आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलै 2018 मध्ये अशी राहणार ग्रहांची स्थिती, गुरु तूळ आणि शनी धनु राशीत राहील वक्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रह सांगण्यात आले आहेत. हे नऊ ग्रह- सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू-केतू. हे सर्व ग्रह 12 राशीमध्ये फिरत राहतात आणि यांच्या शुभ-अशुभ स्थितीचा आपल्या जीवनावर थेट प्रभाव पडतो. नवीन महिना जुलै सुरु झाला आहे. येथे जाणून घ्या, या महिन्यात कोणता ग्रह कोणत्या राशीत राहील आणि केव्हा राशी परिवर्तन करेल...


सूर्य : जुलैच्या सुरुवातील सूर्य मिथुन राशीमध्ये राहील. यानंतर 17 जुलैला राशी परिवर्तन करून कर्क राशीत प्रवेश करेल.


चंद्र  : 1 जुलैला चंद्र मकर राशीमध्ये प्रवेश करेल. 2 जुलैच्या सकाळी कुंभ राशीत प्रवेश करेल. यानंतर प्रत्येक अडीच दिवसांनी राशी परिवर्तन करेल.


बुध : सध्या हा ग्रह कर्क राशीमध्ये आहे. 26 जुलैला हा ग्रह वक्री होईल.


गुरु : सध्या हा ग्रह वक्री असून तूळ राशीमध्ये स्थित आहे. 11 जुलैला गुरु मार्गी होईल म्हणजे सरळ चालेल.


शुक्र : हा ग्रह कर्क राशीमध्ये आहे आणि 4 जुलैला सिंह राशीत प्रवेश करेल.


शनि : संपूर्ण महिन्यात शनी धनु राशीमध्ये वक्री राहील.


राहु आणि केतु : हे दोन्ही ग्रह वक्री चालत आहेत. राहू कर्क राशीमध्ये आणि केतू मकर राशीमध्ये.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जुलैमध्ये कोणकोणते उपय केले जाऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...