर्याला जल अर्पण करा. - लाल कपड्यांत गहू दान करा. - रविवारी मीठ खाऊ नका. सपक जेवण करा.कन्या जॉब आणि बिझनेस : या वर्षी कन्या राशीचे काही लोक नोकरी बदलू शकता. यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला यापेक्षा चांगले ऑप्शन मिळू शकतात. नोकरी करणा-या लोकांच्या कामात येणारे अडथळे हळुहळू दूर होऊ शकतात. कधी-कधी कामावरुन तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली राहिल. कार्यस्थळावर तुमचे काम खुप चांगले राहिल. या वर्षी काही दिवस कन्या राशीच्या लोकांना मेहनतीच्या हिशोबाने योग्य फळ मिळू शकणार नाही. यामुळे तुम्ही चिंतित होऊ शकता. धीर ठेवा आणि पुढे जा. लवकरच योग्य वेळ येईल. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, हा ग्रह बुध्दि आणि व्यापाराचा कारक आहे. बुधाच्या प्रभावाने नवीन व्यापार आणि कमासंबंधीत केलेल्या प्रवासात फायदा होऊ शकतो. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर चांगल्या सॅलरीसोबत प्रमोशन मिळू शकते. प्रिटिंग, कपडे किंवा स्टीलसंबंधीत काम करत असाल तर मोठे फायदे मिळतील. एकंदरीत करियरच्या हिशोबाने हे वर्ष चांगले राहिल. आर्थिक स्थिती : तुमची आर्थिक स्थिती यावर्षी चांगली राहिल. नोकरी करणा-या लोकांची इनकम वाढू शकते. कामासंबंधीत प्रवासाचा योग जुळत आहे. विदेश यात्राही होऊ शकते. यावर्षी सेविंग वाढवण्यात तुम्ही यशस्वी ठरु शकता. जानेवारीमध्ये तुमचा फायदा वाढू शकतो. स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. नवीन व्यापार सुरु करण्यासाठी दिवस चांगला आहे. यामध्ये तुम्हाला फायदा होईल. जोखिम असलेल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे टाळावे. तसेच वर्षाच्या मधल्या काळात कुटूंबासोबत प्रवास करण्याचे योग आहेत. यामध्ये खर्च वाढू शकतो. बिझनेसमध्ये अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन पुढे चला. देवाण-घेवाण आणि हिशोब सावधगिरीने करा. एखादा विश्वासू व्यक्ती धोका देऊ शकतो. कौटूबिक स्थिती : या वर्षी कुटूंबातील लोकांसोबत वादविवाद करणे टाळावे. एखाद्या गोष्टींवरुन वाद असेल तर एकत्र बसून शांतते मिटवून घ्या. कुटूंबासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करा. या काळात कुटूंबातील लोक एकमेकांसोबत वेळ घालवतील. यामुळे कुटूंबातील लोकांमध्ये होणारे वाद दूर होऊ शकतात आणि प्रेम वाढू शकते. या काळात तुम्ही धार्मिक कार्यांचे नियोजन कराल. संसारीक जीवनासाठी वेळ चांगला आहे, काही वादांमुळे अडचणी येऊ शकतात. समाजिक स्थान वाढवण्यासाठी सुवर्ण संधी मिळतील. काम जास्त असल्यामुळे तुम्ही थोडावेळ चिंतित होऊ शकता. तर ऑक्टोबर महिन्यात पार्टनरची प्रकृती खराब होऊ शकते. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह लाइफसाठी हा काळ कंफ्यूजन असणारा आहे. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. गैरसमजांमुळे पार्टनरसोबत ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दोघं एकमेकांना खुप काही ऐकवाल. तुम्ही या गोष्टींवर लक्ष न देता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपला राग कंट्रोल करा. जोडीदारासोबत बोलत असताना धीर ठेवा आणि शांततेत बोला. फेब्रूवारीनंतर संबंधांमध्ये गोडवा येईल. पार्टनरसोबत फिरायला जाऊ शकता. तुम्ही अविवाहित आहात आणि एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर करु शकता. तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल. पति-पत्नीच्या संबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात. कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. कोणताही निर्णय आपल्या मनाने घ्या. आरोग्य : कन्या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याला प्रायोरिटी द्यावी. खराब रुटीन लाइफमुळे आरोग्यासंबंधीत अडचणी येऊ शकतात. जॉइंट पेन, इनडायजेशन आणि डोकेदुखीची शक्यता आहे. खराब आरोग्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. वर्षाच्या मधल्या काळात तुमचा जोश आणि उत्साह कमी होऊ शकतो. कामात मन लागणार नाही. झोप पुर्ण न झाल्यामुळे थकवा जाणवेल आणि तुम्ही आक्रमक होऊ शकता. वाहन काळजीपुर्वक चालवा. जखमी होण्याचे योग आहेत. घर आणि घराबाहेर दोन्हीही ठिकाणी सावध रहा. हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या समस्या असणा-या लोकांनी नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलांच्या आरोग्यावर लक्ष द्या. आपल्या रुटीनमध्ये बदल करा. उपाय - गायीला पोळी खाऊ घाला. - हनुमनाला दिवा लावा. - नागरमोथाचे मुळ धारण करा.तुळ जॉब आणि बिझनेस : नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुमचे कसोशीने प्रयत्न असतील. तुम्हाला पुढे जाण्याच्या नव्या संधीही मिळतील आणि त्यांचास फायदाही होईल. प्रमोशनच्या रुपात तुम्हाला कष्टाचे फळ मिळू शकते. पगार वाढण्याचे योगही आहेत. अधिकारीही तुमची मदत करतील. कमी काळात तुमचा प्रगती होऊ शकते. तुमच्या यशामुळे तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांमध्ये ईर्ष्यादेखिल निर्माण होऊ शकते. पण तुमचे लक्ष केवळ कामावर असायला हवे. बोलण्यावर लक्ष ठेवा. वादांमुळे कामाच्या ठिकाणी वातावरण बिघडण्याचीही शक्यता आहे. व्यावसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष अचानक मिळालेल्या फायद्याचे ठरू शकते. करिअरमध्ये काही खास बदलही होऊ शकतात. उत्पन्नही चांगले मिळू शकेल. कामकाजात तुम्ही काहीतरी नवे करण्याच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकता. यावर्षी कमाईचे नवीन मार्गही सापडतील. विदेशवारी होण्याचीही शक्यता आहे. आर्ट्स, बॉलिवूड, डिझायनिंग, फॅशन, आर्किटेक्ट, प्रिटिंग, मीडिया आणि कॉस्मेटिकशी संलग्न व्यवसायाला मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती : यावर्षी आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अक्टूबर 2018 मध्ये तुम्ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अधिक परिश्रम घ्याल. जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ आर्थिक स्थितीसाठी चांगला आहे. या काळात कमाई अचानक वाढू शकते. नव्या व्यवसायात गुंतवणुकीचे नियोजनही करू शकता. त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्लाही नक्की घ्या. जुने कर्ज असेल त्याची फेडही करू शकाल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. शेयर मार्केट आणि कमोडिटीशी संबंधित लोकांना अपेक्षेपेक्षा अधिक फायदा होऊ शकतो. इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या मदतीनेही धन लाभ होण्याचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांचे पगार आणि पद दोन्ही वाढू शकते. नोकरी बदलायची इच्छा असेल तर काही चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात. वर्षाच्या मध्यापर्यंत आणि सप्टेंबरपर्यंत तुम्ही सुख सुविधांवर अधिक खर्च करू शकता. फालतू खर्च झाल्याने तणावही निर्माण होऊ शकतो. फालतू खर्च झाल्यास तणावही वाढू शकतो. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगायला हवी. वादांची शक्यता निर्माण झाली आहे. प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणात घाई केल्यास नुकसान होऊ शकते. कौटुंबीक स्थिती : कौटुंबीक जीवनासाठी हे संपूर्ण वर्ष संमिश्र असू शकते. वर्षाच्या सुरुवातीला उत्साह जास्त असेल. यादरम्यान तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही जास्त असेल. हळू हळी काही कौटुंबीक कारणांमुळे तुमचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. अनेक बाबतीत तुम्हाला वाटते तसे घडणार नाही. कारण लाईफ पार्टनरबरोबर काही वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. विचार करून बोला. कुटुंबातील कोणाला वाईट वाटेल असे काहीही बोलणे टाळा. नात्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. वैवाहिक आणि गृहस्थ जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वाद टाळा. व्यस्त वेळापत्रकामुळेही कुटुंबातील वातावरण बिघडू शकते. तुमच्या कुटुंबालाही कमी वेळ देऊ शकाल. याकाळात कुटुंबाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असेल. मुले आणि लाईफ पार्टनरला वेळ देण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाबरोबर विदेशवारीचे योगही आहेत. घरात एखाद्या शुभकार्याचे आयोजन करू शकता. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : प्रेम प्रकरणांमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण घाबरू नका. हे होईल ते चांगलेच होईळ. या वर्षातील तीन महिन्यांनंतर तुमच्या साथीदाराबरोबर चांगला काळ असेल. नात्यात गोडवा वाढेल. साथीदारासाठी महागडे गिफ्टही खरेदी करू शकता. वर्षाच्या अखेरच्या महिन्यांत लव्ह लाईफसाठी अधिक चांगला काळ असेल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरू शकते. संतानप्राप्ती होईल. अविवाहित लोकांचे विवाह होऊ शकतात. मनाप्रमाणे लग्नाचे योगही आहेत. एखाद्याकडे आकर्षित असाल किंवा प्रेम करत असाल तर प्रपोज करू शकता. त्यासाठी चांगला काळ आहे. पार्टनरशी बोलताना सावध राहावे लागेल. आरोग्य : यावर्षी खाण्या पिण्याच्या सवयी बदलायला हव्या. स्वतःवर लक्ष द्यावे लागेल. तेल-मसाला आणि जास्त तिखट जेवण टाळा. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागेल. बेपर्वाईमुळे त्रास आणि जुने आजार पुन्हा बळावू शकतात. जखमी होण्याचीही शक्यता आहे. उपकरण किंवा गाडी चालवताना सावध राहा. डोळ्यांशी संबंधित त्रासही होऊ शकतो. चष्मा असेल तर नंबर वाढू शकतो. लहान ऑपरेशन होण्याचीही शक्यता आहे. हृदय आणि लिव्हरसंबंधी त्रासापासून सावध राहावे लागेल. कामातून आरामासाठीही वेळ काढावा लागेल. जास्त कामामुळे थकावट होऊ शकते. नस किंवा त्वचेशी संबंधीत त्रास होण्याची शक्यता आहे. याचवर्षी बॅकपेन आणि सांध्यांच्या आजारामुळे त्रास होऊ शकतो. उपाय - लक्ष्मीमातेला पांढरे फूल अर्पण करा. - पुरुषांनी स्त्रीला आणि स्त्रीने पुरुषाला अत्तर किंवा डिओ गिफ्ट करावा - मंदिरात तांदूळ दान करा.वृश्चिक जॉब आणि बिझनेस : यश आणि उत्पन्न वृद्धीसाठी आपल्याला यंदा जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये आपल्यावर जळणारे सहकारी असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. वेळ किती मौल्यवान आहे, हे समजून कामाच्या वेळेत कामच करा. वृश्चिक राशीतील लोकांना बिझनेसच्या वृद्धीसाठी प्रवासाचे योग आहेत. नोकरी करणार्यांसाठी मात्र, हे वर्ष थोडं अडचणीचे आहे. त्यांना नोकरीत अनेक अडचणीचा सामना करण्याची तयारी करावी लागेल. बिझनेसमध्ये गुंतवणुकदारांसाठी हा काळ योग्य नाही. स्टील, ब्यूटीपार्लर, गारमेंट आणि इंपोर्ट-एक्स्पोर्टच्या बिझनेससाठी हे वर्ष उत्तम आहे. आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या. तो आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. यंदा पैशाची बचत करण्यासाठी आपल्याला मोठी कसरत करावी लागू शकते. सप्टेंबरपर्यंत तुमचा अडकलेला पैसा मिळेल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकतात. त्यातून मोठा लाभ मिळण्याची शक्यता. शॉर्टटर्म गुंतवणूक करता येईल. त्यातूनही लाभ मिळेल. आर्थिक स्थिती ऑक्टोबरपर्यंत उत्तम राहिली. परंतु सावधगिरी बाळगावी लागेल. नवा बिझनेस सुरु करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घेणे-देण्याचे व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. लॉटरी, सट्टा, शेअर आणि कमोडिटीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती : यंदा तुम्ही जास्तीत जास्त वेळ कुटुंबियासोबत घालवाल. यामुळे आपल्याला आपल्या रुटीन लाइफमध्ये बदल करावा लागेल. कौटुंबिक वाद मिटतील. नात्यांमधील आपुलकीचा ओलावा कायम ठेवण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा लागेल. कुटुंबात मोठे मंगल कार्याचे योग आहेत. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वर्षाच्या मध्यांत अडचणीचा सामना करावा लागेल. कामानिमित्त काही दिवस कुटुंबियांपासून लांब राहावे लागू शकते. त्यामुळे आपल्याला पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये संतुलन ठेवावे लागेल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी यात्रेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. नव्या ओळखी होतील. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : यंदा प्रेमीयुगुल आणि दाम्पत्यांसाठी यंदाचे वर्ष उत्तम आहे. लाईफ पार्टनरसोबत पिकनिकला जाण्याच प्लानिंग कराल. पार्टनरचे योग्य सहकार्य मिळेल. काही वेळा परस्परांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु त्यावर चर्चातून मार्ग काढा. वैवाहिक जीवनात आनंदाची लहर येईल. पार्टनरला सरप्राईज गिफ्ट देता येईल. त्यामुळे परस्परांमधील नाते आणखी घट्ट होईल. परंतु राशीतील लोकांनी विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहा. अविवाहित तरुण-तरुणींचा विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरीच्या ठिकाणी विभिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात. आरोग्य : वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हॉटेलिंगवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्याला सांधदुखी, डोडा तसेच पोटाचे आजार हळून डोके वर काढू शकतात. कामाचा व्याप वाढल्याने आयोग्यासंबधित गंभीर समस्या उद्धभवू शकते. मसालेदार पदार्थांपासून लांब राहावे लागेल. वर्षाच्या चौथ्या महिन्यापासून आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. सप्टेंबर, ऑक्टबर आणि डिसेंबरपर्यंत प्रकृतीत सुधारणा होईल. वृश्चिक राशीच्या गरोदर महिलांना इंफेक्शन होण्याची शक्यता आहे. औषधी वेळात घ्या. उपाय- - केशर आणि चंदनाचा टिळा दररोज कपाळावर लावाला. - काटेरी रोपट्याला तांब्याच्या भांड्याने पाणी घाला. - वडच्या झाडाला दूध अर्पण करा.धनु जॉब आणि बिझनेस : नवीन वर्षात उद्योगात गुंतवणूक करणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते. उद्योगात वडिलांच्या सहकाऱ्याने नफा वाढू शकतो. नवे घर किंवा वाहन खरेदीचे योग जुळत आहे. स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावल्यास फायदा होऊ शकतो. तरीही, जास्त जोखम घेऊन नये. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला आवश्य घ्या. आर्थिक व्यवहारांबद्दल सावध राहा. पैश्यांशी संबंधित कागदपत्रे सांभाळून ठेवा. नोकरीपेशा आणि बिझनेसवाल्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, अन्यथा दगा मिळू शकतो. नोकरीपेशा लोक सुद्धा कार्यालयात राजकारणाची बळी ठरू शकतात. नोकरीपेशा लोकांना नवीन वर्षात पुढे जाण्याची चांगली संधी येऊ शकते. नववर्षात आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. काही प्रकल्पांवर अधिकची मेहनत सुद्धा घ्यावी लागेल. बिझनेस करणाऱ्यांसाठी सुरुवातीचे 4 महिने फायदेशीर ठरू शकतात. एक्स्ट्रा इनकमचा देखील योग आहे. पैश्यांची कमतरता भासणार नाही. आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकते. चांगला पगार आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. सोबतच आपल्या कार्याचे कौतुकही होऊ शकते. आर्थिक स्थिती : नोकरीपेशा आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी ही चांगली वेळ आहे. नोकरीपेशा लोकांचा पगार वाढू शकतो. आर्थिक स्थितित सुधारणा होण्याचा योग आहे. पैश्यांची कमतरता राहणार नाही. वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याची योग आहे. एक्स्ट्रा इनकमचे स्रोत मिळतील. स्थावर आणि जंगम मालमत्तेतून आपल्याला धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीचा या वर्षी चांगला नफा मिळू शकतो. महागड्या वस्तू किंवा दागिन्यांमध्ये पैसा लावू शकता. नवीन वर्षात गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. फालतू गोष्टींमध्ये खर्च वाढू शकतो. एप्रिल आणि मे महिन्यात सेव्हिंग कमी होईल. एखाद्या प्रकारचा चालान किंवा पेनल्टी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. सुख-सुविधा आणि मनोरंजनावर जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती : कौटुंबिक बाबतीत नवीन वर्ष संमिश्र स्वरुपाचे असू शकते. कुटुंबियांसाठी आपण काही चांगले करण्याच्या प्रयत्नात आपल्या इच्छा दाबताना दिसून येऊ शकता. कुटुंबातील जबाबदार व्यक्ती या नात्याने आपण सर्वांची मदत सुद्धा करू शकता. आपल्या प्रयत्नांमुळे परिवारात हसरे वातावरण राहील. सगळेच सुखी आणि समाधानी राहतील. मात्र, आपल्यावर कामाचा ताण अधिक असल्याचे काही वेळा आक्रामक सुद्धा होण्याची शक्यता आहे. तरीही आपले कुटुंबीय आपल्याला समजूनच घेतील. अशा परिस्थितींमुळे पैश्यांचे व्यवहार जपूनच करावे अन्यथा नातेसंबंध खराब होऊ शकतात. नकारात्मक लोक आणि प्रवृत्त्यांपासून दूरच राहिलेले बरे आहे. कुटुंबियांनी आपल्याला दूर केले, किंवा ते आपल्यावर प्रेम करत नाहीत असा विचार मनात मुळीच आणू नका. अशाने आपल्या कुटुंबियांसोबत संबंध खराब होऊ शकतात. लाइफ पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या. त्याला तक्रारीची संधी देऊ नका. प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह लाइफ संदर्भात नवीन वर्ष चांगले राहील. या वर्षी आपण पार्टनरसोबत अधिक रोमॅन्टिक समय घालवणार अशी शक्यता आहे. फोन किंवा इतर माध्यमातून आपण आपल्या पार्टनरच्या नेहमीच संपर्कात राहाल. या राशीतील लोकांना लव्ह लाइफमध्ये पालकांची मदत मिळेल. तर वैवाहिक जोडपे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतील. काही जुने गैरसमज असल्यास या वर्षी दूर होतील. प्रियकर किंवा प्रेयसीसोबत संबंध पुढे नेण्याचा, लग्न करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष अनुकूल आहे. नकारात्मक वृत्तींपासून दूर राहावे लागणार आहे. आपल्या पार्टनरवर बळजबरी किंवा निर्णय लादण्याचे प्रकार नकोच. नवीन वर्षांच्या पाचव्या महिन्यात रुष्ट व्यवहारांमुळे काहीसा दुरावा होऊ शकतो. ही परिस्थिती कायमची राहणार नाही. वर्षभर लव्ह लाइफमध्ये चढ आणि उतार येत राहतील. पार्टनरशी संबंध पारदर्शक ठेवा. पार्टरवर विश्वास ठेवा आणि संशय घेऊच नका. आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी महागडे गिफ्ट घेण्याची शक्यता आहे. अविवाहित असाल तर या वर्षी विवाहाचे योग आहे. सिंगल लोकांच्या आयुष्यात खास व्यक्ती येईल. प्रेमाचे प्रस्ताव येतील. आरोग्य : आरोग्याच्या बाबतीत नवीन वर्ष ठीक राहील. हल्क्याशा दुखापतीच्या घटना घडू शकतात. मात्र, परिस्थिती लवकरच बरी होईल. यावर्षी हाडाला दुखापत होऊ शकते, त्यामुळे सांभाळूनच राहावे. नवीन वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आरोग्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे, पुढील सहा महिने आरोग्याची कटाक्षाने काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही. या वर्षी कुठल्याही मोठ्या आजाराने त्रास होण्याचा योग नाही. फूड पॉइझनिंग आणि आरोग्याच्या समस्य टाळण्यासाठी ताजे आणि गरम अन्नच खाल्लेले बरे. फास्ट फूडपासून दूर राहिल्यास उत्तम. या वर्षी आपल्या पोट आणि डोळ्यांशी संबंधित त्रास होऊ शकतात. या वर्षी मधल्या महिन्यांमध्ये आपल्याला शरीरात चमक किंवा दुखण्याचे त्रास उद्भवू शकतात. औषधी वेळेवर घ्या. अन्यथा छोटेस दुखणे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांना आरोग्यावर दुर्लक्ष करणे महाग पडू शकते. जुन्या आजारावर उपचार घेत असताना या वर्षी सकारात्मक उपचार होऊ शकतो. उपाय - सात प्रकारचे अन्नाधान्य दान करा - पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करा - हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचे दिवे लावामकर जॉब आणि बिझनेस : जॉब आणि बिझनेसबाबत वर्षाच्या सुरुवातीलाच सावधानता बाळगायला हवी. 3 महिन्यांनंतर कार्यक्षेत्रात स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांनी या वर्षी कोणतीही जोखीम घेऊ नये व घाईने निर्णय घेऊ नयेत. व्यवसाय करणाऱ्यांनीही मोठी गुंतवणूक टाळावी. नोकरी करणाऱ्यांनी विवादांपासून दुर राहण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या मागे तुमच्या विरोधात कट रचण्यात येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अनावश्यक चर्चेपासून दुर राहावे. नाहीतर गोत्यात येण्याची शक्यता आहे. सगळ्यांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. एखादा नवा प्रोजेक्टही मिळण्याची शक्यता आहे. विचार करुनच गुंतवणूक करावी. घाईने निर्णय घेण्यापासून दुरच राहा. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याचा व्यवसायात फायदा होईल. यावर्षी तुमचे उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक मार्ग होऊ शकतात. रेस्टॉरंट, लोखंड, स्टील, कापड आणि आयात-निर्यातीचा उद्योग केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. या वर्षी पार्टनरशीपमध्ये काम करु शकता. एखाद्या महिन्यात तुम्हाला अचानक मोठा लाभ होऊ शकतो. कामकाजासाठी केलेला प्रवासही फलदायी होऊ शकतो. तुमचे कामकाज परदेशाशी नगडित असल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. वित्तीय बाबींबद्दल अधिक सावधानता बाळगावी. कोणत्याही कागदपत्रांवर ते न वाचता स्वाक्षरी करु नये. आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारावी आणि उत्पन्न वाढावे यासाठी तुम्ही जास्त मेहनत कराल. त्यात तुम्ही काही अंशी यशस्वीही व्हाल. आई-वडिलांची आणि तुमच्या पती अथवा पत्नीची यात तुम्हाला पुर्ण साथ मिळेल. पैशाबाबत विचारपुर्वक निर्णय घ्या, त्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. तुम्हाला यावर्षी उत्तम आर्थिक नियोजन करावे लागणार आहे. तुम्हाला जबाबदारीचे काम मिळू शकते. पण आर्थिक व्यवहार करताना अतिशय काळजी घ्या. ऑक्टोबर महिन्यात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. जसे चालू आहे तसेच चालु राहु द्या. पैशाबाबत हा काळ चढ-उताराचा असेल. नोकरी आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ चांगला नाही. कर्ज देण्यासाठी आणि घेण्यासाठीही हा काळ चांगला नाही. मालमत्तेबाबत या काळात तुम्हाला त्रास होऊ शकतो. खर्च देखील वाढतील. नोकरी करणाऱ्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. पगारात अपेक्षापेक्षा कमीच वाढ होईल. व्यवसायातही जोखीम घेऊ नका. मोठी गुंतवणूक करण्यापुर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. विचारपुर्वकच गुंतवणूक करा. कौटुंबिक स्थिती : हे वर्ष तुम्हाला संमिश्र राहणार आहे. आध्यात्माकडे तुमचा ओढा असेल. वैवाहिक जीवनात मात्र काहीशा अडचणी येतील. ही स्थिती काही दिवसांसाठीच असेल. त्यानंतर मात्र तुमचे संबंध सुधारतील आणि सर्व काही सुरळित होईल. तुमच्या आर्थिक प्रगतीतही तुमच्या घरातील व्यक्तींचे तुम्हाला सहकार्य लाभेल. विनाकारण शंका घेऊन वाद घालण्याचे मात्र तुम्ही टाळायला हवे. कदाचित त्यामुळे त्यांच्या भावना दुखावतील. यावर्षी आपण नवे घर खरेदी करु शकता. घरात मंगल कार्य घडु शकते. संतान सुःख लाभु शकते. घरातील सगळे सदस्य विशेषत: बहिण आणि भाऊ तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील. वडिलांच्या आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कुटुंबासोबत तुम्ही कदाचित फिरायलाही जाल. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : वैवाहिक जीवन आणि प्रेम-संबंधांसाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या दोघांमधील संबंधात मधुरता येईल. तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. पार्टनरसोबत मतभेद होऊ नयेत याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. एकट्या असणाऱ्यांना लव प्रपोजल मिळेल. तुम्हाला काही लक्षात राहतील असे क्षण तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत अनुभवता येतील. पण तुमचा विवाह होण्यात मात्र अडचणी येतील. विवाहित लोकांच्या जीवनात मात्र सौख्य असेल. काही जणांचे ब्रेकअपसुध्दा होईल. आरोग्य : आरोग्याबाबत तुम्हाला यावर्षी विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमची जुनी दुखणी पुन्हा उद्भवू शकतात. अपघात आणि ऑपरेशन होण्याचीही शक्यता आहे. हाडांचे आणि नसेबाबत आजार होऊ शकतात. तणावामुळे डोकेदुखी सारखे आजार होऊ शकतात. स्वत:साठी वेळ काढणे तितकेच महत्वाचे असल्याचे या काळात तुमच्या लक्षात येईल. पाण्यापासून पसरणारे आजारही होऊ शकतात. पोटाचे आजार होण्याची शक्यता असल्याने अन्न सेवन करताना काळजी घ्या. आळस आणि निद्रानाशासारखे आजार अथवा सवयी जडू नयेत याची काळजी घ्या. आपल्या वडिलांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्या. गर्भवती महिलांनी थोडाही निष्काळजीपणा दाखवू नये तो त्यांना महागात पडू शकतो. उपाय- - मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांडाचे पठण करा. - हनुमान मंदिरात लाल झेंडा अर्पण करावा. - पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.कुंभ जॉब आणि बिझनेस : या वर्षी कुंभ राशीतील नोकरी आणि व्यवसाय करणारे लोक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यात नोकरी करणा-या लोकांना यंदाचे वर्ष खास राहील. काही विशेष अचीवमेंट मिळवू शकतील. या वर्षात आपण कठोर मेहनत घेणार असून त्याचा परतावाही तुम्हाला मिळणार आहे. आपल्या कष्टाचे कौतूक होईल. नोकरीत प्रमोशन होईल आणि पगारवाढही होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळत राहील. या वर्षी तुम्ही सकारात्मक विचाराने काम करत राहणार आहात. ऑफिसमध्ये होणा-या वादापासून तुम्हाला दूर रहावे लागेल. या वर्षी तुमच्यावर नविन जबाबदारी येण्याची शक्यता आहे तसेच ती जबाबदारी तुम्ही यशस्वीरित्या हाताळू शकणार आहे. आपल्या क्षमतेत वाढ होईल. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा, काही छोटे-मोठे वाद ओढावण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला ऑफिसच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याचा योग आहे. वर्षाच्या सुरूवातीला महिने तुम्हाला थोडे संभाळून राहावे लागेल. संयमाने काम करा. अवघड कामे घाई- गडबडीत करू नका. इतर कमाईसाठी नवे काहीही करू नका त्यातून फार काही मिळण्याची शक्यता नाही. वर्षाच्या शेवटच्या काळात नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत सावध राहा. व्यवसाय करणारे लोक यंदा आपला बिजनेस वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकतात. जुनी गुंतवणूक या कामासाठी उपयोगात आणता येईल. वर्षाच्या सुरूवातीला तीन महिने पार्टनरशिपमध्ये काम करू नका. त्यानंतर पुढील दोन महिन्यात तुम्हाला मोठे फायदे होऊ शकतात. बचत आणि उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. या काळात तुमची अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती : या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणा-या लोकांचे उत्पन्न वाढणार आहे. व्यवसाय करणा-या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. इतर इनकमाचे मार्ग सापडतील. पुरूषांना महिलांपासून तर महिलांना पुरूषांपासून (अपोजिट जेंडर) धनलाभ होऊ शकतो. कोणत्याही ठिकाणी तुम्ही पैसा लावला तरी त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे. जुने कर्ज फेडणार आहात. बचत वाढविण्यासाठी इंटरनेट, म्यूचुअल फंड, प्रॉपर्टी, शेयर बाजार आणि कमोडिटी आदी ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्ही फायद्यात राहाल. कला, डिझायनिंग, फॅशन, आर्किटेक्ट आणि निर्यातीशी संबंधित लोकांना यंदा विशेष लाभ होईल. मात्र, बचत करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागेल. मार्च ते जुलै या काळात आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात तुमचे उत्पन्न कमी होईल. या काळात घाई-गडबडीत निर्णय घेऊ नका. या काळात कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या कोणी तुमची फसवणूक करू शकते. कौटुंबिक स्थिती : या वर्षी आपले कौटुंबिक जीवन पहिल्यापेक्षा चांगले राहील आणि आयुष्य चांगले जाईल. जीवनसाथीकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. या वर्षी तुमच्या घरात शांती, समाधान राहील. त्यामुळे एखादे नवे काम सुरू शकता. घरातील मंडळींची पॉलिसी काढणे किंवा त्यांच्या नावावर गुंतवणूक करण्याचे नियोजन करू शकता. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा आवराव्या लागतील. यंदा तुम्ही मनापासून काम करणार आहात. या वर्षी 15 मार्चनंतर तुम्हाला काही कौटुंबिक समस्या निर्माण होतील. या काळात तुम्ही तुमचा राग नियंत्रणात ठेवा. कौटुंबिक काही निर्णय या काळात घेणे तुम्ही टाळा. वैवाहिक जीवनात काही काळाकरता तणाव निर्माण होऊ शकतो. या वर्षी काही कौटुंबिक वाद उदभवू शकतात. मात्र, तुम्ही त्यावर मात करू शकताल. काही कटू निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. शक्यतो असे निर्णय घेणे टाळा. हळू हळू मनातील घालमेल दूर होईल. कोणाच्या भानगडी सोडविण्याच्या नादात पडू नका, अंगलट येईल. यंदा तुम्ही घरातील मंडळी व मित्रांसमवेत फिरायला जाण्याची योजना बनवू शकता. वर्षाअखेर घरात एखादे लग्नसमारंभ किंवा पूजा-पाठ याचे आयोजन होऊ शकते. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल आणि चांगले नातेसंबंध राहतील. प्रेम आणि वैवाहिक आयुष्य : लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्यात यंदा चढ- उतार येतील. आपल्याला समिश्र निकाल मिळतील. सुरूवातीच्या काळात पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. या काळात आपल्या इच्छा दाबाव्या लागतील. एक- दुस-यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपला राग नियंत्रणात ठेवा. बोलण्याआधी दहा वेळा विचार करा. सुरूवातीच्या 3 महिन्याच्या काळात लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. एप्रिलनंतर आपल्या नात्यात सकारात्मकता येईल. तुमचे प्रेम, नाते मजबूत होईल. लव्ह मॅरेज करणा-या लोकांनी सावधानता बाळगावी. वर्षाच्या सुरूवातीला लग्नासारखे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आई-वडिल व इतर नातेवाईक तुमच्या लग्नाला संमती देणार नाहीत. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव या वर्षात मिळू शकतात. या राशीतील सिंगल लोक एखाद्या व्यक्तीचा विचार करत असतील किंवा रिलेशन सुरू करण्याचा विचार करत असतील तर त्या व्यक्तीला एप्रिल आणि मे महिन्यात प्रपोजल द्या. आरोग्य : आरोग्याबाबतच्या बाबतीत तुम्हाला हे वर्ष ठीक- ठाक राहील. एखादा मोठा आजार किंवा त्रास होण्याची शक्यता नाही. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. जुनाट आजारापासून दिलासा मिळू शकते. मात्र, यंदा छोटी-मोठी दुखापत व आजरपण जरूर होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जे लोक आजारी आहेत त्यांनी हेल्दी रूटीनमधूनच मुक्तता मिळू शकते. या वर्षातील मधल्या सहा महिन्याच्या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. चढ उतार येऊ शकतात. यंदा झोप कमी मिळू शकते आणि पोटाचे आजार उद्धभू शकतात. वाहन आणि मशिन चालवणा-या लोकांनी यंदा सावधानता बाळगावी. गर्भवती महिलांना यावर्षी पोट आणि ओटीपोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. मात्र, थोड्याच दिवसात तुम्हाला दिलासा मिळेल. हाडे आणि वाहिन्याशी संबंघित रोगाने त्रस्त लोकांनी सांभाळून राहावे. फास्ट फूड आणि मसालेदार जेवणापासून लांब राहा. उपाय- - मुंग्यांना पीठ टाका. - शनिवारी सायंकाळी उत्तर दिशेला मोहरीचे तेलाचा दिवा लावा.मीन जॉब आणि बिझनेस : या वर्षी नोकरी आणि व्यवसाय करणा-या लोकांना कामामध्ये सावधानता बाळगावी लागेल. निष्काळजीपणापासून सावध रहावे. या वर्षातील काही महिन्यामध्ये कामाचा ताण वाढू शकतो. काही कामांमध्ये सहका-यांची मदत मिळणार नाही. त्यामुळे काही महिन्यांमध्ये कामगाजादरम्यान त्रास होऊ शकतो. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने योग्य नाहीत. यादरम्यान मोठी गुंतवणूक करु नका. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कोणत्याही पद्धतीचा बदल करण्याचा प्रयत्न करु नका. या दिवसांत अधिका-यांशी हुज्जत घालू नका. कोणत्याही कामाला टाळू नका. एप्रिलनंतर नोकरी आणि व्यवसायाच्या स्थितीमध्ये सुधार होऊ शकतो. वर्षाच्या शेवटी एक्स्ट्रा इन्कमच्या काही खास संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना मनासारखे ट्रान्सफरही मिळू शकते. मीनराशीच्या काही व्यक्तींना पदोन्नती आणि इन्क्रीमेंट मिळू शकते. मोठ्या अधिका-यांपासून मदतही मिळू शकते. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतात. कामकाजासंबंधी प्रवास करण्यास मिळू शकतो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अचानक फायदा होऊ शकतो. या दिवसांत इन्कमचे नवे स्त्रोतही मिळू शकतात. तुमच्या आत्मविश्वासात आणि पद-प्रतिष्ठेतही वाढ होईल. आर्थिक स्थिती : या वर्षी बचत वाढवण्यासाठी तुम्ही सतत मेहनत कराल. यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. आर्थिक बाबीबाबत मार्चनंतरचा वेळ तुमच्यासाठी अधिक बरा असण्याची शक्यता आहे. जून ते ऑक्टोबरदरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ मिळू शकतो. दोन पद्धतीने इन्कम कमावण्याच्या संधीही मिळू शकतात. या दिवसांत नोकरदार व्यक्तीची इन्कम वाढेल तर व्यवसायिकांनाही फायदा होईल. गुंतवणूक करण्यासाठी जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ योग्य नाही. ऑक्टोबर 2018 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी ठिकठाक राहिल. खर्चही वाढेल. व्यवसाय करणा-यांचे फायद्यासोबत नूकसानही होऊ शकते. पैशांच्या व्यवहारात जोखिम घेऊ नका. आर्थिक स्थितीबाबत घाईघडबडीत निर्णय घेऊ नका. पूर्ण वर्ष तुम्ही पैशासाठी तडजोड करत राहाल. बेकायदेशीर कामांपासून तुम्ही दूरच राहिले पाहिजे. इच्छा नसतानाही काही महत्त्वांच्या कामांसाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. भागिदारी करण्यासाठी योग्य वेळ नाही. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीमध्ये सावधानतापूर्वक गुंतवणूक करा. तुम्ही वादात अडकू शकता. कौटुंबिक स्थिती : कौटुंबिक बाबतीत हे वर्ष तुमच्यासाठी खास असेल. नाते आणखी मजबूत होतील. कामकाज आणि इतर प्रकरणात भावाबहिणी आणि वडीलांची मदत मिळेल. वर्षाच्या सुरुवाती दिवसांमध्ये जुन्या गैरसमजुती दूर होतील. गृहस्थी जिवन आनंददायी राहिल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. कुटुंबाचे सदस्य एकमेकांना मदत करतील. लाइफ पार्टनरही मदत मरेल. समाजात तुमचा मान वाढेल. वर्षाच्या सुरुवाती दिवसांमध्ये धार्मिक यात्रेला जाण्याचा योग आहे. या वर्षी धार्मिक आणि अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढेल आणि घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. अधिक काम असूनही तुम्ही कुटुंबाला वेळ द्याल. तुमच्या आनंदासाठी कुटुंबाचे काहि सदस्य आपल्या इच्छा दाबतील. खासगी आणि व्यवसायी आयुष्यामध्ये ताळमेळ बसवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या वर्षी तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करु शकता. यासाठी वडीलांची मदत मिळू शकते. कुटुंबाच्या मदतीने व्यवसायही सुरु करु शकता. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : लव्ह लाईफ आणि दाम्पत्य जीवनासाठी हे वर्ष मिळतेजुळते राहिल. पतीपत्नीचे संबंध ठिकठाक राहिल. वर्षाच्या सुरुवातीच्या 3 महिन्यानंतर लव्ह लाईफशी संबंधित निर्णयामध्ये घाईगडबड करु नका. एखाद्या कारणावरुन जोडीदारासोबत गैरसमजुती होऊ शकतात. जोडीदारावर संशय घेऊ नका. या राशीतील अविवाहित लोकांनी विवाहासाठी घाई करु नये. लव्ह मॅरेज करणा-यांनीही या वर्षी सांभाळून रहावे. वर्षाच्या मध्यामध्ये जोडीदाराशी संबंध सुधारु शकतात. एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि नात्यात पारदर्शकता येईल. या दिवसांत तुम्हाला शारीरीक सुखही मिळू शकते. कार्यक्षेत्रातील भिन्न जेंडरच्या व्यक्ती तुमच्या बोलण्याने आणि व्यवहाराने तुमच्याशी प्रभावित होऊ शकता. या वर्षी मीन राशीच्या विवाहित व्यक्तींनाही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. एक्सट्रा अफेअर टाळावे. जोडीदाराशी प्रामाणिक रहा. या राशीच्या सिंगल व्यक्तींच्या जीवनात जवळची व्यक्ती दाखल होऊ शकते. या वर्षी जोडीदारावर अधिक खर्च होऊ शकतो. जोडीदाराच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्याल. आरोग्य : या वर्षी मीन राशीच्या लोकांचे जुने रोग वर येऊ शकतात. वर्षातील मधले 3 महिने तुम्हाला अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. या वर्षी पोटोचे आजार होण्याची शक्यता आहे. इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. सांधेदुखीही होऊ शकते. नसा आणि स्नांयूचे त्रास वाढण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी हे वर्ष चांगले राहिल. वर्षाच्या शेवटच्या दिवसांत जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना काही दिलासा मिळू शकतो. मीन राशीच्या व्यक्तींनी आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नये. तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो. डोळ्यांचा त्रासही वाढण्याचीही शक्यता आहे. तुम्ही चश्मा लावत असाल तर चश्म्याचे नंबर वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी आरोग्याच्याबाबतीत तुम्ही सावधानता बाळगाल. या वर्षी नवी आरोग्यदायी सवय तुम्ही स्वत:ला लावून घेऊ शकता. उपाय- - केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे. - केशर आणि चंदनाचा टीळा लावावा. - गुरुवारी पिवळ्या कपड्यात हरभ-याची डाळ आणि हळदीचा तुकडा ठेवून दान करावे.

मेष जॉब आणि बिझनेस : जॉब आणि बिझनेससाठी या वर्षी मे पासून नोव्हेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला मानला जाऊ शकतो. या काळात सॅलरी आणि पद वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही यश प्राप्त होऊ शकते. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. परंतु कामाचा ताणही तुमच्यावर राहील. तुम्ही आर्ट, फायनान्स, मीडिया, प्रिंटिंग, टुरिझम, संगीत, फॅशन डिझाईन किंवा सौंदर्य उत्पादनाशी संबंधित क्षेत्रामध्ये असल्यास तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. तुम्ही एखाद्या नवीन बिझनेसमध्ये पैसा गुंतवू शकता त्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्यावा. स्थावर मालमतेशी संबंधित कामामध्ये सावध राहावे. कामामध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये चांगल्या कामामुळे तुमचे कौतुक होईल यासोबतच सोबत काम करणारे काही लोक तुमचा द्वेष करू शकतात. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी या वर्षात मोठे फायदे होऊ शकतात. नोकरदार आणि व्यापारी दोघांसाठीही हे वर्ष उत्तम राहील. आर्थिक स्थिती : वर्षाच्या मधल्या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहील. शेअर मार्केटमधून चांगला रिटर्न मिळेल, परंतु लॉटरी आणि सट्टा बाजारापासून तुम्ही दूर राहावे. आर्थिक व्यवहारामध्ये सावध राहावे. या वर्षात तुम्ही चांगली फायनान्शिअल प्लॅनिंग करू शकता. उत्पन्नाचे नवीन सोर्स मिळतील. या वर्षात फायद्यासोबतच खर्चही वाढू शकतो. ऑक्टोबर महिन्यात तुम्ही जरा जास्तच सावध राहण्याची आवश्यकता आहे. वर्षातील इतर महिन्यांमध्ये उत्पन्न चांगले राहील. या वर्षात तुम्ही एखादे लोन घेण्याचा विचार कराल. नवीन वर्षात नवीन घर खरेदीचा मूड होईल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला काही खास लोकांची मदत मिळू शकते. या वर्षात तुम्हाला इतरांना दिलेले उसने पैसे परत मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक स्थिती : या वर्षात कौटुंबिक गोष्टींमध्ये काहीसा तणाव राहू शकतो. कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. कुटुंबासाठी फार कमी वेळ काढू शकाल. प्रवासाचे योग जुळून येत आहेत. कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचे प्लॅनिंग करू शकता. कुटुंबात एखाद्या गोष्टीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आई-वडीलांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. या वर्षात तुमचा समजूतदारपणा वाढेल, तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थितीपणे पार पाडाल. आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या जातकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही सकारात्मक राहणे आवश्यक आहे. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : या वर्षात तुम्ही प्रेम संबंधामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. पार्टनरची एखादी गोष्ट किंवा सवय तुम्हाला आवडणार नाही. अहंकारामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. क्रोधापासून दूर राहावे. लग्न झालेल्या लोकांनी एक्स्ट्रॉ अफेअरपासून दूर राहावे. या काळात काही नवीन रिलेशन निर्माण होऊ शकतात. मे पासून नोव्हेंबरपर्यंतचा काळ लव्ह-लाईफसाठी चढ-उताराचा राहील. या वर्षात लव्ह-लाईफला लग्नामध्ये बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. तुम्ही एखाद्याला पसंत करत असाल आणि प्रपोज करण्याची इच्छा असल्यास मार्चपासून मेपर्यंतचा काळ यासाठी खास राहील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराच्या आरोग्यामध्ये चढ-उताराची स्थिती राहील. बिझनेसमध्ये आपल्या पार्टनरची मदत करा, यामुळे फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत रोमँटिक आणि अविस्मरणीय प्रवासाचे योगही जुळून येत आहेत. आरोग्य : आरोग्याच्या बाबतीत वर्षातील सुरुवातीचे 3 महिने सावध राहणे आवश्यक आहे. आहारात हलगर्जीपणामुळे तुम्ही तब्येत नाजूक होत चालली आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. झेपत नसलेल्या कामामध्ये रिस्क घेऊ नये, जखम होण्याची शक्यता आहे. आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या वर्षात तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल आणि डायजेशनसंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. काम जास्त असल्यामुळे तणाव वाढू शकतो. झोपेची कमतरता जाणवू शकते. बदलत्या वातावरणामुळे छोटे-छोटे आजार, उदा सर्दी-पडसे, खोकला होण्याची शक्यता आहे. या वर्षात तुम्ही व्यसनापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. गर्भवती महिलांनीसुद्धा आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उपाय; - मंगळवारी श्वानाला गोड पुरी खाऊ घालावी. - शनिवारी हनुमान मंदिरात शेंदूर अर्पण करावा. - लहान मुलांना चॉकलेट द्यावेत.

वृषभ जॉब आणि बिझनेस : या वर्षी नोकरदारांनी थोडे सबुरीने घ्यावे. अधिकारी-वरिष्ठांसोबत वाद टाळावे. विनाकारण एखाद्या गोष्टीवरुन वाद घालू नये. या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. याकाळात वरिष्ठांचे तुमच्याकडे विशेष लक्ष राहाण्याची शक्यता आहे. नव्या जॉबच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी चांगला काळ आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. बिझनेस करणाऱ्यांनी देव-घेवीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. या वर्षी तुम्हाला हळु-हळु फायदा होण्याची शक्यता आहे. नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा. शेअर, सट्टा, कमोडिटी बिझनेस करणाऱ्यांनी आर्थिक नुकसानीचा योग आहे. नोकरदार वर्गासाठी यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानचा काळ चांगला राहाणार आहे. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याचा संभव आहे. नोकरी प्रमोशनसाठी तुम्हाला थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या कामातील सातत्य आणि रचनात्मक कार्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकू शकता. त्याचेवळी याच काळात काही वादांशी तुमचे नाव जोडले जाईल. ऑफिस पॉलिटिक्सचे तुम्ही शिकार होऊ शकता. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सावध राहा. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. वादांपासून जेवढे दूर राहाता येईल तेवढे दूर राहा. आर्थिक स्थिती : आर्थिक स्थितीसाठी वर्षाच्या सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारणच्या खर्चावर कंट्रोल करा. आर्थिक चणचण निर्माण झाल्यास कुटुंबात वाद संभवतील. या वर्षाच्या मध्यात पैसे कमावण्याच्या तुम्हाला खूप संधी उत्पन्न होतील. दुसरीकडे ग्रहांची दशा सांगते की वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरनंतर तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. उत्पन्न देखील वाढेल. कामानिमित्त केलेला प्रवास फलदायी ठरेल. या वर्षी तुमचा अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रॉपर्टीसंबंध प्रकरणात गुंतवणुकीची संधी मिळेल. प्रॉपर्टीची काही प्रकरणे फायद्याची ठरु शकतात. कौटुंबिक स्थिती : यावर्षी जरा विचारपूर्वक बोला. तुमच्या एखाद्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. जानेवारीमध्ये कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतो. वर्षाचे पहिले 3 महिने कृशल आहेत. थोडे सांभाळून राहा. या काळात कोणी तुम्हाला वरचढ ठरण्याचा प्रयत्न करेल. यावर्षी कुटुंबासोबत कुठे फिरायला जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो. या प्रवासामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा आणि बाऊंडिग चांगली होऊ शकते. नाते अधिक घट्ट होईल. याशिवाय पार्टनरसोबत तुम्ही एखाद्या धार्मिक स्थिळीही जाऊ शकता. परिवारातील काही मंगलकार्य होण्याचाही योग आहे. कुटुंबात शांती आणि धन लाभ होण्यासाठी पुजा-पाठ केले जाऊ शकतात. यावर्षी कुटुंबातील काही मोठे आणि महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. यावर्षी काही खास कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पार्टनरची साथ मिळेल. वर्षाच्या याच काही महिन्यात तुम्हा भाऊ-बहीण यांचीही मदत मिळू शकते. कुटुंबात कोणी नवीन सदस्यही येऊ शकतो. संबंधांमध्ये सुधारणा होण्याचा योग आहे. आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : यावर्षी तुमच्या लव्ह-लाइफमध्ये तिसऱ्या व्यक्तीला ढवळाढवळ करु देऊ नका. यावर्षी तुमच्या पार्टनरचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस यादगार होऊ शकतो. लव्ह-लाइफमधील एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. सोबत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोजही करु शकता. यावर्षी लव्ह लाइफला विवाहात रुपांतरती करण्यात यश मिळू शकते. प्रेमी युगुलांसाठी हे वर्ष चांगले राहाणार आहे. यावर्षी तुम्ही एकमेकांसोबत अधिकाधिक काळ घालवू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत सोशल मीडिया आणि संपर्काच्या इतर माध्यमाने संपर्कात राहू शकता. प्रिय व्यक्तीसोबतच्या सततच्या भेटीने नाते अधिक दृढ होण्यास मदत मिळेल. वास्तविक वर्षाचे शेवटचे 2 महिने लव्ह-लाइफसाठी त्रासदायक राहातील. लव्ह-लाइफमध्ये पार्टनरवर संशय घेऊन दोघांमध्ये दुरावा वाढू शकतो. बोलताना थोडे सांभाळून बोलावे आणि धिराने घ्यावे. घाईत काम बिघडू शकते. आरोग्य : वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. या दिवसांमध्ये वाहन सावकाश चालवा. मशीनवर काम करत असाल तर सांभाळून काम करा. दुखापत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कामाच्या दबावातून थोडा आराम मिळावा यासाठी विश्रांती घेऊ शकता. काही दिवासांसाठी सुटी घेऊ शकता. जुन्या आजाराने ग्रस्त लोकांनी थोडी सावधगिरी बाळगा. या राशीचे काही लोक पोटाचे विकार आणि निद्रा दोषाने त्रस्त राहू शकतात. काहींना लठ्ठपणाचा त्रास संभवतो. यामुळे तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये बदल करा. यावर्षी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा. तुमच्या पार्टनरची तब्यत नाजूक राहू शकते. झोप न लागणे आणि डोकेदुखीचा त्रास संभवतो. पार्टनरच्या प्रकृतीची काळजी घ्या. यावर्षी तुमच्या तब्येतीमध्ये चढ-उतार सुरु राहातील. यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. सर्दी-खोकला-ताप, ब्लड प्रेशर आणि ह्रदया संबंधी त्रास होऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेत चला. विशेषतः एप्रिल आणि ऑक्टोबर दरम्यान विशेष काळजी घ्या. या दिवसांमध्ये मानसिक शांती भंग होऊ शकते. सोबतच खाण्या-पिण्यावर लक्ष ठेवा. योग्यवेळी आराम करा. उपाय - शुक्रवारी तांदुळ दान करा. - लक्ष्मीला पांढरी आणि पिवळी फुले चढवा. - केसरी-चंदन तिलक लावत जा.

मिथून जॉब आणि बिझनेस : यावर्षी अधिकारी आणि सोबत काम करणाऱ्यांकडून मदत मिळू शकते. हे लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. या वर्षी मिथून राशीच्या नोकरदार लोकांना मोठे यश मिळण्याचे योग आहेत. तुमची एखादी आयडिया कंपनी किंवा सरकारला कामाची ठरू शकते. नोकरी स्वीच करण्याची इच्छा असलेल्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. या वर्षी चांगले ऑप्शन उपलब्ध होतील. प्रमोशनची शक्यता आहे. सॅलरी वाढण्याचे योग आहेत. मनासारखी ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. राशी स्वामी बुधच्या प्रभावाने तुम्ही घतलेले मोठे निर्णय फायद्याचे ठरतील. तुमच्या कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल होतील. या वर्षी तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडाल. नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठे बदल झाल्याचे दिसून येईल. पण मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. विचारपूर्वक पैसे गुंतवा. बिझनेस पार्टनरसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. पण लवकरच मनभेद दूर होतील. व्यवसाय वाढण्यासाठी योग्य कालावधी आहे. विदेशातील व्यवसायात फायदा होईल. दूर असलेल्या लोकांकडून बिझनेसमध्ये मदत होईल. याचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती : ऑक्टोबर २०१८ पर्यंत आर्थिक स्थिती चांगली राहिल. नवीन इन्कम सोर्स मिळतील. त्यातून उत्पन्न वाढेल. जुनपासून ऑक्टोबरपर्यंत आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा वाढेल. इन्क्रीमेंट होईल. बिझनेसमध्ये थांबलेला पैसा मिळेल. लॉटरीतून चांगली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल. या दरम्यान तुम्ही स्टील, कपडे, ब्युटी प्रोडक्ट, मिल्क प्रोडक्ट आणि पर्यटन याच्याशी निगडित व्यवसायात पैसे गुंतवल्याने फायदा होईल. लेन-देन आणि गुंतवणुकीत थोडी सावधता बाळगा. एखाद्या विश्वास माणूस तुमचा विश्वासघात करु शकतो. जोखिम असलेली गुंतवणूक टाळा. अनुभवी लोकांचा सल्ला जरुर घ्या. कौटुंबिक स्थिती : कौटुंबिक प्रकरणांमध्ये हे वर्ष तुमच्यासाठी फायदा-तोट्याचे राहू शकते. कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबासोबत वेळ घालविण्यासाठी कमीच संधी मिळेल. पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. या वर्षी तुम्ही जुने वाद सोडविण्यासाठी बसून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न कराल. यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कामकाज जास्त असल्याने वर्षाचे काही महिने कुटुंबापासून दूर राहू शकता. कुटुंबातील सदस्यांमध्ये मनमुटाव होऊ शकतो. त्याने तणाव वाढेल. सामाजिक कार्य़ांमुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. संतान प्राप्ती होण्याची शक्यता आहे. घरी धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. हळूहळू कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम वाढण्याची शक्यता. या वर्षी पिढीजात संपत्तीशी संबंधित असलेला वाद सुटण्याची शक्यता. तुम्ही नवीन फ्लॅट किंवा फ्लॉट विकत घेऊ शकता. पार्टनर आणि मुलांना खुश करण्यासाठी गिफ्ट आणि दागिने विकत घेऊ शकता. या वर्षी तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणखी मजबूत होईल. नवीन लोकांच्या संपर्कात येणार. भावांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होणार. आईवडीलांचे सहकार्य़ लाभणार. प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह मॅरेज करणाऱ्यांसाठी हे शुभ वर्ष आहे. आईवडीलांचा होकार मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरसोबत बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. या वर्षी मिथून राशीच्या लोकांना लव्ह प्रपोजल मिळू शकतात. पती-पत्नीचे संबंध सुधारतील. पार्टनरसाठी महागडे गिफ्ट विकत घेणार. तुम्ही तुमची लव्ह लाईफ आणखी रोमॅंटिक करण्यात यशस्वी व्हाल. या राशीच्या सिंगल लोकांच्या लाईफमध्ये एखादे विघ्न येऊ शकते. या शिवाय तुम्ही एखाद्याला पसंत करता आणि प्रपोज करण्याची शक्यता आहे तर काही काळ वाट बघावी लागेल. लव्ह लाईफ आणि दांपत्य जीवनासाठी वर्षाचे पहिले ४ महिने सावधान राहावे लागेल. या महिन्यात लव्ह लाईफशी निगडित कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा अफेरपासून दूर राहा. आरोग्य : तुमच्या प्रकृतीत संपूर्ण वर्ष उतार-चढाव दिसून येईल. प्रकृतीबाबत हे वर्ष तुमच्यासाठी काही खास नाही. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. अन्यता पुढे मोठे संकट उद्भवू शकते. या कारणाने कार्यस्थळी तुमचे मन रमणार नाही. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये प्रकृतीच्या प्रकरणांमध्ये सावधान राहावे लागेल. गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यंतरी लठ्ठपणा किंवा जुना आजार उफाळून येऊ शकतो. डायबिटिज आणि ब्लड प्रेशनचा त्रास जाणवू शकतो. स्कीनसंबंधी समस्या भेडसावू शकते. लिव्हर आणि पोटाच्या इतर भागांमध्ये समस्या होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवले नाही तर मानसिक आजार वाढू शकतात. अनिद्रा, डोके आणि डोळ्यांचे दुखणे होऊ शकते. वेळोवेळी चेकअप करा. तुम्ही पेशंट आहात तर सतर्क राहणे आवश्यक आहे. उपाय- - बुधवारी गणेश मंदिरात लाडू अर्पण करा. - किन्नरांचा आशिर्वाद घ्या. - रविवारी भैरव मंदिरात दूध अर्पण करा.

कर्क जॉब आणि बिझनेस - नव्या वर्षात नोकरीत फायदा होईल आणि त्यादृष्टीने अनेक संधी उपलब्ध होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. काही नवीन प्रोजेक्टही हाती घ्याल. बिझनेस करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल पण तरीही तुमच्या कामात कुठेही कमतरता राहणार नाही. निराश होऊ नका आणि या वर्षात कोणासोबत पार्टनरशीप करण्याचे टाळा. आर्थिक कामांतील कागदपत्री व्यवहारामध्ये सावधानी बाळगा. नव्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याची घाई करु नका. तुमच्या कामाने अधिकारीवर्ग खुशीत राहील आणि परिणामतः तुम्हाला प्रमोशन मिळण्याचीही दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये होणाऱ्या गॉसिपपासून दूर रहा यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या लाईफ पार्टनरची महत्त्वाची भूमिका राहील. केमिकल, मेडिकल, खनिज आणि टेक्नीकल फील्डशी संबंधित असलेल्या लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. मोठे फायदे होऊ शकतात आणि कामकाजासंबंधित काही दौरेही होऊ शकतात जे तुमच्या हिताचे ठरतील. विदेशी गुंतवणुकीतही तुम्हाला मोठा फायदा होईल. आर्थिक स्थिती : आर्थिक स्थितीबाबत हे वर्ष समाधानकारी असेल. एक्सट्रा इनकम होण्याचीही शक्यता आहे. जानेवारीपासून मार्चपर्यंत तुमच्यासाठी पैशांबाबतीत उत्तम वेळ आहे. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक बदल होण्याचेही संकेत मिळत आहेत. शेअर बाजारात केलेली गुंतवणुक अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर राहील. भिन्नलिंगी व्यक्तींकडून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. नोकरीत पगारवाढ होऊ शकते तर दुसरीकडे वडिलोपार्जित संपत्तीमधूनही लाभ मिळेल. मेहनतही जास्त करावी लागेल आणि त्यासाठी खर्चही होऊ शकतो. अशाप्रकारे तुमच्या सेव्हिंगवर परिणाम झालेला दिसून येईल. या दिवसांत कर्ज घेण्याचे टाळा. कौटुंबिक जीवन : वर्षाच्या सुरुवातीला जोडीदारासोबत होत असलेल्या मतभेदाने त्रस्त व्हाल. तुम्ही कुटुंबाच्या इतर सदस्यांवरही रुबाब दाखवण्याचा प्रयत्न कराल. याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक संबंधावर पडेल पण हळूहळू सर्व काही पुर्वपदावर येईल. कुटुंबात शांतता नांदेल. वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबामध्ये थोडे मतभेद होतील पण या सर्वांवर तुम्ही स्वतःच समाधान शोधून काढाल. कुटुंबातील कोणत्यातरी सदस्याची तब्येत खराब झाल्याने तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. अध्यात्माकडे तुमचा ओढा राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही छोटीशी ट्रीपही काढाल. कुठल्या धार्मिक स्थळीही तुम्ही जाऊ शकता. नवीन वाहन अथवा नवीन घरातही शिफ्ट होऊ शकतात. एकंदरीत हे वर्ष तुम्हाला खूप चांगले अनुभव देईल. यावर्षी आई-वडिलांसोबत तुमचे चांगले संबंध राहतील पण भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. हे वाद जास्त मनावर घेऊ नका. कोणताही गैरसमज तुमच्याबाबतीत पसरणार नाही याची काळजी घ्या. प्रेम आणि दांपत्य जीवन : प्रेमसंबंधासाठी हे वर्ष चांगले राहणार आहे. जर तुम्ही एकमेकांना समजून घ्याल तर तुमचे नाते अजूनच मजबुत होईल. काही सुखद बदलही यादरम्यान घडतील. यावर्षात तुम्ही रोमँटीक डेटवर जात एकमेकांसोबत खूप चांगला वेळ व्यतीत कराल. निसर्गरम्य ठिकाणी फिरायलाही तुम्ही जाऊ शकतात. लव्ह मॅरेज करणाऱ्यांनाही सफलता मिळेल. वर्षाच्या शेवटी एक्सट्रा अफेअरमुळे तुम्ही चिंतीत व्हाल. यामुळे जोडीदारावर संशयही घ्याल. पती-पत्नीच्या संबंधामध्ये या काळात सुधारणा होईल. वर्षाच्या अखेरीस तुम्हाला धोका मिळू शकतो. आरोग्य : नवीन वर्षात तुम्हाला कामासोबतच आराम करण्याची गरज आहे. मानसिकदृष्ट्या तुम्हाला थकवा जाणवेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या कामकाजाच्या ठिकाणी जाणवेल. यासाठी तुम्ही काही दिवस सुट्टी घेऊन आराम करण्याची गरज आहे. मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत वेळ घालवा यामुळे तुमच्यात एक नवीन उर्जा येईल. किडनीसंबंधित विकार डोके वर काढतील त्याकडे लक्ष असू द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. उपाय - शंकराची उपासना करा - रोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला. - शनिवारी अखंड उडदाची डाळ, काळे कपडे, मोहरीचे तेल दान करा.

सिंह जॉब आणि बिझनेस : यावर्षी कार्यक्षेत्रात अपोझिट जेंडर असलेल्या लोकांसोबत मैत्रीचे संबंध बनवण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कार्यस्थळी तुमचा मान वाढेल. यंदाच्या वर्षी तुम्हाला उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा योगदेखील आहे. ऑफिसमध्ये चालणा-या गॉसिपिंगपासून लांब राहा. वर्षातील पहिले दोन महिने तुम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यावर्षभरात कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागले, त्यामुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवू शकतो. थकव्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमेतवर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला विश्रांती घेणे गरजेचे असेल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही लोकांची मदत मिळू शकते. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये बिझनेस केला, तर जास्त फायदा होऊ शकतो. आयात-निर्यात, ट्रान्सपोर्ट, संचार याच्याशी निगडीत व्यवसाय केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. अचानक आलेली संधी तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकेल. प्रॉपर्टी, संचार, कपडे, रेस्तराँ, बेकरी, इलेक्ट्रिक यांच्याशी निगडीत व्यक्तांनी फायदा होण्याचा योग आहे. एकंदरीत हे वर्ष करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरेल. आर्थिक स्थिति : सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक स्थैर्यता देणारे आहे. वर्षभर तुम्हाला आर्थिक चणचण जाणवणार नाही. अडकलेला पैसा याकाळात परत मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याचा योग आहे. शेअर,कमोडिटी किंवा एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. जमीनत गुंतवणुक करण्याचे योग आहेत. सेविंग वाढू शकते. प्रमोशनसोबत पगारात वाढ होईल. मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक करणे योग्य ठरेल. विदेशी व्यापारातूनसुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती विकून नवीन घर खरेदी करण्याचे योग दिसतात. एक्स्ट्रा इनकम करण्यात यशस्वी व्हाल. उधार पैसे देताना सावधगिरी बाळगा. उत्साहात गुंतवणूक करण्यापासून स्वतःला रोखा. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक स्थिती : यावर्षी कुटुंबाची तुम्हाला चांगली साथ लाभेल. आईवडिलांच्या आशीर्वादाने विचारात असलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत नात्यात आणखी मधुरता वाढेल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रा कराल. कुटुंबात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. बहीणभावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. यावर्षभरात कामाच्या निमित्ताने काही काळ तुम्हाला कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. घरगुती उपयोगाच्या वस्तूंची खरेदी कराल. प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणात फायदा होऊ शकतो. नवीन घर खरेदी करण्याचे योग आहेत. प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह लाइफमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. प्रियकर-प्रेयसीचे किंवा पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. विचार पटत नसल्याने नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. आक्रमक होऊ नका. ही अनबन फार काळ टिकणार नाही, लवकरच तुमच्यातील मतभेद दूर होऊन नाते पुर्वपदावर येऊल. यावर्षी सिंगल असलेल्यांच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळतील. विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहायला हवे. एक्स्ट्रा अफेअरची स्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्य : आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. क्षमतेपक्षा अधिक कष्ट केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम घडू शकतो. जीवनशैलीत बदल करुन खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवात. अधिक मसालेदार पदार्थ खाणे टाळा. आळस टाळा आणि कामावर लक्ष केंद्रिक करा. सिंह राशीच्या लोकांना डोकेदुखी आणि टोंगळ्यांचे दुखण्याचा त्रास जाणवू शकतो. हा त्रास तुम्हाला वर्षभर राहू शकतो. गळा आणि पोटाच्या संदर्भातील तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे तब्येतीकडे विशेष लक्ष असू द्या. बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः जुन-जुलै आणि सप्टेंबर महिन्यात अधिक काळजी घ्या. गर्भवती महिलांनी जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. उपाय- - सुर्याला जल अर्पण करा. - लाल कपड्यांत गहू दान करा. - रविवारी मीठ खाऊ नका. सपक जेवण करा.

कन्या जॉब आणि बिझनेस : या वर्षी कन्या राशीचे काही लोक नोकरी बदलू शकता. यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला यापेक्षा चांगले ऑप्शन मिळू शकतात. नोकरी करणा-या लोकांच्या कामात येणारे अडथळे हळुहळू दूर होऊ शकतात. कधी-कधी कामावरुन तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली राहिल. कार्यस्थळावर तुमचे काम खुप चांगले राहिल. या वर्षी काही दिवस कन्या राशीच्या लोकांना मेहनतीच्या हिशोबाने योग्य फळ मिळू शकणार नाही. यामुळे तुम्ही चिंतित होऊ शकता. धीर ठेवा आणि पुढे जा. लवकरच योग्य वेळ येईल. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, हा ग्रह बुध्दि आणि व्यापाराचा कारक आहे. बुधाच्या प्रभावाने नवीन व्यापार आणि कमासंबंधीत केलेल्या प्रवासात फायदा होऊ शकतो. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर चांगल्या सॅलरीसोबत प्रमोशन मिळू शकते. प्रिटिंग, कपडे किंवा स्टीलसंबंधीत काम करत असाल तर मोठे फायदे मिळतील. एकंदरीत करियरच्या हिशोबाने हे वर्ष चांगले राहिल. आर्थिक स्थिती : तुमची आर्थिक स्थिती यावर्षी चांगली राहिल. नोकरी करणा-या लोकांची इनकम वाढू शकते. कामासंबंधीत प्रवासाचा योग जुळत आहे. विदेश यात्राही होऊ शकते. यावर्षी सेविंग वाढवण्यात तुम्ही यशस्वी ठरु शकता. जानेवारीमध्ये तुमचा फायदा वाढू शकतो. स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. नवीन व्यापार सुरु करण्यासाठी दिवस चांगला आहे. यामध्ये तुम्हाला फायदा होईल. जोखिम असलेल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे टाळावे. तसेच वर्षाच्या मधल्या काळात कुटूंबासोबत प्रवास करण्याचे योग आहेत. यामध्ये खर्च वाढू शकतो. बिझनेसमध्ये अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन पुढे चला. देवाण-घेवाण आणि हिशोब सावधगिरीने करा. एखादा विश्वासू व्यक्ती धोका देऊ शकतो. कौटूबिक स्थिती : या वर्षी कुटूंबातील लोकांसोबत वादविवाद करणे टाळावे. एखाद्या गोष्टींवरुन वाद असेल तर एकत्र बसून शांतते मिटवून घ्या. कुटूंबासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करा. या काळात कुटूंबातील लोक एकमेकांसोबत वेळ घालवतील. यामुळे कुटूंबातील लोकांमध्ये होणारे वाद दूर होऊ शकतात आणि प्रेम वाढू शकते. या काळात तुम्ही धार्मिक कार्यांचे नियोजन कराल. संसारीक जीवनासाठी वेळ चांगला आहे, काही वादांमुळे अडचणी येऊ शकतात. समाजिक स्थान वाढवण्यासाठी सुवर्ण संधी मिळतील. काम जास्त असल्यामुळे तुम्ही थोडावेळ चिंतित होऊ शकता. तर ऑक्टोबर महिन्यात पार्टनरची प्रकृती खराब होऊ शकते. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह लाइफसाठी हा काळ कंफ्यूजन असणारा आहे. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. गैरसमजांमुळे पार्टनरसोबत ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दोघं एकमेकांना खुप काही ऐकवाल. तुम्ही या गोष्टींवर लक्ष न देता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपला राग कंट्रोल करा. जोडीदारासोबत बोलत असताना धीर ठेवा आणि शांततेत बोला. फेब्रूवारीनंतर संबंधांमध्ये गोडवा येईल. पार्टनरसोबत फिरायला जाऊ शकता. तुम्ही अविवाहित आहात आणि एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर करु शकता. तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल. पति-पत्नीच्या संबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात. कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. कोणताही निर्णय आपल्या मनाने घ्या. आरोग्य : कन्या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याला प्रायोरिटी द्यावी. खराब रुटीन लाइफमुळे आरोग्यासंबंधीत अडचणी येऊ शकतात. जॉइंट पेन, इनडायजेशन आणि डोकेदुखीची शक्यता आहे. खराब आरोग्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. वर्षाच्या मधल्या काळात तुमचा जोश आणि उत्साह कमी होऊ शकतो. कामात मन लागणार नाही. झोप पुर्ण न झाल्यामुळे थकवा जाणवेल आणि तुम्ही आक्रमक होऊ शकता. वाहन काळजीपुर्वक चालवा. जखमी होण्याचे योग आहेत. घर आणि घराबाहेर दोन्हीही ठिकाणी सावध रहा. हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या समस्या असणा-या लोकांनी नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलांच्या आरोग्यावर लक्ष द्या. आपल्या रुटीनमध्ये बदल करा. उपाय - गायीला पोळी खाऊ घाला. - हनुमनाला दिवा लावा. - नागरमोथाचे मुळ धारण करा.

तुळ जॉब आणि बिझनेस : नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुमचे कसोशीने प्रयत्न असतील. तुम्हाला पुढे जाण्याच्या नव्या संधीही मिळतील आणि त्यांचास फायदाही होईल. प्रमोशनच्या रुपात तुम्हाला कष्टाचे फळ मिळू शकते. पगार वाढण्याचे योगही आहेत. अधिकारीही तुमची मदत करतील. कमी काळात तुमचा प्रगती होऊ शकते. तुमच्या यशामुळे तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांमध्ये ईर्ष्यादेखिल निर्माण होऊ शकते. पण तुमचे लक्ष केवळ कामावर असायला हवे. बोलण्यावर लक्ष ठेवा. वादांमुळे कामाच्या ठिकाणी वातावरण बिघडण्याचीही शक्यता आहे. व्यावसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष अचानक मिळालेल्या फायद्याचे ठरू शकते. करिअरमध्ये काही खास बदलही होऊ शकतात. उत्पन्नही चांगले मिळू शकेल. कामकाजात तुम्ही काहीतरी नवे करण्याच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकता. यावर्षी कमाईचे नवीन मार्गही सापडतील. विदेशवारी होण्याचीही शक्यता आहे. आर्ट्स, बॉलिवूड, डिझायनिंग, फॅशन, आर्किटेक्ट, प्रिटिंग, मीडिया आणि कॉस्मेटिकशी संलग्न व्यवसायाला मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती : यावर्षी आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अक्टूबर 2018 मध्ये तुम्ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अधिक परिश्रम घ्याल. जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ आर्थिक स्थितीसाठी चांगला आहे. या काळात कमाई अचानक वाढू शकते. नव्या व्यवसायात गुंतवणुकीचे नियोजनही करू शकता. त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्लाही नक्की घ्या. जुने कर्ज असेल त्याची फेडही करू शकाल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. शेयर मार्केट आणि कमोडिटीशी संबंधित लोकांना अपेक्षेपेक्षा अधिक फायदा होऊ शकतो. इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या मदतीनेही धन लाभ होण्याचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांचे पगार आणि पद दोन्ही वाढू शकते. नोकरी बदलायची इच्छा असेल तर काही चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात. वर्षाच्या मध्यापर्यंत आणि सप्टेंबरपर्यंत तुम्ही सुख सुविधांवर अधिक खर्च करू शकता. फालतू खर्च झाल्याने तणावही निर्माण होऊ शकतो. फालतू खर्च झाल्यास तणावही वाढू शकतो. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगायला हवी. वादांची शक्यता निर्माण झाली आहे. प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणात घाई केल्यास नुकसान होऊ शकते. कौटुंबीक स्थिती : कौटुंबीक जीवनासाठी हे संपूर्ण वर्ष संमिश्र असू शकते. वर्षाच्या सुरुवातीला उत्साह जास्त असेल. यादरम्यान तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही जास्त असेल. हळू हळी काही कौटुंबीक कारणांमुळे तुमचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. अनेक बाबतीत तुम्हाला वाटते तसे घडणार नाही. कारण लाईफ पार्टनरबरोबर काही वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. विचार करून बोला. कुटुंबातील कोणाला वाईट वाटेल असे काहीही बोलणे टाळा. नात्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. वैवाहिक आणि गृहस्थ जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वाद टाळा. व्यस्त वेळापत्रकामुळेही कुटुंबातील वातावरण बिघडू शकते. तुमच्या कुटुंबालाही कमी वेळ देऊ शकाल. याकाळात कुटुंबाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असेल. मुले आणि लाईफ पार्टनरला वेळ देण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाबरोबर विदेशवारीचे योगही आहेत. घरात एखाद्या शुभकार्याचे आयोजन करू शकता. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : प्रेम प्रकरणांमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण घाबरू नका. हे होईल ते चांगलेच होईळ. या वर्षातील तीन महिन्यांनंतर तुमच्या साथीदाराबरोबर चांगला काळ असेल. नात्यात गोडवा वाढेल. साथीदारासाठी महागडे गिफ्टही खरेदी करू शकता. वर्षाच्या अखेरच्या महिन्यांत लव्ह लाईफसाठी अधिक चांगला काळ असेल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरू शकते. संतानप्राप्ती होईल. अविवाहित लोकांचे विवाह होऊ शकतात. मनाप्रमाणे लग्नाचे योगही आहेत. एखाद्याकडे आकर्षित असाल किंवा प्रेम करत असाल तर प्रपोज करू शकता. त्यासाठी चांगला काळ आहे. पार्टनरशी बोलताना सावध राहावे लागेल. आरोग्य : यावर्षी खाण्या पिण्याच्या सवयी बदलायला हव्या. स्वतःवर लक्ष द्यावे लागेल. तेल-मसाला आणि जास्त तिखट जेवण टाळा. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागेल. बेपर्वाईमुळे त्रास आणि जुने आजार पुन्हा बळावू शकतात. जखमी होण्याचीही शक्यता आहे. उपकरण किंवा गाडी चालवताना सावध राहा. डोळ्यांशी संबंधित त्रासही होऊ शकतो. चष्मा असेल तर नंबर वाढू शकतो. लहान ऑपरेशन होण्याचीही शक्यता आहे. हृदय आणि लिव्हरसंबंधी त्रासापासून सावध राहावे लागेल. कामातून आरामासाठीही वेळ काढावा लागेल. जास्त कामामुळे थकावट होऊ शकते. नस किंवा त्वचेशी संबंधीत त्रास होण्याची शक्यता आहे. याचवर्षी बॅकपेन आणि सांध्यांच्या आजारामुळे त्रास होऊ शकतो. उपाय - लक्ष्मीमातेला पांढरे फूल अर्पण करा. - पुरुषांनी स्त्रीला आणि स्त्रीने पुरुषाला अत्तर किंवा डिओ गिफ्ट करावा - मंदिरात तांदूळ दान करा.

वृश्चिक जॉब आणि बिझनेस : यश आणि उत्पन्न वृद्धीसाठी आपल्याला यंदा जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये आपल्यावर जळणारे सहकारी असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. वेळ किती मौल्यवान आहे, हे समजून कामाच्या वेळेत कामच करा. वृश्चिक राशीतील लोकांना बिझनेसच्या वृद्धीसाठी प्रवासाचे योग आहेत. नोकरी करणार्यांसाठी मात्र, हे वर्ष थोडं अडचणीचे आहे. त्यांना नोकरीत अनेक अडचणीचा सामना करण्याची तयारी करावी लागेल. बिझनेसमध्ये गुंतवणुकदारांसाठी हा काळ योग्य नाही. स्टील, ब्यूटीपार्लर, गारमेंट आणि इंपोर्ट-एक्स्पोर्टच्या बिझनेससाठी हे वर्ष उत्तम आहे. आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या. तो आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. यंदा पैशाची बचत करण्यासाठी आपल्याला मोठी कसरत करावी लागू शकते. सप्टेंबरपर्यंत तुमचा अडकलेला पैसा मिळेल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकतात. त्यातून मोठा लाभ मिळण्याची शक्यता. शॉर्टटर्म गुंतवणूक करता येईल. त्यातूनही लाभ मिळेल. आर्थिक स्थिती ऑक्टोबरपर्यंत उत्तम राहिली. परंतु सावधगिरी बाळगावी लागेल. नवा बिझनेस सुरु करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घेणे-देण्याचे व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. लॉटरी, सट्टा, शेअर आणि कमोडिटीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती : यंदा तुम्ही जास्तीत जास्त वेळ कुटुंबियासोबत घालवाल. यामुळे आपल्याला आपल्या रुटीन लाइफमध्ये बदल करावा लागेल. कौटुंबिक वाद मिटतील. नात्यांमधील आपुलकीचा ओलावा कायम ठेवण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा लागेल. कुटुंबात मोठे मंगल कार्याचे योग आहेत. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वर्षाच्या मध्यांत अडचणीचा सामना करावा लागेल. कामानिमित्त काही दिवस कुटुंबियांपासून लांब राहावे लागू शकते. त्यामुळे आपल्याला पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये संतुलन ठेवावे लागेल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी यात्रेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. नव्या ओळखी होतील. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : यंदा प्रेमीयुगुल आणि दाम्पत्यांसाठी यंदाचे वर्ष उत्तम आहे. लाईफ पार्टनरसोबत पिकनिकला जाण्याच प्लानिंग कराल. पार्टनरचे योग्य सहकार्य मिळेल. काही वेळा परस्परांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु त्यावर चर्चातून मार्ग काढा. वैवाहिक जीवनात आनंदाची लहर येईल. पार्टनरला सरप्राईज गिफ्ट देता येईल. त्यामुळे परस्परांमधील नाते आणखी घट्ट होईल. परंतु राशीतील लोकांनी विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहा. अविवाहित तरुण-तरुणींचा विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरीच्या ठिकाणी विभिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात. आरोग्य : वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हॉटेलिंगवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्याला सांधदुखी, डोडा तसेच पोटाचे आजार हळून डोके वर काढू शकतात. कामाचा व्याप वाढल्याने आयोग्यासंबधित गंभीर समस्या उद्धभवू शकते. मसालेदार पदार्थांपासून लांब राहावे लागेल. वर्षाच्या चौथ्या महिन्यापासून आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. सप्टेंबर, ऑक्टबर आणि डिसेंबरपर्यंत प्रकृतीत सुधारणा होईल. वृश्चिक राशीच्या गरोदर महिलांना इंफेक्शन होण्याची शक्यता आहे. औषधी वेळात घ्या. उपाय- - केशर आणि चंदनाचा टिळा दररोज कपाळावर लावाला. - काटेरी रोपट्याला तांब्याच्या भांड्याने पाणी घाला. - वडच्या झाडाला दूध अर्पण करा.

धनु जॉब आणि बिझनेस : नवीन वर्षात उद्योगात गुंतवणूक करणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते. उद्योगात वडिलांच्या सहकाऱ्याने नफा वाढू शकतो. नवे घर किंवा वाहन खरेदीचे योग जुळत आहे. स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावल्यास फायदा होऊ शकतो. तरीही, जास्त जोखम घेऊन नये. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला आवश्य घ्या. आर्थिक व्यवहारांबद्दल सावध राहा. पैश्यांशी संबंधित कागदपत्रे सांभाळून ठेवा. नोकरीपेशा आणि बिझनेसवाल्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, अन्यथा दगा मिळू शकतो. नोकरीपेशा लोक सुद्धा कार्यालयात राजकारणाची बळी ठरू शकतात. नोकरीपेशा लोकांना नवीन वर्षात पुढे जाण्याची चांगली संधी येऊ शकते. नववर्षात आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. काही प्रकल्पांवर अधिकची मेहनत सुद्धा घ्यावी लागेल. बिझनेस करणाऱ्यांसाठी सुरुवातीचे 4 महिने फायदेशीर ठरू शकतात. एक्स्ट्रा इनकमचा देखील योग आहे. पैश्यांची कमतरता भासणार नाही. आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकते. चांगला पगार आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. सोबतच आपल्या कार्याचे कौतुकही होऊ शकते. आर्थिक स्थिती : नोकरीपेशा आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी ही चांगली वेळ आहे. नोकरीपेशा लोकांचा पगार वाढू शकतो. आर्थिक स्थितित सुधारणा होण्याचा योग आहे. पैश्यांची कमतरता राहणार नाही. वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याची योग आहे. एक्स्ट्रा इनकमचे स्रोत मिळतील. स्थावर आणि जंगम मालमत्तेतून आपल्याला धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीचा या वर्षी चांगला नफा मिळू शकतो. महागड्या वस्तू किंवा दागिन्यांमध्ये पैसा लावू शकता. नवीन वर्षात गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. फालतू गोष्टींमध्ये खर्च वाढू शकतो. एप्रिल आणि मे महिन्यात सेव्हिंग कमी होईल. एखाद्या प्रकारचा चालान किंवा पेनल्टी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. सुख-सुविधा आणि मनोरंजनावर जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती : कौटुंबिक बाबतीत नवीन वर्ष संमिश्र स्वरुपाचे असू शकते. कुटुंबियांसाठी आपण काही चांगले करण्याच्या प्रयत्नात आपल्या इच्छा दाबताना दिसून येऊ शकता. कुटुंबातील जबाबदार व्यक्ती या नात्याने आपण सर्वांची मदत सुद्धा करू शकता. आपल्या प्रयत्नांमुळे परिवारात हसरे वातावरण राहील. सगळेच सुखी आणि समाधानी राहतील. मात्र, आपल्यावर कामाचा ताण अधिक असल्याचे काही वेळा आक्रामक सुद्धा होण्याची शक्यता आहे. तरीही आपले कुटुंबीय आपल्याला समजूनच घेतील. अशा परिस्थितींमुळे पैश्यांचे व्यवहार जपूनच करावे अन्यथा नातेसंबंध खराब होऊ शकतात. नकारात्मक लोक आणि प्रवृत्त्यांपासून दूरच राहिलेले बरे आहे. कुटुंबियांनी आपल्याला दूर केले, किंवा ते आपल्यावर प्रेम करत नाहीत असा विचार मनात मुळीच आणू नका. अशाने आपल्या कुटुंबियांसोबत संबंध खराब होऊ शकतात. लाइफ पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या. त्याला तक्रारीची संधी देऊ नका. प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह लाइफ संदर्भात नवीन वर्ष चांगले राहील. या वर्षी आपण पार्टनरसोबत अधिक रोमॅन्टिक समय घालवणार अशी शक्यता आहे. फोन किंवा इतर माध्यमातून आपण आपल्या पार्टनरच्या नेहमीच संपर्कात राहाल. या राशीतील लोकांना लव्ह लाइफमध्ये पालकांची मदत मिळेल. तर वैवाहिक जोडपे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतील. काही जुने गैरसमज असल्यास या वर्षी दूर होतील. प्रियकर किंवा प्रेयसीसोबत संबंध पुढे नेण्याचा, लग्न करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष अनुकूल आहे. नकारात्मक वृत्तींपासून दूर राहावे लागणार आहे. आपल्या पार्टनरवर बळजबरी किंवा निर्णय लादण्याचे प्रकार नकोच. नवीन वर्षांच्या पाचव्या महिन्यात रुष्ट व्यवहारांमुळे काहीसा दुरावा होऊ शकतो. ही परिस्थिती कायमची राहणार नाही. वर्षभर लव्ह लाइफमध्ये चढ आणि उतार येत राहतील. पार्टनरशी संबंध पारदर्शक ठेवा. पार्टरवर विश्वास ठेवा आणि संशय घेऊच नका. आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी महागडे गिफ्ट घेण्याची शक्यता आहे. अविवाहित असाल तर या वर्षी विवाहाचे योग आहे. सिंगल लोकांच्या आयुष्यात खास व्यक्ती येईल. प्रेमाचे प्रस्ताव येतील. आरोग्य : आरोग्याच्या बाबतीत नवीन वर्ष ठीक राहील. हल्क्याशा दुखापतीच्या घटना घडू शकतात. मात्र, परिस्थिती लवकरच बरी होईल. यावर्षी हाडाला दुखापत होऊ शकते, त्यामुळे सांभाळूनच राहावे. नवीन वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आरोग्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे, पुढील सहा महिने आरोग्याची कटाक्षाने काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही. या वर्षी कुठल्याही मोठ्या आजाराने त्रास होण्याचा योग नाही. फूड पॉइझनिंग आणि आरोग्याच्या समस्य टाळण्यासाठी ताजे आणि गरम अन्नच खाल्लेले बरे. फास्ट फूडपासून दूर राहिल्यास उत्तम. या वर्षी आपल्या पोट आणि डोळ्यांशी संबंधित त्रास होऊ शकतात. या वर्षी मधल्या महिन्यांमध्ये आपल्याला शरीरात चमक किंवा दुखण्याचे त्रास उद्भवू शकतात. औषधी वेळेवर घ्या. अन्यथा छोटेस दुखणे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांना आरोग्यावर दुर्लक्ष करणे महाग पडू शकते. जुन्या आजारावर उपचार घेत असताना या वर्षी सकारात्मक उपचार होऊ शकतो. उपाय - सात प्रकारचे अन्नाधान्य दान करा - पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करा - हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचे दिवे लावा

मकर जॉब आणि बिझनेस : जॉब आणि बिझनेसबाबत वर्षाच्या सुरुवातीलाच सावधानता बाळगायला हवी. 3 महिन्यांनंतर कार्यक्षेत्रात स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांनी या वर्षी कोणतीही जोखीम घेऊ नये व घाईने निर्णय घेऊ नयेत. व्यवसाय करणाऱ्यांनीही मोठी गुंतवणूक टाळावी. नोकरी करणाऱ्यांनी विवादांपासून दुर राहण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या मागे तुमच्या विरोधात कट रचण्यात येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अनावश्यक चर्चेपासून दुर राहावे. नाहीतर गोत्यात येण्याची शक्यता आहे. सगळ्यांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. एखादा नवा प्रोजेक्टही मिळण्याची शक्यता आहे. विचार करुनच गुंतवणूक करावी. घाईने निर्णय घेण्यापासून दुरच राहा. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याचा व्यवसायात फायदा होईल. यावर्षी तुमचे उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक मार्ग होऊ शकतात. रेस्टॉरंट, लोखंड, स्टील, कापड आणि आयात-निर्यातीचा उद्योग केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. या वर्षी पार्टनरशीपमध्ये काम करु शकता. एखाद्या महिन्यात तुम्हाला अचानक मोठा लाभ होऊ शकतो. कामकाजासाठी केलेला प्रवासही फलदायी होऊ शकतो. तुमचे कामकाज परदेशाशी नगडित असल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. वित्तीय बाबींबद्दल अधिक सावधानता बाळगावी. कोणत्याही कागदपत्रांवर ते न वाचता स्वाक्षरी करु नये. आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारावी आणि उत्पन्न वाढावे यासाठी तुम्ही जास्त मेहनत कराल. त्यात तुम्ही काही अंशी यशस्वीही व्हाल. आई-वडिलांची आणि तुमच्या पती अथवा पत्नीची यात तुम्हाला पुर्ण साथ मिळेल. पैशाबाबत विचारपुर्वक निर्णय घ्या, त्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. तुम्हाला यावर्षी उत्तम आर्थिक नियोजन करावे लागणार आहे. तुम्हाला जबाबदारीचे काम मिळू शकते. पण आर्थिक व्यवहार करताना अतिशय काळजी घ्या. ऑक्टोबर महिन्यात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. जसे चालू आहे तसेच चालु राहु द्या. पैशाबाबत हा काळ चढ-उताराचा असेल. नोकरी आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ चांगला नाही. कर्ज देण्यासाठी आणि घेण्यासाठीही हा काळ चांगला नाही. मालमत्तेबाबत या काळात तुम्हाला त्रास होऊ शकतो. खर्च देखील वाढतील. नोकरी करणाऱ्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. पगारात अपेक्षापेक्षा कमीच वाढ होईल. व्यवसायातही जोखीम घेऊ नका. मोठी गुंतवणूक करण्यापुर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. विचारपुर्वकच गुंतवणूक करा. कौटुंबिक स्थिती : हे वर्ष तुम्हाला संमिश्र राहणार आहे. आध्यात्माकडे तुमचा ओढा असेल. वैवाहिक जीवनात मात्र काहीशा अडचणी येतील. ही स्थिती काही दिवसांसाठीच असेल. त्यानंतर मात्र तुमचे संबंध सुधारतील आणि सर्व काही सुरळित होईल. तुमच्या आर्थिक प्रगतीतही तुमच्या घरातील व्यक्तींचे तुम्हाला सहकार्य लाभेल. विनाकारण शंका घेऊन वाद घालण्याचे मात्र तुम्ही टाळायला हवे. कदाचित त्यामुळे त्यांच्या भावना दुखावतील. यावर्षी आपण नवे घर खरेदी करु शकता. घरात मंगल कार्य घडु शकते. संतान सुःख लाभु शकते. घरातील सगळे सदस्य विशेषत: बहिण आणि भाऊ तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील. वडिलांच्या आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कुटुंबासोबत तुम्ही कदाचित फिरायलाही जाल. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : वैवाहिक जीवन आणि प्रेम-संबंधांसाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या दोघांमधील संबंधात मधुरता येईल. तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. पार्टनरसोबत मतभेद होऊ नयेत याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. एकट्या असणाऱ्यांना लव प्रपोजल मिळेल. तुम्हाला काही लक्षात राहतील असे क्षण तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत अनुभवता येतील. पण तुमचा विवाह होण्यात मात्र अडचणी येतील. विवाहित लोकांच्या जीवनात मात्र सौख्य असेल. काही जणांचे ब्रेकअपसुध्दा होईल. आरोग्य : आरोग्याबाबत तुम्हाला यावर्षी विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमची जुनी दुखणी पुन्हा उद्भवू शकतात. अपघात आणि ऑपरेशन होण्याचीही शक्यता आहे. हाडांचे आणि नसेबाबत आजार होऊ शकतात. तणावामुळे डोकेदुखी सारखे आजार होऊ शकतात. स्वत:साठी वेळ काढणे तितकेच महत्वाचे असल्याचे या काळात तुमच्या लक्षात येईल. पाण्यापासून पसरणारे आजारही होऊ शकतात. पोटाचे आजार होण्याची शक्यता असल्याने अन्न सेवन करताना काळजी घ्या. आळस आणि निद्रानाशासारखे आजार अथवा सवयी जडू नयेत याची काळजी घ्या. आपल्या वडिलांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्या. गर्भवती महिलांनी थोडाही निष्काळजीपणा दाखवू नये तो त्यांना महागात पडू शकतो. उपाय- - मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांडाचे पठण करा. - हनुमान मंदिरात लाल झेंडा अर्पण करावा. - पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.

कुंभ जॉब आणि बिझनेस : या वर्षी कुंभ राशीतील नोकरी आणि व्यवसाय करणारे लोक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यात नोकरी करणा-या लोकांना यंदाचे वर्ष खास राहील. काही विशेष अचीवमेंट मिळवू शकतील. या वर्षात आपण कठोर मेहनत घेणार असून त्याचा परतावाही तुम्हाला मिळणार आहे. आपल्या कष्टाचे कौतूक होईल. नोकरीत प्रमोशन होईल आणि पगारवाढही होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळत राहील. या वर्षी तुम्ही सकारात्मक विचाराने काम करत राहणार आहात. ऑफिसमध्ये होणा-या वादापासून तुम्हाला दूर रहावे लागेल. या वर्षी तुमच्यावर नविन जबाबदारी येण्याची शक्यता आहे तसेच ती जबाबदारी तुम्ही यशस्वीरित्या हाताळू शकणार आहे. आपल्या क्षमतेत वाढ होईल. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा, काही छोटे-मोठे वाद ओढावण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला ऑफिसच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याचा योग आहे. वर्षाच्या सुरूवातीला महिने तुम्हाला थोडे संभाळून राहावे लागेल. संयमाने काम करा. अवघड कामे घाई- गडबडीत करू नका. इतर कमाईसाठी नवे काहीही करू नका त्यातून फार काही मिळण्याची शक्यता नाही. वर्षाच्या शेवटच्या काळात नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत सावध राहा. व्यवसाय करणारे लोक यंदा आपला बिजनेस वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकतात. जुनी गुंतवणूक या कामासाठी उपयोगात आणता येईल. वर्षाच्या सुरूवातीला तीन महिने पार्टनरशिपमध्ये काम करू नका. त्यानंतर पुढील दोन महिन्यात तुम्हाला मोठे फायदे होऊ शकतात. बचत आणि उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. या काळात तुमची अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती : या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणा-या लोकांचे उत्पन्न वाढणार आहे. व्यवसाय करणा-या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. इतर इनकमाचे मार्ग सापडतील. पुरूषांना महिलांपासून तर महिलांना पुरूषांपासून (अपोजिट जेंडर) धनलाभ होऊ शकतो. कोणत्याही ठिकाणी तुम्ही पैसा लावला तरी त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे. जुने कर्ज फेडणार आहात. बचत वाढविण्यासाठी इंटरनेट, म्यूचुअल फंड, प्रॉपर्टी, शेयर बाजार आणि कमोडिटी आदी ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्ही फायद्यात राहाल. कला, डिझायनिंग, फॅशन, आर्किटेक्ट आणि निर्यातीशी संबंधित लोकांना यंदा विशेष लाभ होईल. मात्र, बचत करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागेल. मार्च ते जुलै या काळात आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात तुमचे उत्पन्न कमी होईल. या काळात घाई-गडबडीत निर्णय घेऊ नका. या काळात कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या कोणी तुमची फसवणूक करू शकते. कौटुंबिक स्थिती : या वर्षी आपले कौटुंबिक जीवन पहिल्यापेक्षा चांगले राहील आणि आयुष्य चांगले जाईल. जीवनसाथीकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. या वर्षी तुमच्या घरात शांती, समाधान राहील. त्यामुळे एखादे नवे काम सुरू शकता. घरातील मंडळींची पॉलिसी काढणे किंवा त्यांच्या नावावर गुंतवणूक करण्याचे नियोजन करू शकता. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा आवराव्या लागतील. यंदा तुम्ही मनापासून काम करणार आहात. या वर्षी 15 मार्चनंतर तुम्हाला काही कौटुंबिक समस्या निर्माण होतील. या काळात तुम्ही तुमचा राग नियंत्रणात ठेवा. कौटुंबिक काही निर्णय या काळात घेणे तुम्ही टाळा. वैवाहिक जीवनात काही काळाकरता तणाव निर्माण होऊ शकतो. या वर्षी काही कौटुंबिक वाद उदभवू शकतात. मात्र, तुम्ही त्यावर मात करू शकताल. काही कटू निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. शक्यतो असे निर्णय घेणे टाळा. हळू हळू मनातील घालमेल दूर होईल. कोणाच्या भानगडी सोडविण्याच्या नादात पडू नका, अंगलट येईल. यंदा तुम्ही घरातील मंडळी व मित्रांसमवेत फिरायला जाण्याची योजना बनवू शकता. वर्षाअखेर घरात एखादे लग्नसमारंभ किंवा पूजा-पाठ याचे आयोजन होऊ शकते. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल आणि चांगले नातेसंबंध राहतील. प्रेम आणि वैवाहिक आयुष्य : लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्यात यंदा चढ- उतार येतील. आपल्याला समिश्र निकाल मिळतील. सुरूवातीच्या काळात पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. या काळात आपल्या इच्छा दाबाव्या लागतील. एक- दुस-यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपला राग नियंत्रणात ठेवा. बोलण्याआधी दहा वेळा विचार करा. सुरूवातीच्या 3 महिन्याच्या काळात लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. एप्रिलनंतर आपल्या नात्यात सकारात्मकता येईल. तुमचे प्रेम, नाते मजबूत होईल. लव्ह मॅरेज करणा-या लोकांनी सावधानता बाळगावी. वर्षाच्या सुरूवातीला लग्नासारखे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आई-वडिल व इतर नातेवाईक तुमच्या लग्नाला संमती देणार नाहीत. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव या वर्षात मिळू शकतात. या राशीतील सिंगल लोक एखाद्या व्यक्तीचा विचार करत असतील किंवा रिलेशन सुरू करण्याचा विचार करत असतील तर त्या व्यक्तीला एप्रिल आणि मे महिन्यात प्रपोजल द्या. आरोग्य : आरोग्याबाबतच्या बाबतीत तुम्हाला हे वर्ष ठीक- ठाक राहील. एखादा मोठा आजार किंवा त्रास होण्याची शक्यता नाही. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. जुनाट आजारापासून दिलासा मिळू शकते. मात्र, यंदा छोटी-मोठी दुखापत व आजरपण जरूर होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जे लोक आजारी आहेत त्यांनी हेल्दी रूटीनमधूनच मुक्तता मिळू शकते. या वर्षातील मधल्या सहा महिन्याच्या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. चढ उतार येऊ शकतात. यंदा झोप कमी मिळू शकते आणि पोटाचे आजार उद्धभू शकतात. वाहन आणि मशिन चालवणा-या लोकांनी यंदा सावधानता बाळगावी. गर्भवती महिलांना यावर्षी पोट आणि ओटीपोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. मात्र, थोड्याच दिवसात तुम्हाला दिलासा मिळेल. हाडे आणि वाहिन्याशी संबंघित रोगाने त्रस्त लोकांनी सांभाळून राहावे. फास्ट फूड आणि मसालेदार जेवणापासून लांब राहा. उपाय- - मुंग्यांना पीठ टाका. - शनिवारी सायंकाळी उत्तर दिशेला मोहरीचे तेलाचा दिवा लावा.

मीन जॉब आणि बिझनेस : या वर्षी नोकरी आणि व्यवसाय करणा-या लोकांना कामामध्ये सावधानता बाळगावी लागेल. निष्काळजीपणापासून सावध रहावे. या वर्षातील काही महिन्यामध्ये कामाचा ताण वाढू शकतो. काही कामांमध्ये सहका-यांची मदत मिळणार नाही. त्यामुळे काही महिन्यांमध्ये कामगाजादरम्यान त्रास होऊ शकतो. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने योग्य नाहीत. यादरम्यान मोठी गुंतवणूक करु नका. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कोणत्याही पद्धतीचा बदल करण्याचा प्रयत्न करु नका. या दिवसांत अधिका-यांशी हुज्जत घालू नका. कोणत्याही कामाला टाळू नका. एप्रिलनंतर नोकरी आणि व्यवसायाच्या स्थितीमध्ये सुधार होऊ शकतो. वर्षाच्या शेवटी एक्स्ट्रा इन्कमच्या काही खास संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना मनासारखे ट्रान्सफरही मिळू शकते. मीनराशीच्या काही व्यक्तींना पदोन्नती आणि इन्क्रीमेंट मिळू शकते. मोठ्या अधिका-यांपासून मदतही मिळू शकते. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतात. कामकाजासंबंधी प्रवास करण्यास मिळू शकतो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अचानक फायदा होऊ शकतो. या दिवसांत इन्कमचे नवे स्त्रोतही मिळू शकतात. तुमच्या आत्मविश्वासात आणि पद-प्रतिष्ठेतही वाढ होईल. आर्थिक स्थिती : या वर्षी बचत वाढवण्यासाठी तुम्ही सतत मेहनत कराल. यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. आर्थिक बाबीबाबत मार्चनंतरचा वेळ तुमच्यासाठी अधिक बरा असण्याची शक्यता आहे. जून ते ऑक्टोबरदरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ मिळू शकतो. दोन पद्धतीने इन्कम कमावण्याच्या संधीही मिळू शकतात. या दिवसांत नोकरदार व्यक्तीची इन्कम वाढेल तर व्यवसायिकांनाही फायदा होईल. गुंतवणूक करण्यासाठी जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ योग्य नाही. ऑक्टोबर 2018 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी ठिकठाक राहिल. खर्चही वाढेल. व्यवसाय करणा-यांचे फायद्यासोबत नूकसानही होऊ शकते. पैशांच्या व्यवहारात जोखिम घेऊ नका. आर्थिक स्थितीबाबत घाईघडबडीत निर्णय घेऊ नका. पूर्ण वर्ष तुम्ही पैशासाठी तडजोड करत राहाल. बेकायदेशीर कामांपासून तुम्ही दूरच राहिले पाहिजे. इच्छा नसतानाही काही महत्त्वांच्या कामांसाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. भागिदारी करण्यासाठी योग्य वेळ नाही. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीमध्ये सावधानतापूर्वक गुंतवणूक करा. तुम्ही वादात अडकू शकता. कौटुंबिक स्थिती : कौटुंबिक बाबतीत हे वर्ष तुमच्यासाठी खास असेल. नाते आणखी मजबूत होतील. कामकाज आणि इतर प्रकरणात भावाबहिणी आणि वडीलांची मदत मिळेल. वर्षाच्या सुरुवाती दिवसांमध्ये जुन्या गैरसमजुती दूर होतील. गृहस्थी जिवन आनंददायी राहिल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. कुटुंबाचे सदस्य एकमेकांना मदत करतील. लाइफ पार्टनरही मदत मरेल. समाजात तुमचा मान वाढेल. वर्षाच्या सुरुवाती दिवसांमध्ये धार्मिक यात्रेला जाण्याचा योग आहे. या वर्षी धार्मिक आणि अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढेल आणि घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. अधिक काम असूनही तुम्ही कुटुंबाला वेळ द्याल. तुमच्या आनंदासाठी कुटुंबाचे काहि सदस्य आपल्या इच्छा दाबतील. खासगी आणि व्यवसायी आयुष्यामध्ये ताळमेळ बसवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या वर्षी तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करु शकता. यासाठी वडीलांची मदत मिळू शकते. कुटुंबाच्या मदतीने व्यवसायही सुरु करु शकता. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रेम आणि दाम्पत्य जीवन : लव्ह लाईफ आणि दाम्पत्य जीवनासाठी हे वर्ष मिळतेजुळते राहिल. पतीपत्नीचे संबंध ठिकठाक राहिल. वर्षाच्या सुरुवातीच्या 3 महिन्यानंतर लव्ह लाईफशी संबंधित निर्णयामध्ये घाईगडबड करु नका. एखाद्या कारणावरुन जोडीदारासोबत गैरसमजुती होऊ शकतात. जोडीदारावर संशय घेऊ नका. या राशीतील अविवाहित लोकांनी विवाहासाठी घाई करु नये. लव्ह मॅरेज करणा-यांनीही या वर्षी सांभाळून रहावे. वर्षाच्या मध्यामध्ये जोडीदाराशी संबंध सुधारु शकतात. एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि नात्यात पारदर्शकता येईल. या दिवसांत तुम्हाला शारीरीक सुखही मिळू शकते. कार्यक्षेत्रातील भिन्न जेंडरच्या व्यक्ती तुमच्या बोलण्याने आणि व्यवहाराने तुमच्याशी प्रभावित होऊ शकता. या वर्षी मीन राशीच्या विवाहित व्यक्तींनाही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. एक्सट्रा अफेअर टाळावे. जोडीदाराशी प्रामाणिक रहा. या राशीच्या सिंगल व्यक्तींच्या जीवनात जवळची व्यक्ती दाखल होऊ शकते. या वर्षी जोडीदारावर अधिक खर्च होऊ शकतो. जोडीदाराच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्याल. आरोग्य : या वर्षी मीन राशीच्या लोकांचे जुने रोग वर येऊ शकतात. वर्षातील मधले 3 महिने तुम्हाला अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. या वर्षी पोटोचे आजार होण्याची शक्यता आहे. इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. सांधेदुखीही होऊ शकते. नसा आणि स्नांयूचे त्रास वाढण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी हे वर्ष चांगले राहिल. वर्षाच्या शेवटच्या दिवसांत जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना काही दिलासा मिळू शकतो. मीन राशीच्या व्यक्तींनी आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नये. तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो. डोळ्यांचा त्रासही वाढण्याचीही शक्यता आहे. तुम्ही चश्मा लावत असाल तर चश्म्याचे नंबर वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी आरोग्याच्याबाबतीत तुम्ही सावधानता बाळगाल. या वर्षी नवी आरोग्यदायी सवय तुम्ही स्वत:ला लावून घेऊ शकता. उपाय- - केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे. - केशर आणि चंदनाचा टीळा लावावा. - गुरुवारी पिवळ्या कपड्यात हरभ-याची डाळ आणि हळदीचा तुकडा ठेवून दान करावे.
X
COMMENT