आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न जमत नसल्यास गुरुवारी केळीच्या झाडाखाली करा हा एक उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार, लग्नासाठी गुरु ग्रह अनुकूल असणे अनिवार्य आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु अशुभ स्थानावर असतो, त्यांचे लग्न जमण्यात अडचणी येत राहतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार गुरु ग्रहाचे दोष शांत करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. यामधीलच एक उपाय केळीच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांची पूजा करणे. या उपायाने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, कारण केळीचे झाड भगवान विष्णूंचे स्वरूप मानले गेले आहे. गुरुवारी केळीच्या झाडाखाली अशाप्रकारे करावी विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांची पूजा...


- गुरुवारी केळीच्या झाडाखाली किंवा देवघरात चौरंगाला केळीची पानं लावून त्यावर पिवळे वस्त्र टाकून बृहस्पती आणि विष्णूची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापना करावी. 
- पिवळ्या गाईच्या दुधाने बृहस्पती आणि विष्णूला अभिषेक करावा. 
- पिवळे फुल, पिवळे चंदन, गुळ, हरभर्याची डाळ, पिवळे वस्त्र दोन्ही देवतांना अर्पण करावे. 
- नैवेद्य पिवळे पकवान किंवा पिवळ्या फळाचा दाखवावा.
- अशाप्रकारे पूजा केल्यानंतर देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांची गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून आरती करावी..


पुढील स्लाईडवर वाचा, विष्णू मंत्र स्तोत्र -

बातम्या आणखी आहेत...