आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनिवारी शनीला तेल अर्पण करताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा गरिबी होणार नाही दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांना गरिबीतून मुक्ती हवी असेल त्यांना स्वतःच्या कष्टाने आणि ज्योतिषातील काही खास उपाय करून लाभ मिळू शकतो. मान्यतेनुसार शनिदेव आपल्याला आपल्या कर्माचे फळ प्रदान करतात. कुंडलीमध्ये शनी अशुभ असल्यास शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करावे. हा उपाय सर्व राशीचे लोक करू शकतात. जे लोक हा उपाय नियमितपणे करतात त्यांना साडेसाती आणि ढय्याच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार शनिदेवाला तेल अर्पण करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.


पहिली गोष्ट
शनिदेवाला नेहमी लोखंडाच्या भांड्यातून तेल अर्पण करावे. काच, तांबे, किंवा स्टीलच्या भांड्यातून तेल अर्पण केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही.

दुसरी गोष्ट 
शनिदेवाला अर्पण करण्यात येणारे तेल पूर्णपणे शुद्ध असावे. यामुळे मंदिराच्या बाहेरून तेल खरेदी करण्याऐवजी घरूनच तेल घेऊन जाणे जास्त शुभ राहील.

तिसरी गोष्ट
तेल अर्पण करण्यापूर्वी त्यामध्ये स्वतःचा चेहरा अवश्य पाहावा. असे केल्याने शनीच्या सर्व दोषातून मुक्ती मिळू शकते.

चौथी गोष्टी 
शनिदेवाला तेल अर्पण करताना शनिदेवाच्या पायांचे दर्शन करावे. देवाच्या पायांचे दर्शन करताना तेल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

पाचवी गोष्ट 
शनिदेवाला तेल अर्पण करण्यासोबतच स्वतःच्या इच्छेनुसार धन दान करावे. हे दान शनी मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला करू शकता.

बातम्या आणखी आहेत...