आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी अमावास्या, 14 वर्षांनंतर जुळून आला शुभ योग, यांनतर 2025 मध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाल्गुन मासातील शनिवारच्या शुभ योगात शनिश्चरी अमावास्या योग 14 वर्षानंतर जुळून येत आहे. यापूर्वी चैत्र मासात शनिश्चरी अमावास्या योग 20 मार्च 2004 मध्ये जुळून आला होता. पुढे हा योग 7 वर्षानंतर 29 मार्च 2025 मध्ये जुळून येईल. या शुभ योगात स्नान, दान आणि पूजेचे अधिक फळ प्राप्त होते. ज्योतिषी पं. अमर डिब्बावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार 2004 मध्ये शनिश्चरी अमावास्या चैत्र मासात आली होती. आता 2018 मध्ये हा योग जुळून आला आहे.

 

अमावास्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता लागेल आणि शनिवारी संध्याकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी समाप्त होईल. अमावास्येला शनी-मंगळ युती व्यतिरिक्त पूर्वा भाद्रपद नक्षत्र, नाग करण, कुंभ राशीमध्ये चंद्र सहित विविध योग जुळून येत असून हे योग आता 7 वर्षानंतर शनी अमावास्येला जुळून येतील.


शनी अमावास्येला करा हे छोटे-छोटे उपाय...
- काळ्या गायीला बुंदीचे लाडू खाऊ घालावेत.
- शनिदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. 
- नदीमध्ये स्नान करावे.
- शनी मंदिरात जाऊन तेलाचे दान करावे. 
- काळी उडीद आणि लोखंडाचे दान करावे.
- मोहरीच्या तेलाचे दान करावे. 
- अंध विद्यालय, अनाथ आश्रमात दान करावे.
- स्वतःच्या वजनाएवढा कच्चा कोळसा शनिवारी नदीमध्ये प्रवाहित करावा.


पुढे वाचा, अमावास्येच्या दिवशी कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे...

बातम्या आणखी आहेत...