Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 Sagittarius horoscope dhanu rashi in marathi

वाचा, धनु राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:04 AM IST

येथे जाणून घ्या, धनु राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती

 • rashifal 2018 Sagittarius horoscope dhanu rashi in marathi

  येथे जाणून घ्या, धनु राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 Sagittarius horoscope dhanu rashi in marathi

  जॉब आणि बिझनेस : नवीन वर्षात उद्योगात गुंतवणूक करणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते. उद्योगात वडिलांच्या सहकाऱ्याने नफा वाढू शकतो. नवे घर किंवा वाहन खरेदीचे योग जुळत आहे. स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावल्यास फायदा होऊ शकतो. तरीही, जास्त जोखम घेऊन नये. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला आवश्य घ्या. आर्थिक व्यवहारांबद्दल सावध राहा. पैश्यांशी संबंधित कागदपत्रे सांभाळून ठेवा. नोकरीपेशा आणि बिझनेसवाल्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, अन्यथा दगा मिळू शकतो. नोकरीपेशा लोक सुद्धा कार्यालयात राजकारणाची बळी ठरू शकतात. नोकरीपेशा लोकांना नवीन वर्षात पुढे जाण्याची चांगली संधी येऊ शकते. नववर्षात आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. काही प्रकल्पांवर अधिकची मेहनत सुद्धा घ्यावी लागेल. बिझनेस करणाऱ्यांसाठी सुरुवातीचे 4 महिने फायदेशीर ठरू शकतात. एक्स्ट्रा इनकमचा देखील योग आहे. पैश्यांची कमतरता भासणार नाही. आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकते. चांगला पगार आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. सोबतच आपल्या कार्याचे कौतुकही होऊ शकते. 

 • rashifal 2018 Sagittarius horoscope dhanu rashi in marathi

  आर्थिक स्थिती : नोकरीपेशा आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी ही चांगली वेळ आहे. नोकरीपेशा लोकांचा पगार वाढू शकतो. आर्थिक स्थितित सुधारणा होण्याचा योग आहे. पैश्यांची कमतरता राहणार नाही. वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याची योग आहे. एक्स्ट्रा इनकमचे स्रोत मिळतील. स्थावर आणि जंगम मालमत्तेतून आपल्याला धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीचा या वर्षी चांगला नफा मिळू शकतो. महागड्या वस्तू किंवा दागिन्यांमध्ये पैसा लावू शकता. नवीन वर्षात गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. फालतू गोष्टींमध्ये खर्च वाढू शकतो. एप्रिल आणि मे महिन्यात सेव्हिंग कमी होईल. एखाद्या प्रकारचा चालान किंवा पेनल्टी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. सुख-सुविधा आणि मनोरंजनावर जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.

 • rashifal 2018 Sagittarius horoscope dhanu rashi in marathi

  कौटुंबिक स्थिती : कौटुंबिक बाबतीत नवीन वर्ष संमिश्र स्वरुपाचे असू शकते. कुटुंबियांसाठी आपण काही चांगले करण्याच्या प्रयत्नात आपल्या इच्छा दाबताना दिसून येऊ शकता. कुटुंबातील जबाबदार व्यक्ती या नात्याने आपण सर्वांची मदत सुद्धा करू शकता. आपल्या प्रयत्नांमुळे परिवारात हसरे वातावरण राहील. सगळेच सुखी आणि समाधानी राहतील. मात्र, आपल्यावर कामाचा ताण अधिक असल्याचे काही वेळा आक्रामक सुद्धा होण्याची शक्यता आहे. तरीही आपले कुटुंबीय आपल्याला समजूनच घेतील. अशा परिस्थितींमुळे पैश्यांचे व्यवहार जपूनच करावे अन्यथा नातेसंबंध खराब होऊ शकतात. नकारात्मक लोक आणि प्रवृत्त्यांपासून दूरच राहिलेले बरे आहे. कुटुंबियांनी आपल्याला दूर केले, किंवा ते आपल्यावर प्रेम करत नाहीत असा विचार मनात मुळीच आणू नका. अशाने आपल्या कुटुंबियांसोबत संबंध खराब होऊ शकतात. लाइफ पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या. त्याला तक्रारीची संधी देऊ नका. 

 • rashifal 2018 Sagittarius horoscope dhanu rashi in marathi

  प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह लाइफ संदर्भात नवीन वर्ष चांगले राहील. या वर्षी आपण पार्टनरसोबत अधिक रोमॅन्टिक समय घालवणार अशी शक्यता आहे. फोन किंवा इतर माध्यमातून आपण आपल्या पार्टनरच्या नेहमीच संपर्कात राहाल. या राशीतील लोकांना लव्ह लाइफमध्ये पालकांची मदत मिळेल. तर वैवाहिक जोडपे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतील. काही जुने गैरसमज असल्यास या वर्षी दूर होतील. प्रियकर किंवा प्रेयसीसोबत संबंध पुढे नेण्याचा, लग्न करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष अनुकूल आहे. नकारात्मक वृत्तींपासून दूर राहावे लागणार आहे. आपल्या पार्टनरवर बळजबरी किंवा निर्णय लादण्याचे प्रकार नकोच. नवीन वर्षांच्या पाचव्या महिन्यात रुष्ट व्यवहारांमुळे काहीसा दुरावा होऊ शकतो. ही परिस्थिती कायमची राहणार नाही. वर्षभर लव्ह लाइफमध्ये चढ आणि उतार येत राहतील. पार्टनरशी संबंध पारदर्शक ठेवा. पार्टरवर विश्वास ठेवा आणि संशय घेऊच नका. आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी महागडे गिफ्ट घेण्याची शक्यता आहे. अविवाहित असाल तर या वर्षी विवाहाचे योग आहे. सिंगल लोकांच्या आयुष्यात खास व्यक्ती येईल. प्रेमाचे प्रस्ताव येतील. 

 • rashifal 2018 Sagittarius horoscope dhanu rashi in marathi

  आरोग्य : आरोग्याच्या बाबतीत नवीन वर्ष ठीक राहील. हल्क्याशा दुखापतीच्या घटना घडू शकतात. मात्र, परिस्थिती लवकरच बरी होईल. यावर्षी हाडाला दुखापत होऊ शकते, त्यामुळे सांभाळूनच राहावे. नवीन वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आरोग्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे, पुढील सहा महिने आरोग्याची कटाक्षाने काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही. या वर्षी कुठल्याही मोठ्या आजाराने त्रास होण्याचा योग नाही. फूड पॉइझनिंग आणि आरोग्याच्या समस्य टाळण्यासाठी ताजे आणि गरम अन्नच खाल्लेले बरे. फास्ट फूडपासून दूर राहिल्यास उत्तम. या वर्षी आपल्या पोट आणि डोळ्यांशी संबंधित त्रास होऊ शकतात. या वर्षी मधल्या महिन्यांमध्ये आपल्याला शरीरात चमक किंवा दुखण्याचे त्रास उद्भवू शकतात. औषधी वेळेवर घ्या. अन्यथा छोटेस दुखणे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांना आरोग्यावर दुर्लक्ष करणे महाग पडू शकते. जुन्या आजारावर उपचार घेत असताना या वर्षी सकारात्मक उपचार होऊ शकतो.

 • rashifal 2018 Sagittarius horoscope dhanu rashi in marathi

  उपाय
  - सात प्रकारचे अन्नाधान्य दान करा
  - पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करा
  - हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचे दिवे लावा.

Trending