आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Solve Every Problem By Chant Gayatri Mantra या प्राचीन मंत्राने दूर करा प्रत्येक संकट

Mantra : या प्राचीन मंत्राने दूर करा प्रत्येक संकट, धन-धान्य आणि सुख मिळेल भरपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म शास्त्रानुसार, ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला गायत्री जयंती साजरी केली जाते. यावेळी शनिवार 23 जून रोजी हा उत्सव साजरा केला जाईल. देवी गायत्रीला वेदांची माता मानले गेले आहे. उज्जैनचे  ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गायत्री मंत्र सर्वात लवकर शुभफळ प्रदान करणारा आहे. विधिव्रत या मंत्राचा जप केल्यास सर्व अडचणी दूर होऊ शकतात.


गायत्री महामंत्र आणि अर्थ
गायत्री मंत्र : ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।
अर्थ - त्या प्राणस्वरूप, दु:ख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण करू. त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे.


गायत्री मंत्राचा जप करताना या गोष्टींकडे लक्ष द्यावे 
1. गायत्री मंत्राचा जप एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली करावा.
2. गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी सकाळची वेळ श्रेष्ठ आहे, परंतु हा जप संध्याकाळीसुद्धा करू शकता.
3. मंत्र जपासाठी आसनावर बसावे आणि तुळस किंवा चंदनाच्या माळेचा वापर करावा.
4. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळ होण्यापूर्वी 2 तास अगोदर पूर्व दिशेला मुख करून जप करावे. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर एक तासाच्या आत पश्चिम दिशेला मुख करून जप करावा.
5. या मंत्राचा मानसिक जप कोणत्याही वेळी करू शकता.
6. गायत्री मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीचा आहार सात्विक असावा.


गायत्री मंत्राने होऊ शकतात हे फायदे 
1. गायत्री मंत्र सर्व प्रकारचे सुख देणारा मंत्र आहे. या मंत्राचा विधिव्रत जप केल्यास धन, अपत्य, कौटुंबिक आणि इतर सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.
2. जो व्यक्ती गायत्री मंत्राचा जप करतो, त्याच्यावर कोणत्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही.
3. विद्यार्थ्यांनी या मंत्राचा जप केल्यास त्यांचा बौद्धिक स्टार लवकर वाढू शकतो.
4. नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणी येत असल्यास शुक्रवारी पिवळे वस्त्र धारण करून गायत्री मंत्राचा जप केल्यास अडचणी दूर होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...