आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Mahesh Navami On 22 June Astrology Measures आज शिव पूजेचे खास संधी, सुरक्षित भविष्यासाठी करा हे उपाय

आज शिव पूजेचे खास संधी, सुरक्षित भविष्यासाठी करा हे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 22 जून रोजी महेश नवमी आहे. मान्यतेनुसार या दिवशी माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झाली होती. महादेवाचे एक नाव महेश असून ऊपासूनच माहेश्वरी तयार झाले. हा दिवस माहेश्वरी समाजाचे लोक मोठ्या उत्सहात साजरा करतात परंतु इतर लोकही महादेवाची कृपा करण्यासाठी या दिवशी काही खास उपाय करू शकतात.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा करण्याचे विधान आहे. यासोबतच या दिवशी काही खास उपाय केल्यास भविष्य सुरक्षित होऊ शकते. येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. पूजन विधी खालीलप्रमाणे आहे.


- सकाळी स्नान केल्यानंतर महादेवाची मूर्ती किंवा फोटो एका लाल कपड्यावर स्थापित करा.


- हातामध्ये पाणी, फुल आणि तांदूळ घेऊन खालील मंत्राचा उच्चार करून संकल्प घ्यावा.
मम शिवप्रसाद प्राप्ति कामनया महेशनवमी-निमित्तं शिवपूजनं करिष्ये।


- त्यानंतर महादेवासमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा.


- गंध, फुल, बिलाचे पान अर्पण करून नैवेद्य दाखवावा. खालील शिव स्तुतीचा पाठ करावा.
जय नाथ कृपासिन्धो जय भक्तार्तिभंजन।
जय दुस्तरसंसार-सागरोत्तारणप्रभो॥
प्रसीद मे महाभाग संसारात्र्तस्यखिद्यत:।
सर्वपापक्षयंकृत्वारक्ष मां परमेश्वर॥


- त्यानंतर महादेवाची आरती करावी आणि प्रसाद भक्तांना वाटावा.


- महादेवाची मूर्ती किंवा फोटो नदीमध्ये विसर्जित करावी. अशाप्रकारे महेश नवमीच्या दिवशी शिव पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


करा हे उपाय 
1. महादेवाचा केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा. हा उपाय चांदीचा कलश किंवा ग्लासने केल्यास चंद्राशी संबंधित दोष दूर होऊ शकतात.
2. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने पितृदोषचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो.
3. पाण्यामध्ये गूळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास येणारे संकट दूर होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...