आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या दिशेला आणि आकाराची घड्याळ लावल्याने सुरु होतो वाईट काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ सांगणारे घड्याळ आपल्या भाग्याशीसुद्धा निगडित असते. वास्तू आणि फेंगशुईमध्ये घड्याळ लावण्यासाठी योग्य-चुकीची दिशा सांगण्यात आल्या आहेत. चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास घरात वास्तुदोष वाढतात. घड्याळासाठी दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते आणि घरात राहणाऱ्या लोकांचे विचारही नकारात्मक होतात. वाईट काळ सुरु होतो. दुर्भाग्यापासून दूर राहण्यासाठी घरात गोल आकाराची घड्याळ लावावी. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, वास्तूमध्ये घड्याळाशी संबंधित काही खास नियम...


1. डॉ. राठी यांच्यानुसार घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशा घड्याळ लावण्यासाठी शुभ राहते. या दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावू शकता.


2. घड्याळ भिंतीवरील असो वा मनगटावरचे दोन्ही प्रकारचे खराब घड्याळ घरामध्ये ठेवू नयेत. व्यर्थ बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करून घ्यावे किंवा घरातून काढून टाकावे. 


3. घड्याळ बरोबर चालत असेल परंतु त्यावर धूळ जमा झाली असेल तर हे अशुभ आहे. घड्याळावर धूळ जमा होऊ देऊ नये. घड्याळ रोज पुसून घ्यावे.


4. घरामध्ये योग्य आकाराची घड्याळ लावावी. वास्तुनुसार गोल किंवा अंडाकार आकाराची घड्याळ सकारात्मकता वाढवते. चौकोनी आकाराची घड्याळ लावू नये.


5. कर्कश आणि खूप मोठा आवाज करणारी घड्याळ घरामध्ये लावू नये.


6. कधीही झोपताना उशीखाली घड्याळ ठेवू नये. यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. घड्याळाच्या आवाजामुळे झोपमोड होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार टिप्स...

बातम्या आणखी आहेत...