दिव्य मराठी वेब टीम
Jan 08,2018 12:00:00 AM ISTसोमवारी कन्या राशीच्या चंद्रावर शनिची वक्र दृष्टी असल्यामुळे मेष, मिथुन, तुळ आणि कुंभ राशीचे लोक चिंतित राहू शकतात. या राशीच्या लोकांचे कामात मन लागणार नाही. आज या 4 राशीच्या लोकांना जुन्या चुकांमुळे नुकसान होऊ शकते. या लोकांनी बिझनेस आणि नोकरीमध्ये कोणतीच रिस्क घेऊ नये. घाई करणे टाळावे. शनिची वक्र दृष्टी असल्यामुळे हे लोक वादात अडकू शकता. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. यासोबतच इतर राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक-ठाक राहिल.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीभविष्य...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
मेष महत्वाकांक्षेच्या मागे धावताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको. सर सलामत तो टोपी पचास हे लक्षात ठेवा. किरकोळ आजारही आंगावर काढू नका. शुभ रंग: मोरपंखी, अंक-३.
वृषभ छानछूकीसाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल राहील. आज मित्रमैत्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल. शुभ रंग: राखाडी, अंक-५.
मिथुन आज काही घरगुती कामे हातावेगळी करण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तरूणांनी गैरवर्तन टाळावे. शुभ रंग : पांढरा, अंक-६.
कर्क लेखक व नवकवींची लिखाणे प्रसिध्द होतील. बेरोजगारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावणे येईल. खोटया सह्या करणारे अडचणीत येतील. शेजारी प्रेमाने बघतील. शुभ रंग: जांभळा, अंक-९.
सिंह राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण चालू असल्याने आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज प्रवासास निघणार असाल तर मात्र खिसा सांभाळा. शुभ रंग : मोरपंखी, अंक-८.
कन्या तुमच्या वागण्यात काहीसा हट्टीपणा असेल. अती स्पष्ट बोलण्याने काही नाती दुरावतील. आज व्यवसायात भागिदारांशी थोडेफार मतभेद संभवतात. शुभ रंग : गुलाबी, अंक-६.
तूळ उच्चशिक्षणार्थींना विदेशांतील नोकरीच्या संधी खुणावतील. आज इंपोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालतील. भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक कराल शुभ रंग : पिवळा, अंक-७.
वृश्चिक आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीरीत्या पूर्ण कराल. आप्तस्वकीय व मित्रमंडळी तुमच्या प्रभावात असतील. शुभ रंग : पिस्ता, अंक-२.
धनू व्यावसायिक महत्वाकांक्षा वाढतील. काैटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मित्रांनी दिलेल्या शब्दांवर विसंबून कोणतेही निर्णय घेऊ नका. शुभ रंग : क्रिम, अंक-४.
मकर नोकरीधंद्यात काहीसे विराेधी वातावरण असल्याने आज बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या. सहकाऱ्यांशी गोड बोलूनच कामे करुन घ्यावी लागतील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-७.
कुंभ आज घराबाहेर आक्रमकता टाळून थोडे तडजोडीचे धोरण स्विकारुनच आपला स्वार्थ साधून घेता येईल. आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या. धाडसी कृत्ये टाळा. शुभ रंग : डाळिंबी, अंक-१.
मीन वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. देण्या घेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवलेले बरे. शुभ रंग : मरुन, अंक-४.