आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी 12-13 जानेवारीला साजरी केली जात होती संक्रांती, वाचा आता कशी झाली 14 ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष विद्वानांनुसार, यावर्षी मकर संक्रांतीला करण्यात येणाऱ्या स्नान, दानाचे महत्त्व 14 जानेवारीला रविवारी राहील. ज्योतिष विद्वानांनुसार सन् 1900 ते 1965 या काळात मकरसंक्रांती 13 जानेवारीला साजरी करण्यात आली होती. यापूर्वीसुद्धा हा सण कधी 12 तर कधी 13 जानेवरीला साजरा केला जात होता. आता हा सण 14 जानेवारीला साजरा केला जाईल. येणाऱ्या वर्षांमध्ये या सणाच्या तारखेत बदल होतील आणि सन् 2047 नंतर बहुतांश वेळेस 15 तारखेला मकर संक्रांती साजरी केली जाईल. असे अधिकमास आणि क्षय मासामुळे होते.


या संदर्भात अधिक माहितीसाठी हे वाचा...
सन् 1900 ते 1965 या काळात मकरसंक्रांती 13 जानेवारीला साजरी करण्यात आली होती. यापूर्वीसुद्धा हा सण कधी 12 तर कधी 13 जानेवरीला साजरा केला जात होता. पं. लोकेश जागीरदार (खरगोन) यांच्यानुसार, स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला होता. त्यांच्या कुंडलीत सूर्य मकर राशीमध्ये होता म्हणजेच त्यावेळी 12 जानेवारीला मकरसंक्रांती होती. 20 व्या शतकात मकरसंक्रांती 13-14 जानेवारीला, वर्तमानात 14 तर कधी 15 जानेवारीला येते. 21 वे शतक समाप्त होता-होता मकरसंक्रांती 15-16 जानेवारीला साजरी केली जाईल.


पुढे वाचा सूर्याची गती आणि त्यासंबंधित गणित...

बातम्या आणखी आहेत...