Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 Virgo horoscope kanya rashi in marathi

वाचा, कन्या राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:07 AM IST

येथे जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती

 • rashifal 2018 Virgo horoscope kanya rashi in marathi

  येथे जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 Virgo horoscope kanya rashi in marathi

  जॉब आणि बिझनेस : या वर्षी कन्या राशीचे काही लोक नोकरी बदलू शकता. यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला यापेक्षा चांगले ऑप्शन मिळू शकतात. नोकरी करणा-या लोकांच्या कामात येणारे अडथळे हळुहळू दूर होऊ शकतात. कधी-कधी कामावरुन तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली राहिल. कार्यस्थळावर तुमचे काम खुप चांगले राहिल. या वर्षी काही दिवस कन्या राशीच्या लोकांना मेहनतीच्या हिशोबाने योग्य फळ मिळू शकणार नाही. यामुळे तुम्ही चिंतित होऊ शकता. धीर ठेवा आणि पुढे जा. लवकरच योग्य वेळ येईल. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, हा ग्रह बुध्दि आणि व्यापाराचा कारक आहे. बुधाच्या प्रभावाने नवीन व्यापार आणि कमासंबंधीत केलेल्या प्रवासात फायदा होऊ शकतो. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर चांगल्या सॅलरीसोबत प्रमोशन मिळू शकते. प्रिटिंग, कपडे किंवा स्टीलसंबंधीत काम करत असाल तर मोठे फायदे मिळतील. एकंदरीत करियरच्या हिशोबाने हे वर्ष चांगले राहिल.

 • rashifal 2018 Virgo horoscope kanya rashi in marathi

  आर्थिक स्थिती : तुमची आर्थिक स्थिती यावर्षी चांगली राहिल. नोकरी करणा-या लोकांची इनकम वाढू शकते. कामासंबंधीत प्रवासाचा योग जुळत आहे. विदेश यात्राही होऊ शकते. यावर्षी सेविंग वाढवण्यात तुम्ही यशस्वी ठरु शकता. जानेवारीमध्ये तुमचा फायदा वाढू शकतो. स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. नवीन व्यापार सुरु करण्यासाठी दिवस चांगला आहे. यामध्ये तुम्हाला फायदा होईल. जोखिम असलेल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे टाळावे. तसेच वर्षाच्या मधल्या काळात कुटूंबासोबत प्रवास करण्याचे योग आहेत. यामध्ये खर्च वाढू शकतो. बिझनेसमध्ये अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन पुढे चला. देवाण-घेवाण आणि हिशोब सावधगिरीने करा. एखादा विश्वासू व्यक्ती धोका देऊ शकतो.

 • rashifal 2018 Virgo horoscope kanya rashi in marathi

  कौटूबिक स्थिती : या वर्षी कुटूंबातील लोकांसोबत वादविवाद करणे टाळावे. एखाद्या गोष्टींवरुन वाद असेल तर एकत्र बसून शांतते मिटवून घ्या. कुटूंबासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करा. या काळात कुटूंबातील लोक एकमेकांसोबत वेळ घालवतील. यामुळे कुटूंबातील लोकांमध्ये होणारे वाद दूर होऊ शकतात आणि प्रेम वाढू शकते. या काळात तुम्ही धार्मिक कार्यांचे नियोजन कराल. संसारीक जीवनासाठी वेळ चांगला आहे, काही वादांमुळे अडचणी येऊ शकतात. समाजिक स्थान वाढवण्यासाठी सुवर्ण संधी मिळतील. काम जास्त असल्यामुळे तुम्ही थोडावेळ चिंतित होऊ शकता. तर ऑक्टोबर महिन्यात पार्टनरची प्रकृती खराब होऊ शकते. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

 • rashifal 2018 Virgo horoscope kanya rashi in marathi

  प्रेम आणि दांपत्य जीवन : लव्ह लाइफसाठी हा काळ कंफ्यूजन असणारा आहे. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. गैरसमजांमुळे पार्टनरसोबत ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दोघं एकमेकांना खुप काही ऐकवाल. तुम्ही या गोष्टींवर लक्ष न देता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपला राग कंट्रोल करा. जोडीदारासोबत बोलत असताना धीर ठेवा आणि शांततेत बोला. फेब्रूवारीनंतर संबंधांमध्ये गोडवा येईल. पार्टनरसोबत फिरायला जाऊ शकता. तुम्ही अविवाहित आहात आणि एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर करु शकता. तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल. पति-पत्नीच्या संबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात. कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. कोणताही निर्णय आपल्या मनाने घ्या.

 • rashifal 2018 Virgo horoscope kanya rashi in marathi

  आरोग्य : कन्या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याला प्रायोरिटी द्यावी. खराब रुटीन लाइफमुळे आरोग्यासंबंधीत अडचणी येऊ शकतात. जॉइंट पेन, इनडायजेशन आणि डोकेदुखीची शक्यता आहे. खराब आरोग्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. वर्षाच्या मधल्या काळात तुमचा जोश आणि उत्साह कमी होऊ शकतो. कामात मन लागणार नाही. झोप पुर्ण न झाल्यामुळे थकवा जाणवेल आणि तुम्ही आक्रमक होऊ शकता. वाहन काळजीपुर्वक चालवा. जखमी होण्याचे योग आहेत. घर आणि घराबाहेर दोन्हीही ठिकाणी सावध रहा. हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या समस्या असणा-या लोकांनी नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलांच्या आरोग्यावर लक्ष द्या. आपल्या रुटीनमध्ये बदल करा.

 • rashifal 2018 Virgo horoscope kanya rashi in marathi

  उपाय
  - गायीला पोळी खाऊ घाला.
  - हनुमनाला दिवा लावा.
  - नागरमोथाचे मुळ धारण करा.

Trending