आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 जूनला शुभ योगात करा शनीचे उपाय, शनिदेव दूर करतील सर्व अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 16 जून रोजी पुष्य नक्षत्र असल्यामुळे शनी-पुष्य योग जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 16 जूनला दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी पुष्य नक्षत्र सुरु होईल. जे दुसऱ्या दिवशी 17 जून रोजी रविवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपर्यंत राहील. पुष्य नक्षत्राला ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले गेले आहे. या नक्षत्रामध्ये करण्यात आलेले कोणतेही शुभ काम आणि उपाय लवकर फळ प्रदान करतात. शनिवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे या दिवशी शनिदेवाची पूजा विशेष फळ देऊ शकते. यामुळे या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी येथे सांगण्यात आलेल्या उपायांपैकी कोणताही एक उपाय करू शकता.


1. एखाद्या जोतिषाचा सल्ला घेऊन नीलम रत्न सोने, चांदी किंवा तांब्याच्या अंगठीत घालून अभिमंत्रित करून उजव्या हाताच्या मधल्या बोटात धारण करा.


2. शनी पुष्य व्रत करावे आणि मुंग्यांना खाण्यासाठी पीठ टाकावे.


3. शनी-पुष्य योगात काळे बूट, काळे कपडे, धान्य आणि लोखंडाचे भांडे दान करावे.


4. एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून किंवा स्वतः शनी मंत्राचा 23000 वेळेस जप करावा.

मंत्र- ऊँ ऐं ह्लीं श्रीशनैश्चराय नम:।


5. शनिदेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करून 108 दिव्यांनी आरती करावी.

बातम्या आणखी आहेत...