आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी एक मंत्र म्‍हणून शिवलिंगावर अर्पण करा या झाडाची पाने, दूर होतील हे दोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये नऊ ग्रह सांगण्यात आले आहे. या नऊ ग्रहांमध्ये शनि, राहु-केतुला क्रूर ग्रह मानले जाते. यामुळे कुंडलीच्या सर्वच शुभ योगांचा प्रभाव नष्ट होऊ शकतो. या ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी महादेवाची पूजा सर्वात सोपा आणि उपयुक्त उपाय आहे. शिवपुराणानुसार शिव पूजेत फूल आणि पानं अर्पण करणे महत्त्वाचे असते. शिवलिंगावर बेलपत्र सर्वच अर्पण करतात. परंतू यासोबतच शमीचे पान अर्पण करणे फायदेशीर ठरते.

 

असे अर्पण करा शमीचे पानं
रोज सकाळी महादेवाच्या मंदिरात जावे. तांब्याच्या भांड्यात गंगाजल किंवा पवित्र जलामध्ये गंगाजल, तांदूळ, पांढरे चंदन मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. यावेळी ओम नमः शिवायचा जाप करा.

 

जल अर्पण करताना महादेवाला तांदूळ, बेलपत्र, पांढरे वस्त्र, जाणवे आणि मिठाईसोबतच शमीचे पानं अर्पण करा.


शमीचे पान अर्पण करताना बोला हा मंत्र
अमंगलानां च शमनीं शमनीं दुष्कृतस्य च।
दु:स्वप्रनाशिनीं धन्यां प्रपद्येहं शमीं शुभाम्।।


शमी पत्र अर्पण केल्यानंतर धूप, दीप आणि कापूराने महादेवाची आरती करा. यानंतर प्रसाद ग्रहण करा.


हा उपाय केल्याने शनि, राहु-केतुचे दोष दूर होतात आणि दुर्भाग्यापासून सुटका मिळते. कामांमध्ये यश मिळते आणि घर-कुटूंबात सुख-समृध्दी टिकून राहते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, याविषयी सविस्तर माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...