Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 Libra horoscope tula rashi in marathi

वाचा, तूळ राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:06 AM IST

येथे जाणून घ्या, तूळ राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती

 • rashifal 2018 Libra horoscope tula rashi in marathi


  येथे जाणून घ्या, तूळ राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 Libra horoscope tula rashi in marathi

  जॉब आणि बिझनेस : नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुमचे कसोशीने प्रयत्न असतील. तुम्हाला पुढे जाण्याच्या नव्या संधीही मिळतील आणि त्यांचास फायदाही होईल. प्रमोशनच्या रुपात तुम्हाला कष्टाचे फळ मिळू शकते. पगार वाढण्याचे योगही आहेत. अधिकारीही तुमची मदत करतील. कमी काळात तुमचा प्रगती होऊ शकते. तुमच्या यशामुळे तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांमध्ये ईर्ष्यादेखिल निर्माण होऊ शकते. पण तुमचे लक्ष केवळ कामावर असायला हवे. बोलण्यावर लक्ष ठेवा. वादांमुळे कामाच्या ठिकाणी वातावरण बिघडण्याचीही शक्यता आहे. व्यावसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष अचानक मिळालेल्या फायद्याचे ठरू शकते. करिअरमध्ये काही खास बदलही होऊ शकतात. उत्पन्नही चांगले मिळू शकेल. कामकाजात तुम्ही काहीतरी नवे करण्याच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकता. यावर्षी कमाईचे नवीन मार्गही सापडतील. विदेशवारी होण्याचीही शक्यता आहे. आर्ट्स, बॉलिवूड, डिझायनिंग, फॅशन, आर्किटेक्ट, प्रिटिंग, मीडिया आणि कॉस्मेटिकशी संलग्न व्यवसायाला मोठा फायदा होऊ शकतो. 

 • rashifal 2018 Libra horoscope tula rashi in marathi

  आर्थिक स्थिती : यावर्षी आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अक्टूबर 2018 मध्ये तुम्ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अधिक परिश्रम घ्याल. जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ आर्थिक स्थितीसाठी चांगला आहे. या काळात कमाई अचानक वाढू शकते. नव्या व्यवसायात गुंतवणुकीचे नियोजनही करू शकता. त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्लाही नक्की घ्या. जुने कर्ज असेल त्याची फेडही करू शकाल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. शेयर मार्केट आणि कमोडिटीशी संबंधित लोकांना अपेक्षेपेक्षा अधिक फायदा होऊ शकतो. इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या मदतीनेही धन लाभ होण्याचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांचे पगार आणि पद दोन्ही वाढू शकते. नोकरी बदलायची इच्छा असेल तर काही चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात. वर्षाच्या मध्यापर्यंत आणि सप्टेंबरपर्यंत तुम्ही सुख सुविधांवर अधिक खर्च करू शकता. फालतू खर्च झाल्याने तणावही निर्माण होऊ शकतो. फालतू खर्च झाल्यास तणावही वाढू शकतो. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगायला हवी. वादांची शक्यता निर्माण झाली आहे. प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणात घाई केल्यास नुकसान होऊ शकते. 

 • rashifal 2018 Libra horoscope tula rashi in marathi

  कौटुंबीक स्थिती : कौटुंबीक जीवनासाठी हे संपूर्ण वर्ष संमिश्र असू शकते. वर्षाच्या सुरुवातीला उत्साह जास्त असेल. यादरम्यान तुमच्यामध्ये  सकारात्मक ऊर्जाही जास्त असेल. हळू हळी काही कौटुंबीक कारणांमुळे तुमचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. अनेक बाबतीत तुम्हाला वाटते तसे घडणार नाही. कारण लाईफ पार्टनरबरोबर काही वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. विचार करून बोला. कुटुंबातील कोणाला वाईट वाटेल असे काहीही बोलणे टाळा. नात्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. वैवाहिक आणि गृहस्थ जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वाद टाळा. व्यस्त वेळापत्रकामुळेही कुटुंबातील वातावरण बिघडू शकते. तुमच्या कुटुंबालाही कमी वेळ देऊ शकाल. याकाळात कुटुंबाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असेल. मुले आणि लाईफ पार्टनरला वेळ देण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाबरोबर विदेशवारीचे योगही आहेत. घरात एखाद्या शुभकार्याचे आयोजन करू शकता. 

 • rashifal 2018 Libra horoscope tula rashi in marathi

  प्रेम आणि दाम्पत्य जीवन : प्रेम प्रकरणांमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण घाबरू नका. हे होईल ते चांगलेच होईळ. या वर्षातील तीन महिन्यांनंतर तुमच्या साथीदाराबरोबर चांगला काळ असेल. नात्यात गोडवा वाढेल. साथीदारासाठी महागडे गिफ्टही खरेदी करू शकता. वर्षाच्या अखेरच्या महिन्यांत लव्ह लाईफसाठी अधिक चांगला काळ असेल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरू शकते. संतानप्राप्ती होईल. अविवाहित लोकांचे विवाह होऊ शकतात. मनाप्रमाणे लग्नाचे योगही आहेत. एखाद्याकडे आकर्षित असाल किंवा प्रेम करत असाल तर प्रपोज करू शकता. त्यासाठी चांगला काळ आहे. पार्टनरशी बोलताना सावध राहावे लागेल. 

 • rashifal 2018 Libra horoscope tula rashi in marathi

  आरोग्य : यावर्षी खाण्या पिण्याच्या सवयी बदलायला हव्या. स्वतःवर लक्ष द्यावे लागेल. तेल-मसाला आणि जास्त तिखट जेवण टाळा. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागेल. बेपर्वाईमुळे त्रास आणि जुने आजार पुन्हा बळावू शकतात. जखमी होण्याचीही शक्यता आहे. उपकरण किंवा गाडी चालवताना सावध राहा. डोळ्यांशी संबंधित त्रासही होऊ शकतो. चष्मा असेल तर नंबर वाढू शकतो. लहान ऑपरेशन होण्याचीही शक्यता आहे. हृदय आणि लिव्हरसंबंधी त्रासापासून सावध राहावे लागेल. कामातून आरामासाठीही वेळ काढावा लागेल. जास्त कामामुळे थकावट होऊ शकते. नस किंवा त्वचेशी संबंधीत त्रास होण्याची शक्यता आहे. याचवर्षी बॅकपेन आणि सांध्यांच्या आजारामुळे त्रास होऊ शकतो. 

 • rashifal 2018 Libra horoscope tula rashi in marathi

  उपाय
  - लक्ष्मीमातेला पांढरे फूल अर्पण करा. 
  - पुरुषांनी स्त्रीला आणि स्त्रीने पुरुषाला अत्तर किंवा डिओ गिफ्ट करावा 
  - मंदिरात तांदूळ दान करा. 

Trending