Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 Pisces horoscope in marathi

वाचा, मीन राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:01 AM IST

येथे जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती

 • rashifal 2018 Pisces horoscope in marathi

  येथे जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 Pisces horoscope in marathi

  जॉब आणि बिझनेस : या वर्षी नोकरी आणि व्‍यवसाय करणा-या लोकांना कामामध्‍ये सावधानता बाळगावी लागेल. निष्‍काळजीपणापासून सावध रहावे. या वर्षातील काही महिन्‍यामध्‍ये कामाचा ताण वाढू शकतो. काही कामांमध्‍ये सहका-यांची मदत मिळणार नाही. त्‍यामुळे काही महिन्‍यांमध्‍ये कामगाजादरम्‍यान त्रास होऊ शकतो. व्‍यवसायामध्‍ये गुंतवणूक करण्‍यासाठी वर्षाच्‍या सुरुवातीचे 3 महिने योग्‍य नाहीत. यादरम्‍यान मोठी गुंतवणूक करु नका. नोकरी आणि व्‍यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कोणत्‍याही पद्धतीचा बदल करण्‍याचा प्रयत्‍न करु नका. या दिवसांत अधिका-यांशी हुज्‍जत घालू नका. कोणत्‍याही कामाला टाळू नका. एप्रिलनंतर नोकरी आणि व्‍यवसायाच्‍या स्थितीमध्‍ये सुधार होऊ शकतो. वर्षाच्‍या शेवटी एक्‍स्‍ट्रा इन्‍कमच्‍या काही खास संधी मिळू शकतात. जुन्‍या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना मनासारखे ट्रान्‍सफरही मिळू शकते. मीनराशीच्‍या काही व्‍यक्‍तींना पदोन्‍नती आणि इन्‍क्रीमेंट मिळू शकते. मोठ्या अधिका-यांपासून मदतही मिळू शकते. करिअरमध्‍ये पुढे जाण्‍यासाठी काही चांगल्‍या संधी मिळू शकतात. कामकाजासंबंधी प्रवास करण्‍यास मिळू शकतो. ऑक्‍टोबर आणि नोव्‍हेंबरमध्‍ये अचानक फायदा होऊ शकतो. या दिवसांत इन्‍कमचे नवे स्‍त्रोतही मिळू शकतात. तुमच्‍या आत्‍मविश्‍वासात आणि पद-प्रतिष्‍ठेतही वाढ होईल. 

 • rashifal 2018 Pisces horoscope in marathi

  आर्थिक स्थिती : या वर्षी बचत वाढवण्‍यासाठी तुम्‍ही सतत मेहनत कराल. यामध्‍ये तुम्‍हाला यशही मिळेल. आर्थिक बाबीबाबत मार्चनंतरचा वेळ तुमच्‍यासाठी अधिक बरा असण्‍याची शक्‍यता आहे. जून ते ऑक्‍टोबरदरम्‍यान तुम्‍हाला अचानक धनलाभ मिळू शकतो. दोन पद्धतीने इन्‍कम कमावण्‍याच्‍या संधीही मिळू शकतात. या दिवसांत नोकरदार व्‍यक्‍तीची इन्‍कम वाढेल तर व्‍यवसायिकांनाही फायदा होईल. गुंतवणूक करण्‍यासाठी जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ योग्‍य नाही. ऑक्‍टोबर 2018 पर्यंतचा काळ तुमच्‍यासाठी ठिकठाक राहिल. खर्चही वाढेल. व्‍यवसाय करणा-यांचे फायद्यासोबत नूकसानही होऊ शकते. पैशांच्‍या व्‍यवहारात जोखिम घेऊ नका. आर्थिक स्थितीबाबत घाईघडबडीत निर्णय घेऊ नका. पूर्ण वर्ष तुम्‍ही पैशासाठी तडजोड करत राहाल. बेकायदेशीर कामांपासून तुम्‍ही दूरच राहिले पाहिजे. इच्‍छा नसतानाही काही महत्‍त्‍वांच्‍या कामांसाठी तुम्‍हाला कर्ज घ्‍यावे लागू शकते. भागिदारी करण्‍यासाठी योग्‍य वेळ नाही. विश्‍वासघात होण्‍याची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीमध्‍ये सावधानतापूर्वक गुंतवणूक करा. तुम्‍ही वादात अडकू शकता. 

 • rashifal 2018 Pisces horoscope in marathi

  कौटुंबिक स्थिती : कौटुंबिक बाबतीत हे वर्ष तुमच्‍यासाठी खास असेल. नाते आणखी मजबूत होतील. कामकाज आणि इतर प्रकरणात भावाबहिणी आणि वडीलांची मदत मिळेल. वर्षाच्‍या सुरुवाती दिवसांमध्‍ये जुन्‍या गैरसमजुती दूर होतील. गृहस्‍थी जिवन आनंददायी राहिल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. कुटुंबाचे सदस्‍य एकमेकांना मदत करतील. लाइफ पार्टनरही मदत मरेल. समाजात तुमचा मान वाढेल. 
  वर्षाच्‍या सुरुवाती दिवसांमध्‍ये धार्मिक यात्रेला जाण्‍याचा योग आहे. या वर्षी धार्मिक आणि अध्‍यात्‍मामध्‍ये तुमची रुची वाढेल आणि घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. अधिक काम असूनही तुम्‍ही कुटुंबाला वेळ द्याल. तुमच्‍या आनंदासाठी कुटुंबाचे काहि सदस्‍य आपल्‍या इच्‍छा दाबतील. खासगी आणि व्‍यवसायी आयुष्‍यामध्‍ये ताळमेळ बसवण्‍यात तुम्‍ही यशस्‍वी व्‍हाल. या वर्षी तुम्‍ही मालमत्‍तेत गुंतवणूक करु शकता. यासाठी वडीलांची मदत मिळू शकते. कुटुंबाच्‍या मदतीने व्‍यवसायही सुरु करु शकता. आईच्‍या तब्‍येतीची काळजी घ्‍या. 

 • rashifal 2018 Pisces horoscope in marathi

  प्रेम आणि दाम्‍पत्‍य जीवन : लव्‍ह लाईफ आणि दाम्‍पत्‍य जीवनासाठी हे वर्ष मिळतेजुळते राहिल. पतीपत्‍नीचे संबंध ठिकठाक राहिल. वर्षाच्‍या सुरुवातीच्‍या 3 महिन्‍यानंतर लव्‍ह लाईफशी संबंधित निर्णयामध्‍ये घाईगडबड करु नका. एखाद्या कारणावरुन जोडीदारासोबत गैरसमजुती होऊ शकतात. जोडीदारावर संशय घेऊ नका. या राशीतील अविवाहित लोकांनी विवाहासाठी घाई करु नये. लव्‍ह मॅरेज करणा-यांनीही या वर्षी सांभाळून रहावे. वर्षाच्‍या मध्‍यामध्‍ये जोडीदाराशी संबंध सुधारु शकतात. एकमेकांवरील विश्‍वास वाढेल आणि नात्‍यात पारदर्शकता येईल. या दिवसांत तुम्‍हाला शारीरीक सुखही मिळू शकते. कार्यक्षेत्रातील भिन्‍न जेंडरच्‍या व्‍यक्‍ती तुमच्‍या बोलण्‍याने आणि व्‍यवहाराने तुमच्‍याशी प्रभावित होऊ शकता. या वर्षी मीन राशीच्‍या विवाहित व्‍यक्‍तींनाही लग्‍नाचे प्रस्‍ताव येऊ शकतात. एक्‍सट्रा अफेअर टाळावे. जोडीदाराशी प्रामाणिक रहा. या राशीच्‍या सिंगल व्‍यक्‍तींच्‍या जीवनात जवळची व्‍यक्‍ती दाखल होऊ शकते. या वर्षी जोडीदारावर अधिक खर्च होऊ शकतो. जोडीदाराच्‍या तब्‍येतीची तुम्‍ही काळजी घ्‍याल. 

 • rashifal 2018 Pisces horoscope in marathi

  आरोग्‍य : या वर्षी मीन राशीच्‍या लोकांचे जुने रोग वर येऊ शकतात. वर्षातील मधले 3 महिने तुम्‍हाला अधिक सावधानता बाळगण्‍याची गरज आहे. या वर्षी पोटोचे आजार होण्‍याची शक्‍यता आहे. इन्‍फेक्‍शन होण्‍याची शक्‍यता आहे. सांधेदुखीही होऊ शकते. नसा आणि स्‍नांयूचे त्रास वाढण्‍याची शक्‍यता आहे. गर्भवती महिलांच्‍या आरोग्‍यासाठी हे वर्ष चांगले राहिल. वर्षाच्‍या शेवटच्‍या दिवसांत जुन्‍या आजारांनी त्रस्‍त असलेल्‍या लोकांना काही दिलासा मिळू शकतो. मीन राशीच्‍या व्‍यक्‍तींनी आरोग्‍याच्‍या बाबतीत निष्‍काळजीपणा करु नये. तणाव आणि झोपेच्‍या कमतरतेमुळे अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो. डोळ्यांचा त्रासही वाढण्‍याचीही शक्‍यता आहे. तुम्‍ही चश्‍मा लावत असाल तर चश्‍म्‍याचे नंबर वाढण्‍याची शक्‍यता आहे. या वर्षी आरोग्‍याच्‍याबाबतीत तुम्‍ही सावधानता बाळगाल. या वर्षी नवी आरोग्‍यदायी सवय तुम्‍ही स्‍वत:ला लावून घेऊ शकता. 

 • rashifal 2018 Pisces horoscope in marathi

  उपाय- 
  - केळीच्‍या झाडाला पाणी अर्पण करावे. 
  - केशर आणि चंदनाचा टीळा लावावा. 
  - गुरुवारी पिवळ्या कपड्यात हरभ-याची डाळ आणि हळदीचा तुकडा ठेवून दान करावे. 

Trending