आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष : जाणून घ्या, किती दिवस चालणार काँग्रेस-जेडीएसचे सरकार ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येड्डियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार कर्नाटकात स्थापित होत आहे. या सरकारमध्ये जेडीएसचे नेता कुमारस्वामी बुधवार 23 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांनी शपथविधीसाठी कुमारस्वामी यांना 23 मे रोजी 12 वाजून 30 मिनिटांची वेळ दिली आहे. या वेळेत कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ज्योतिषीय दृष्टीकोणातून यांचे सरकार किती दिवस चालेल आणि या सरकारचे भविष्य कसे राहील याविषयी सांगत आहेत, वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी.  


काय सांगते कुमारस्वामी यांची कुंडली
कुमारस्वामी यांची मिथुन लग्न कुंडली आहे. यांच्या कुंडलीत सप्तम स्थान ज्याला भागीदारी (पार्टनरशिप)चे स्थान म्हणतात, त्यामध्ये शनी आणि सूर्य ग्रह आहेत. हे दोन्ही शत्रू ग्रह या स्थानात असल्यामुळे याच्या आतपर्यंतच्या राहिलेल्या इतिहासात कुमारस्वामी भागीदारी स्तरावर खरे आणि जबाबदार पार्टनर ठरलेले नाहीत.


पार्टनरशिपमध्ये आतापर्यंत अपयशी
हा ग्रह योग यांना आपल्या महत्त्वकांक्षेमुळे कोणत्याही आघाडीत जास्त दिवस टिकू देत नाही. 2006 मध्ये जेव्हा काँग्रेसला सोडून कुमारस्वामी भाजपमध्ये सहभागी होऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळीसुद्धा आपल्या महत्त्वकांक्षेमुळे यांची पार्टनरशिप यशस्वी होऊ शकली नाही. केवळ 19 महिन्यात भागीदारी तुटली, जेव्हा ठरल्यानुसार कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन भाजपला सत्ता द्यायची होती. यांनी पद सोडण्यास नकार दिला आणि भाजपने पाठिंबा काढून घेतला, यामुळे सरकार पडले.


पुढील स्लाईडवर वाचा, किती दिवस राहील कुमारस्वामी यांची खुर्ची...

बातम्या आणखी आहेत...