आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराबाहेर पडताना सोबत ठेवा एक सुपारी, प्रत्येक कामात मिळू शकते Success

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराबाहेर पडताना शुभ काम केल्यास दिवसभर सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात. एखाद्या प्रवासाला निघाल्यानंतर ज्योतिषीय उपाय केल्याने प्रवासात यश मिळण्याची शक्यता वाढते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार घरातून निघताना कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.


# पहिला   उपाय
एखाद्या खास प्रवासाला निघण्यापूर्वी हा उपाय करावा. उपायानुसार घराबाहेर पडण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा अवश्य करावी. पूजेमध्ये एक सुपारीवर लाल दोरा बांधून या सुपारीची पूजा करावी. पूजेनंतर सुपारी सोबत ठेवावी. या उपायाने श्रीगणेश प्रसन्न होऊन तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात. कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते.


# दुसरा उपाय
घराबाहेर पडण्यापूर्वी थोडासा गूळ किंवा गोड दह्याचे सेवन करावे. यासोबतच तुळशीचे पानही खावे. हा शुभ शकुन आहे. याच्या प्रभावाने यश मिळण्याचे योग जुळून येऊ शकतात.


# तिसरा उपाय 
सकाळी लवकर उठून दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे. हाताकडे पाहताना कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम्।। या मंत्राचा उच्चार करावा. महत्त्वाच्या कामाच्या दिवशी तर हा उपाय अवश्य करावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...