आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंकुवाने केवळ सौभाग्य वाढत नाही तर दूर होऊ शकतो वाईट काळही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न झालेल्या महिलांनी कुंकू लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. मान्यतेनुसार कुंकू लावल्याने आणि भाजत सिंदूर भरल्याने सौभाग्य वाढते आणि पतीच्या कामामध्ये येत असलेले अडथळे दूर होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पूजा-पाठमध्ये कुंकुंवाचा विशेष वापर होतो. याच्या उपायांनी वाईट काळ दूर होऊ शकतो. धन संबंधित कामामधील अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या, कुंकुवाचे पाच उपाय, ज्यामुळे धन प्राप्तीचे योग जुळून येऊ शकतात...


# पहिला उपाय
प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी. एकाक्षी किंवा सामान्य नारळावर थोडेसे कुंकू लावून पूजा करावी. पूजा झाल्यानंतर हे नारळ धन स्थानावर ठेवावे. यामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.


# दुसरा उपाय 
सलग पाच मंगळवार हनुमानाला शेंदूर आणि चमलीचे तेल अर्पण करावे. या उपायाच्या शुभ प्रभावाने देवाची कृपा प्राप्त होऊन भक्ताच्या समस्या दूर होऊ शकतात. हा उपाय पाच मंगळवार करणे आवश्यक आहे.


# तिसरा उपाय
प्रत्येक बुधवारी श्रीगणेशाला कुंकू, गुलाल अर्पण करावे. मंदिरात कुंकुवाने स्वस्तिक काढून पूजा करावी. प्रत्येक बुधवारी हा उपाय केल्यास अडचणींमधून मुक्ती मिळू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...