आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व दिशेच्या रूममध्ये लावावेत हिरव्या आणि दक्षिणेला लाल रंगाचे पडदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तू शास्त्रामध्ये घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी खास उपाय सांगण्यात आले आहेत. अगदी छोटे-छोटे काम करून आपण घरामध्ये सुख-शांती आणि समृद्धी वाढवू शकतो. घरामध्ये पडदे लावायचे असल्यास फक्त दिशेप्रमाणे पडद्यांच्या रंगाची निवड करणे फायदेशीर ठरते. दिशेनुसार रंगाची निवड केल्यास त्या दिशेच्या पॉझिटिव्ह एनर्जीचा आपल्याला फायदा होऊ शकतो.


घराच्या सजावट आणि इंटेरिअरमध्ये भितींवरील रंग आणि पडद्यांची महत्त्वाची भूमिका असते. वेगवेगळ्या रंगाचे पडदे घराचे सौंदर्य खुलवण्यासोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्यास मदत करते. वास्तुनुसार घराच्या प्रत्येक रूमचे वेगवेगळे महत्त्व असते यामुळे सर्व रूममध्ये एकसारखा एकच रंग देऊ नये. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचे पडदे लावावे आणि कोणत्या रूमला कोणता रंग द्यावा.


- पूर्व दिशेच्या रूममध्ये हिरवे पडदे लावल्यास घराच्या, व्यापार आणि उत्पन्नाच्या सोर्समध्ये वृद्धी होते. घरात सुख राहते.


- पश्चिम दिशेच्या रूममध्ये पांढऱ्या रंगाचे पडणे लावणे फायदेशीर ठरते. असे केल्याने घरातील सदस्यांना कामामध्ये नशिबाची साथ मिळते.


- पश्चिम दिशेच्या रूममध्ये निळ्या रंगाचे पडदे लावल्यास घराच्या धन-धान्यामध्ये वृद्धी होते.


- दक्षिण दिशेच्या रूममध्ये लाल पडदे लावणे उपयुक्त ठरते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि जवळीकता वाढते.


- बेडरूममध्ये मानसिक शांती आणि नात्यामध्ये गोडव्यासाठी गुलाबी, आकाशी, फिकट पिवळा रंग लावावा.


- ड्रॉईंग रूममध्ये क्रीम, पांढरा किंवा सोनेरी रंग लावणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते.

बातम्या आणखी आहेत...