आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय ज्योतिषमध्ये पंचक अशुभ मानले गेले आहे. पंचकच्या काळात काही विशेष काम करण्यास मनाई आहे. या अंतर्गत, शतभिषा, भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. यावेळी 14 मार्चला रात्री 03.54 पासून पचंक सुरु झाले असून हे 19 मार्च, सोमवारी रात्री 08.27 पर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, पंचक किती प्रकारचे असते आणि या काळात कोणकोणती कामे करू नयेत.
1. रोग पंचक
रविवारी सुरु होणार्या पंचकाला रोग पंचक म्हणतात. याच्या प्रभावाने हे पाच दिवस शारीरिक आणि मानसिक अडचणींचे राहतात. या पंचकमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य करू नये. प्रत्येक प्रकरच्या मंगलकार्यामध्ये हे पंचक अशुभ मानण्यात आले आहे.
2. राज पंचक
सोमवारी सुरु होणार्या या पंचाकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावाने पाच दिवसांमध्ये सरकारी कामामध्ये यश प्राप्त होते. राज पंचकमध्ये संपत्तीशी संबंधित कार्य करणे शुभ राहते.
3. अग्नि पंचक
मंगळवारी सुरु होणार्या या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट प्रकरण, वाद इ. गोष्टींचे निर्णय, स्वतःचा हक्क मिळवून देणारे काम केले जाऊ शकतात. या पंचकामध्ये अग्नीची भीती राहते. हे अशुभ आहे. या पंचकामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्माण कार्य, अवजार आणि मिशनरी कामांची सुरुवात अशुभ मानली गेली आहे. यामुळे नुकसान होऊ शकते.
मृत्यू, आणि चोर पंचकाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.