आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Upay : काळ्या तिळाने दूर होऊ शकतात शनी, पितृ आणि राहू-केतुचे दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष उपायांमध्ये विविध गोष्टींचा वापर केला जातो. अशीच एक गोष्ट आहे काळे तीळ. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार शनी दोष, पितृ दोष, राहू-केतूचे दोष दूर करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये काळे तीळ वापरले जातात. हवनमध्ये काळे तीळ टाकल्यास आजार दूर होतात. गरुड पुराणामध्ये तीळ अत्यंत पवित्र असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे पूजा, हवन, यज्ञामध्ये याचा उपयोग करणे शुभ मानले जाते. येथे जाणून घ्या, काळ्या तीळाशी संबंधित काही सोपे उपाय...


1. ज्या व्यक्तीवर शनीच्या साडेसाती किंवा ढय्याचा प्रभाव असेल त्यांनी शनिवारी नदीमध्ये काळे तीळ प्रवाहित करावेत. यामुळे शनीचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो.


2. कुंडलीमध्ये शनी अशुभ स्थानावर असल्यास मोहरीच्या तेलामध्ये काळे तीळ टाकून शनिदेवाचा अभिषेक करावा.


3. राहू-केतूच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी काळ्या तिळाचे दान करावे.


4. पितृ दोषाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी अमावास्येला कलशात पाणी आणि काळे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.


5. एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागली असल्यास मूठभर काळे तीळ त्या व्यक्तीवरून सात वेळेस उतरवून घेऊन एखाद्या चौकामध्ये फेकून द्यावेत.


6. धन लाभासाठी शुक्रवारी एखाद्या नदी किंवा तलावामध्ये माशांसाठी मूठभर काळे तीळ टाकावेत.

बातम्या आणखी आहेत...