आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 जुलैला सूर्य ग्रहण आणि यानंतर 27 जुलैला होईल चंद्र ग्रहण, वाचा खास गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षातील जुलै महिना अत्यंत खास आहे. कारण या महिन्यात 2 ग्रहण होत आहेत. एक 13 जुलैला सूर्य ग्रहण आणि 27 जुलैला चंद्र ग्रहण होईल. पंचांगानुसार 13 जुलैला अमावस्या असून 27 जुलैला पौर्णिमा आहे. या दिवशी सूर्य मिथुन राशीमध्ये राहील. सूर्यासोबतच चंद्रही याच राशीमध्ये राहील. हे सूर्य ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. यामुळे ग्रहणाच्या सुतकाचा प्रभाव भारतावर राहणार नाही. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, दक्षिण व्हिक्टोरिया, तस्मानिया, प्रशांत आणि हिंद महासागरात दिसेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य  पं. मनीष शर्मा यांच्यानुसार  सूर्य ग्रहण सकाळी 7.19 पासून सुरु होईल आणि 9.44 पर्यंत राहील. येथे जाणून घ्या, सूर्य ग्रहणाशी संबंधित काही खास गोष्टी...


# कसे होते सूर्य ग्रहण?
चंद्र पृथ्वीभवती फिरतो आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याला चक्कर मारते. पृथ्वी 365 दिवसांमध्ये सूर्याभोवती एक चक्कर मारते. जेव्हा पृथ्वी आणि सूर्यामध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्रामुळे सूर्यप्रकाश दिसत नाही तेथे सूर्य ग्रहणाचा प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहण काळाचे सुतक 12 तास अगोदर चालू होते. भारतामध्ये हे ग्रहण दिसत नसल्यामुळे येथे ग्रहणाचे सुतक राहणार नाही.


# अडचणींपासून दूर राहण्यासाठी सूर्य ग्रहणाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये 
> ज्या ठिकाणी ग्रहण दिसणार असेल त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना ग्रहणापूर्वी खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर तुळशीची पाने ठेवावीत. तुळशीमुळे या पदार्थांवर ग्रहणाचा प्रभाव पडत नाही.


> ग्रहणापूर्वी तयार केलेला स्वयंपाक ग्रहणानंतर खाऊ नये.


> ग्रहण काळात पूजा-पाठ करू नये. यामुळे या काळात मंदिराचे पटही बंद केले जातात.


> गरोदर स्त्रीने ग्रहण काळात घराबाहेर पडू नये. या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास गर्भातील बळावर याचा वाईट प्रभाव पडू शकतो.


> ग्रहणानंतर घराची संपूर्ण स्वच्छता करावी. गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. दान-पुण्य करावे. शक्य असल्यास एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ग्रहण काळात आणि काय करावे आणि काय करू नये....

बातम्या आणखी आहेत...