आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदुळाच्या उपायांनी प्राप्त होऊ शकतात शुभफळ, ग्रह दोषातून मिळते मुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही शुभ कामासाठी करण्यात येणाऱ्या पूजेमध्ये तांदुळाचा उपयोग अवश्य केला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य  पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार तांदूळ शुक्राचे धान्य आहे. यालाच अक्षता असेही म्हणतात. अक्षतांचा अर्थ अखंड न तुटलेला. अक्षत (तांदूळ) पूर्णतेचे प्रतीक आहे. यामुळे टिळा लावल्यानंतर अक्षता अवश्य लावल्या जातात. ज्योतिषमध्ये तांदूळचे काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी ग्रहांचे दोष दूर होऊ शकतात यासोबतच धनलाभाचे योग जुळून येतात...


1. लग्न होत नसल्यास गुरुवारी केशरी भात (साखरभात)चा भगवान श्रीविष्णुंना नैवेद्य दाखवावा.


2. शिवपुराणानुसार धन लाभासाठी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करावेत.


3. तांदूळ दान केल्याने शुक्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होऊन सर्व प्रकारचे सुख मिळतात.


4. रोज एखाद्या तलावातील माशांना एक मूठभर तांदूळ टाकल्यास कुटुंबातील सुख कायम राहील. 


5. तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असल्यास मंगळवारी शिजवलेल्या तांदळाने शिवलिंगाचा शृंगार केल्यास फायदा होऊ शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...