Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 Taurus horoscope vrushabh rashi in marathi

वाचा, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:11 AM IST

येथे जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती

 • rashifal 2018 Taurus horoscope vrushabh rashi in marathi

  येथे जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 Taurus horoscope vrushabh rashi in marathi

  जॉब आणि बिझनेस : या वर्षी नोकरदारांनी थोडे सबुरीने घ्यावे. अधिकारी-वरिष्ठांसोबत वाद टाळावे. विनाकारण एखाद्या गोष्टीवरुन वाद घालू नये. या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. याकाळात वरिष्ठांचे तुमच्याकडे विशेष लक्ष राहाण्याची शक्यता आहे. नव्या जॉबच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी चांगला काळ आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. बिझनेस करणाऱ्यांनी देव-घेवीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. या वर्षी तुम्हाला हळु-हळु फायदा होण्याची शक्यता आहे. नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा. शेअर, सट्टा, कमोडिटी बिझनेस करणाऱ्यांनी आर्थिक नुकसानीचा योग आहे. नोकरदार वर्गासाठी यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानचा काळ चांगला राहाणार आहे. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याचा संभव आहे. नोकरी प्रमोशनसाठी तुम्हाला थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या कामातील सातत्य आणि रचनात्मक कार्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकू शकता. त्याचेवळी याच काळात काही वादांशी तुमचे नाव जोडले जाईल. ऑफिस पॉलिटिक्सचे तुम्ही शिकार होऊ शकता. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सावध राहा. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. वादांपासून जेवढे दूर राहाता येईल तेवढे दूर राहा.

 • rashifal 2018 Taurus horoscope vrushabh rashi in marathi

  आर्थिक स्थिती : आर्थिक स्थितीसाठी वर्षाच्या सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारणच्या खर्चावर कंट्रोल करा. आर्थिक चणचण निर्माण झाल्यास कुटुंबात वाद संभवतील. या वर्षाच्या मध्यात पैसे कमावण्याच्या तुम्हाला खूप संधी उत्पन्न होतील. दुसरीकडे ग्रहांची दशा सांगते की वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरनंतर तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. उत्पन्न देखील वाढेल. कामानिमित्त केलेला प्रवास फलदायी ठरेल. या वर्षी तुमचा अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रॉपर्टीसंबंध प्रकरणात गुंतवणुकीची संधी मिळेल. प्रॉपर्टीची काही प्रकरणे फायद्याची ठरु शकतात. 

 • rashifal 2018 Taurus horoscope vrushabh rashi in marathi

  कौटुंबिक स्थिती : यावर्षी जरा विचारपूर्वक बोला. तुमच्या एखाद्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. जानेवारीमध्ये कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतो. वर्षाचे पहिले 3 महिने कृशल आहेत. थोडे सांभाळून राहा. या काळात कोणी तुम्हाला वरचढ ठरण्याचा प्रयत्न करेल. यावर्षी कुटुंबासोबत कुठे फिरायला जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो. या प्रवासामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा आणि बाऊंडिग चांगली होऊ शकते. नाते अधिक घट्ट होईल. याशिवाय पार्टनरसोबत तुम्ही एखाद्या धार्मिक स्थिळीही जाऊ शकता. परिवारातील काही मंगलकार्य होण्याचाही योग आहे. कुटुंबात शांती आणि धन लाभ होण्यासाठी पुजा-पाठ केले जाऊ शकतात. यावर्षी कुटुंबातील काही मोठे आणि महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. यावर्षी काही खास कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पार्टनरची साथ मिळेल. वर्षाच्या याच काही महिन्यात तुम्हा भाऊ-बहीण यांचीही मदत मिळू शकते. कुटुंबात कोणी नवीन सदस्यही येऊ शकतो. संबंधांमध्ये सुधारणा होण्याचा योग आहे. आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल. 

 • rashifal 2018 Taurus horoscope vrushabh rashi in marathi

  प्रेम आणि दाम्पत्य जीवन : यावर्षी तुमच्या लव्ह-लाइफमध्ये तिसऱ्या व्यक्तीला ढवळाढवळ करु देऊ नका. यावर्षी तुमच्या पार्टनरचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस यादगार होऊ शकतो. लव्ह-लाइफमधील एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. सोबत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोजही करु शकता. यावर्षी लव्ह लाइफला विवाहात रुपांतरती करण्यात यश मिळू शकते. प्रेमी युगुलांसाठी हे वर्ष चांगले राहाणार आहे. यावर्षी तुम्ही एकमेकांसोबत अधिकाधिक काळ घालवू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत सोशल मीडिया आणि संपर्काच्या इतर माध्यमाने संपर्कात राहू शकता. प्रिय व्यक्तीसोबतच्या सततच्या भेटीने नाते अधिक दृढ होण्यास मदत मिळेल. वास्तविक वर्षाचे शेवटचे 2 महिने लव्ह-लाइफसाठी त्रासदायक राहातील. लव्ह-लाइफमध्ये पार्टनरवर संशय घेऊन दोघांमध्ये दुरावा वाढू शकतो. बोलताना थोडे सांभाळून बोलावे आणि धिराने घ्यावे. घाईत काम बिघडू शकते. 

 • rashifal 2018 Taurus horoscope vrushabh rashi in marathi

  आरोग्य : वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. या दिवसांमध्ये वाहन सावकाश चालवा. मशीनवर काम करत असाल तर सांभाळून काम करा. दुखापत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कामाच्या दबावातून थोडा आराम मिळावा यासाठी विश्रांती घेऊ शकता. काही दिवासांसाठी सुटी घेऊ शकता. जुन्या आजाराने ग्रस्त लोकांनी थोडी सावधगिरी बाळगा. या राशीचे काही लोक पोटाचे विकार आणि निद्रा दोषाने त्रस्त राहू शकतात. काहींना लठ्ठपणाचा त्रास संभवतो. यामुळे तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये बदल करा. यावर्षी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा. तुमच्या पार्टनरची तब्यत नाजूक राहू शकते. झोप न लागणे आणि डोकेदुखीचा त्रास संभवतो. पार्टनरच्या प्रकृतीची काळजी घ्या. यावर्षी तुमच्या तब्येतीमध्ये चढ-उतार सुरु राहातील. यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. सर्दी-खोकला-ताप, ब्लड प्रेशर आणि ह्रदया संबंधी त्रास होऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेत चला. विशेषतः एप्रिल आणि ऑक्टोबर दरम्यान विशेष काळजी घ्या. या दिवसांमध्ये मानसिक शांती भंग होऊ शकते. सोबतच खाण्या-पिण्यावर लक्ष ठेवा. योग्यवेळी आराम करा. 

 • rashifal 2018 Taurus horoscope vrushabh rashi in marathi

  उपाय 
  - शुक्रवारी तांदुळ दान करा. 
  - लक्ष्मीला पांढरी आणि पिवळी फुले चढवा. 
  - केसरी-चंदन तिलक लावत जा. 

Trending