Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 gemini horoscope mithun rashi in marathi

वाचा, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:10 AM IST

येथे जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती

 • rashifal 2018 gemini horoscope mithun rashi in marathi

  येथे जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 gemini horoscope mithun rashi in marathi

  जॉब आणि बिझनेस : यावर्षी अधिकारी आणि सोबत काम करणाऱ्यांकडून मदत मिळू शकते. हे लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. या वर्षी मिथून राशीच्या नोकरदार लोकांना मोठे यश मिळण्याचे योग आहेत. तुमची एखादी आयडिया कंपनी किंवा सरकारला कामाची ठरू शकते. नोकरी स्वीच करण्याची इच्छा असलेल्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. या वर्षी चांगले ऑप्शन उपलब्ध होतील. प्रमोशनची शक्यता आहे. सॅलरी वाढण्याचे योग आहेत. मनासारखी ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. राशी स्वामी बुधच्या प्रभावाने तुम्ही घतलेले मोठे निर्णय फायद्याचे ठरतील. तुमच्या कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल होतील. या वर्षी तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडाल. नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठे बदल झाल्याचे दिसून येईल. पण मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. विचारपूर्वक पैसे गुंतवा. बिझनेस पार्टनरसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. पण लवकरच मनभेद दूर होतील. व्यवसाय वाढण्यासाठी योग्य कालावधी आहे. विदेशातील व्यवसायात फायदा होईल. दूर असलेल्या लोकांकडून बिझनेसमध्ये मदत होईल. याचा तुम्हाला फायदा होईल. 

 • rashifal 2018 gemini horoscope mithun rashi in marathi

  आर्थिक स्थिती : ऑक्टोबर २०१८ पर्यंत आर्थिक स्थिती चांगली राहिल. नवीन इन्कम सोर्स मिळतील. त्यातून उत्पन्न वाढेल. जुनपासून ऑक्टोबरपर्यंत आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा वाढेल. इन्क्रीमेंट होईल. बिझनेसमध्ये थांबलेला पैसा मिळेल. लॉटरीतून चांगली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल. या दरम्यान तुम्ही स्टील, कपडे, ब्युटी प्रोडक्ट, मिल्क प्रोडक्ट आणि पर्यटन याच्याशी निगडित व्यवसायात पैसे गुंतवल्याने फायदा होईल. लेन-देन आणि गुंतवणुकीत थोडी सावधता बाळगा. एखाद्या विश्वास माणूस तुमचा विश्वासघात करु शकतो. जोखिम असलेली गुंतवणूक टाळा. अनुभवी लोकांचा सल्ला जरुर घ्या. 

 • rashifal 2018 gemini horoscope mithun rashi in marathi

  कौटुंबिक स्थिती : कौटुंबिक प्रकरणांमध्ये हे वर्ष तुमच्यासाठी फायदा-तोट्याचे राहू शकते. कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबासोबत वेळ घालविण्यासाठी कमीच संधी मिळेल. पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. या वर्षी तुम्ही जुने वाद सोडविण्यासाठी बसून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न कराल. यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कामकाज जास्त असल्याने वर्षाचे काही महिने कुटुंबापासून दूर राहू शकता. कुटुंबातील सदस्यांमध्ये मनमुटाव होऊ शकतो. त्याने तणाव वाढेल. सामाजिक कार्य़ांमुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. संतान प्राप्ती होण्याची शक्यता आहे. घरी धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. हळूहळू कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम वाढण्याची शक्यता. या वर्षी पिढीजात संपत्तीशी संबंधित असलेला वाद सुटण्याची शक्यता. तुम्ही नवीन फ्लॅट किंवा फ्लॉट विकत घेऊ शकता. पार्टनर आणि मुलांना खुश करण्यासाठी गिफ्ट आणि दागिने विकत घेऊ शकता. या वर्षी तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणखी मजबूत होईल. नवीन लोकांच्या संपर्कात येणार. भावांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होणार. आईवडीलांचे सहकार्य़ लाभणार. 

 • rashifal 2018 gemini horoscope mithun rashi in marathi

  प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह मॅरेज करणाऱ्यांसाठी हे शुभ वर्ष आहे. आईवडीलांचा होकार मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरसोबत बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. या वर्षी मिथून राशीच्या लोकांना लव्ह प्रपोजल मिळू शकतात. पती-पत्नीचे संबंध सुधारतील. पार्टनरसाठी महागडे गिफ्ट विकत घेणार. तुम्ही तुमची लव्ह लाईफ आणखी रोमॅंटिक करण्यात यशस्वी व्हाल. या राशीच्या सिंगल लोकांच्या लाईफमध्ये एखादे विघ्न येऊ शकते. या शिवाय तुम्ही एखाद्याला पसंत करता आणि प्रपोज करण्याची शक्यता आहे तर काही काळ वाट बघावी लागेल. लव्ह लाईफ आणि दांपत्य जीवनासाठी वर्षाचे पहिले ४ महिने सावधान राहावे लागेल. या महिन्यात लव्ह लाईफशी निगडित कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा अफेरपासून दूर राहा. 

 • rashifal 2018 gemini horoscope mithun rashi in marathi

  आरोग्य :  तुमच्या प्रकृतीत संपूर्ण वर्ष उतार-चढाव दिसून येईल. प्रकृतीबाबत हे वर्ष तुमच्यासाठी काही खास नाही. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. अन्यता पुढे मोठे संकट उद्भवू शकते. या कारणाने कार्यस्थळी तुमचे मन रमणार नाही. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये प्रकृतीच्या प्रकरणांमध्ये सावधान राहावे लागेल. गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यंतरी लठ्ठपणा किंवा जुना आजार उफाळून येऊ शकतो. डायबिटिज आणि ब्लड प्रेशनचा त्रास जाणवू शकतो. स्कीनसंबंधी समस्या भेडसावू शकते. लिव्हर आणि पोटाच्या इतर भागांमध्ये समस्या होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवले नाही तर मानसिक आजार वाढू शकतात. अनिद्रा, डोके आणि डोळ्यांचे दुखणे होऊ शकते. वेळोवेळी चेकअप करा. तुम्ही पेशंट आहात तर सतर्क राहणे आवश्यक आहे. 

 • rashifal 2018 gemini horoscope mithun rashi in marathi

  उपाय-
  - बुधवारी गणेश मंदिरात लाडू अर्पण करा.
  - किन्नरांचा आशिर्वाद घ्या.
  - रविवारी भैरव मंदिरात दूध अर्पण करा.

Trending