Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 Leo horoscope sinh rashi in marathi

वाचा, सिंह राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:08 AM IST

येथे जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018?

 • rashifal 2018 Leo horoscope sinh rashi in marathi

  येथे जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 Leo horoscope sinh rashi in marathi

  जॉब आणि बिझनेस : यावर्षी कार्यक्षेत्रात अपोझिट जेंडर असलेल्या लोकांसोबत मैत्रीचे संबंध बनवण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कार्यस्थळी तुमचा मान वाढेल. यंदाच्या वर्षी तुम्हाला उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा योगदेखील आहे. ऑफिसमध्ये चालणा-या गॉसिपिंगपासून लांब राहा. वर्षातील पहिले दोन महिने तुम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यावर्षभरात कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागले, त्यामुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवू शकतो. थकव्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमेतवर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला विश्रांती घेणे गरजेचे असेल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही लोकांची मदत मिळू शकते. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये बिझनेस केला, तर जास्त फायदा होऊ शकतो. आयात-निर्यात, ट्रान्सपोर्ट, संचार याच्याशी निगडीत व्यवसाय केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. अचानक आलेली संधी तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकेल. प्रॉपर्टी, संचार, कपडे, रेस्तराँ, बेकरी, इलेक्ट्रिक यांच्याशी निगडीत व्यक्तांनी फायदा होण्याचा योग आहे. एकंदरीत हे वर्ष करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरेल. 

 • rashifal 2018 Leo horoscope sinh rashi in marathi

  आर्थिक स्थिति : सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक स्थैर्यता देणारे आहे. वर्षभर तुम्हाला आर्थिक चणचण जाणवणार नाही. अडकलेला पैसा याकाळात परत मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याचा योग आहे. शेअर,कमोडिटी किंवा एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. जमीनत गुंतवणुक करण्याचे योग आहेत. सेविंग वाढू शकते. प्रमोशनसोबत पगारात वाढ होईल. मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक करणे योग्य ठरेल. विदेशी व्यापारातूनसुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती विकून नवीन घर खरेदी करण्याचे योग दिसतात. एक्स्ट्रा इनकम करण्यात यशस्वी व्हाल. उधार पैसे देताना सावधगिरी बाळगा. उत्साहात गुंतवणूक करण्यापासून स्वतःला रोखा. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

 • rashifal 2018 Leo horoscope sinh rashi in marathi

  कौटुंबिक स्थिती : यावर्षी कुटुंबाची तुम्हाला चांगली साथ लाभेल. आईवडिलांच्या आशीर्वादाने विचारात असलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत नात्यात आणखी मधुरता वाढेल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रा कराल. कुटुंबात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. बहीणभावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. यावर्षभरात कामाच्या निमित्ताने काही काळ तुम्हाला कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. घरगुती उपयोगाच्या वस्तूंची खरेदी कराल. प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणात फायदा होऊ शकतो. नवीन घर खरेदी करण्याचे योग आहेत. 

 • rashifal 2018 Leo horoscope sinh rashi in marathi

  प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह लाइफमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. प्रियकर-प्रेयसीचे किंवा पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. विचार पटत नसल्याने नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. आक्रमक होऊ नका. ही अनबन फार काळ टिकणार नाही, लवकरच तुमच्यातील मतभेद दूर होऊन नाते पुर्वपदावर येऊल. यावर्षी सिंगल असलेल्यांच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळतील. विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहायला हवे. एक्स्ट्रा अफेअरची स्थिती निर्माण होऊ शकते. 

 • rashifal 2018 Leo horoscope sinh rashi in marathi

  आरोग्य : आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. क्षमतेपक्षा अधिक कष्ट केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम घडू शकतो. जीवनशैलीत बदल करुन खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवात. अधिक मसालेदार पदार्थ खाणे टाळा. आळस टाळा आणि कामावर लक्ष केंद्रिक करा. सिंह राशीच्या लोकांना डोकेदुखी आणि टोंगळ्यांचे दुखण्याचा त्रास जाणवू शकतो. हा त्रास तुम्हाला वर्षभर राहू शकतो. गळा आणि पोटाच्या संदर्भातील तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे तब्येतीकडे विशेष लक्ष असू द्या. बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः जुन-जुलै आणि सप्टेंबर महिन्यात अधिक काळजी घ्या. गर्भवती महिलांनी जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

 • rashifal 2018 Leo horoscope sinh rashi in marathi

  उपाय-
  - सुर्याला जल अर्पण करा.
  - लाल कपड्यांत गहू दान करा.
  - रविवारी मीठ खाऊ नका. सपक जेवण करा.

Trending