आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 मे : रवी-पुष्यचा शुभ योग, अडचणींमधून मुक्तीसाठी घरी आणावे हे यंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अधिक मास चालू असून हा 13 जूनपर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफु्ल्ल भट्ट यांच्यानुसार 20 मे रोजी रविवारी अधिक मासातील शुक्ल पक्षातील पंचमी आणि षष्ठी तिथी आहे. या दिवशी पुष्य नक्षत्र दिवसभर राहील. ज्योतिषमध्ये पुष्य नक्षत्राला अत्यंत शुभ मानण्यात आले आहे. रविवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी-पुष्यचा शुभ योग जुळून येत आहे. या दिवशी येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास सूर्य दोष कमी होऊ शकतात. 


- ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य नीच स्थितीमध्ये असेल त्यांनी रवी पुष्य योगामध्ये सूर्य यंत्राची स्थापना करून रोज पूजा करावी. यामुळे कुंडलीतील दोष दूर होऊ शकतात.


- रवी पुष्य योगामध्ये सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. सूर्याला अर्पण केल्या जाणार्‍या पाण्यात कुंकू तसेच लाल रंगाचे फूल टाकावे. सूर्याला जल अर्पण करताना 'ऊँ घृणि सूर्याय नम:'या मंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व अडचणी दूर होऊन यश प्राप्त होते.


- ज्योतिषशास्त्रानुसार तांब हा सूर्याचा धातु आहे. रवी पुष्य योगात तांब्यांचे नाणे अथवा तांब्यांचा तुकडा वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्याने जन्मपत्रिकेतील दोष नाहीसे होतात. याशिवाय लाल कपड्यामध्ये गहू आणि गुळ एकत्र बांधून दान केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...