आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरीचे भगवान जगन्नाथ पडले आजारी, एकांतवासात ठेवले वैद्यांनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या सनातन धर्माचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे परमेश्वर भक्ताच्या आधीन आहे. स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की- "अहं भक्तपराधीनो..अर्थात मी भक्तांच्या आधीन आहे. भक्तांनीसुद्धा आपल्या आनंदासाठी काडी त्यांना थोड्याशा दही आणि लोण्यासाठी नाचवले तर कधी बालपणाचे सुख घेण्यासाठी रडण्यासाठी विवश केले. काही शापित करून विरहासिक्त केले तर कधी त्यांच्या सेवा सुश्रूषाचा लाभ घेण्यासाठी त्यांना रुग्ण केले. आचंबित होऊ नका, आपल्या देशात देवसुद्धा रुग्ण होतात आणि त्यांचेही उपचार केले जातात.


ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान जगन्नाथ यांना थंड पाण्याने स्नान घातले जाते. या स्नानानंतर देवाला ज्वर (ताप) येतो. 15 दिवस भगवान जगन्नाथ यांना एकांतासाठी एका विशेष कक्षामध्ये ठेवले जाते. याठिकाणी फक्त त्यांचे वैद्य आणि खास सेवक त्यांचे दर्शन घेऊ शकतात. याला 'अनवसर' म्हटले जाते. या दरम्यान भगवान जगन्नाथ यांना फळांचा रस, औषधी आणि दलियाचा नैवेद्य दाखवला जातो.


भगवान स्वस्थ झाल्यानंतर आपल्या भक्तांना भेटण्यासाठी रथावर स्वार होऊन निघतात. यालाच जगप्रसिद्ध 'रथयात्रा' म्हटले जाते. ही रथयात्रा प्रत्येक वर्षी आषाढ मासातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला निघते. या वर्षी 28 जून 2018 ला ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान जगन्नाथ यांचा "अनवसर" संपन्न झाला. त्यानंतर आता 15 दिवस ते एकांत कक्षात निवास करतील आणि स्वस्थ झाल्यानंतर आषाढ शुक्ल द्वितीया (14 जुलै) तिथीला रथावर स्वार होऊन आपल्या भक्तांना भेटण्यासाठी निघतील. यालाच जगप्रसिद्ध 'रथयात्रा' म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...