अशा मुली असतात भाग्यवान, हे आहेत नशीबवान मुलींचे SECRET

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 07, 2018, 10:00 AM IST

सर्व पुरुषांची इच्छा असते की त्यांचे लग्न अशा स्त्रीशी व्हावे, जी भाग्यशाली आणि कुळाचा उद्धार करणारी असेल.

 • Samudra Shastra

  सर्व पुरुषांची इच्छा असते की त्यांचे लग्न अशा स्त्रीशी व्हावे, जी भाग्यशाली आणि कुळाचा उद्धार करणारी असेल. परंतु सामान्य पद्धतीने स्त्रीकडे पाहून यासंबधी विचार केला जाऊ शकत नाही. कारण सुंदर दिसणारी स्त्री कुटीलही असू शकते. याउलट साधी-सरळ दिसणारी स्त्री कर्तुत्ववान असू शकते. ज्योतिष शास्त्रामध्ये एक अशी विद्या आहे, ज्यावरून कोणत्याही स्त्रीच्या शरीराकडे पाहून तिच्या स्वभाव आणि चारित्र्याविषयी बरेच काही माहिती करून घेणे शक्य आहे.

  या विद्येला सामुद्रिक विद्या म्हणतात. या विद्येचे संपूर्ण वर्णन सामुद्रिक शास्त्रामध्ये मिळते. धर्म ग्रंथानुसार सामुद्रिक शास्त्राची रचना शिव पुत्र कार्तिकेयने केली आहे. या ग्रंथानुसार आज आम्ही तुम्हाला स्त्रियांच्या अशा काही खास लक्षणांबद्दल सांगत आहोत, ज्यावरून कोणत्या स्त्रिया भाग्यशाली असू शकतात हे समजू शकेल...

  श्लोक
  पूर्णचंद्रमुखी या च बालसूर्य-समप्रभा।
  विशालनेत्रा विम्बोष्ठी सा कन्या लभते सुखम् ।1।
  या च कांचनवर्णाभ रक्तपुष्परोरुहा।
  सहस्त्राणां तु नारीणां भवेत् सापि पतिव्रता ।2।

  अर्थ - ज्या मुलीचे मुख चंद्रासमान गोल, शरीराचा रंग गोरा, डोळे थोडे मोठे आणि ओठ हलकेसे लालसर असतात, अशी मुलगी जीवनात सर्व सुख उपभोगते.ज्या स्त्रीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा असेल आणि हातांचा रंग कमळासमान गुलाबी असेल तर ती स्त्री हजारो पतिव्रता स्त्रियांमध्ये मुख्य असते.

  सौभाग्यशाली स्त्रीचे इतर लक्षणं जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Samudra Shastra

  रक्ता व्यक्ता गभीरा च स्निग्धा पूर्णा च वर्तुला ।1। कररेखांनाया: स्याच्छुभा भाग्यानुसारत ।2। अंगुल्यश्च सुपर्वाणो दीर्घा वृत्ता: शुभा: कृशा।
  अर्थ - ज्या स्त्रीच्या हातावरील रेषा लाल, स्पष्ट, अखंड, पूर्ण आणि गोलाकार असतील तीच स्त्री भाग्यशाली असते. अशा स्त्रिया जीवनात सर्व सुखाचा आनंद घेतात. ज्या स्त्रियांची बोटं लांब, गोल, सुंदर आणि पातळ असतात, त्या स्त्रिया शुभफळ प्रदान करतात.
   

 • Samudra Shastra

  ललनालोचने शस्ते रक्तान्ते कृष्णतारके। गोक्षीरवर्णविषदे सुस्निग्धे कृष्ण पक्ष्मणी ।1। राजहंसगतिर्वापि मत्तमातंगामिनि। सिंह शार्दूलमध्या च सा भवेत् सुखभागिनी ।2।
  अर्थ - ज्या स्त्रीचे दोन्ही नेत्र प्रांत (डोळ्यांच्या खालील आणि वरील त्वचा) फिकट लाल, बुबुळाचा रंग काळा, पांढरा भाग गाईच्या दुधासामान तसेच भुवयांचा रंग काळा असेल तर ती स्त्री सुलक्षणा असते.
  ज्या स्त्रीची चाल राजहंस तसेच उन्मत्त हत्तीसमान असते आणि कंबर सिंह किंवा वाघासमान लवचिक असते, ती स्त्री सर्व सुख उपभोगणारी असते.

   

 • Samudra Shastra

  गौरांगी वा तथा कृष्णा स्निग्धमंग मुखं तथा। दंता स्तनं शिरो यस्यां सा कन्या लभते सुखम् ।1। मृदंगी मृगनेत्रापि मृगजानु मृगोदरी। दासीजातापि सा कन्या राजानं पतिमाप्रुयात् ।2।


  अर्थ - जी स्त्री गोर्‍या किंवा सावळ्या रंगाची असेल, मुख, दात आणि मस्तक (कपाळ) सुंदर असणारी असते, ती खूप भाग्यवान राहते आणि आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते.
  ज्या स्त्रीचे अंग कोमल तसेच नेत्र, मांड्या आणि पोट हरीणासामान असते ती स्त्री दासीच्या गर्भातून जन्म घेऊनसुद्धा राजासमान पती प्राप्त करते.

   

 • Samudra Shastra

  अंभोज: मुकुलाकारमंगष्टांगुलि-सम्मुखम्। हस्तद्वयं मृगाक्षीणां बहुभोगाय जायते ।1। मृदु मध्योन्नतं रक्तं तलं पाण्योररंध्रकम्। प्रशस्तं शस्तरेखाढ्यमल्परेखं शुभश्रियम् ।2।


  अर्थ - ज्या स्त्रियांचे दोन्ही हात, अंगठा आणि बोट समोरून कमळाच्या कळीप्रमाणे समान पातळ आणि सुंदर असतात, अशा स्त्रिया सौभाग्यवती असतात.
  ज्या स्त्रीचा तळहात कोमल, फिकट लाल, स्पष्ट, मधील भाग फुगीर, स्पष्ट रेषा असणारा असतो, ती स्त्री सौभाग्य आणि लक्ष्मीयुक्त असते.

   

 • Samudra Shastra

  मत्स्येन सुभगा नारी स्वस्तिके वसुप्रदा। पद्मेन भूषते पत्नी जनयेद् भूपतिं सुतम् ।1। चक्रवर्तिस्त्रिया: पाणौ नद्यावर्त: प्रदक्षिण:। शंखातपत्रकमठा नृपमातृत्वसूचका: ।2।


  अर्थ - ज्या स्त्रीच्या हातामध्ये मत्स्य (मासा) चिन्ह असते ती सुंदर, भाग्यशाली आणि स्वस्तिक चिन्ह असेल तर धन देणारी असते. कमळाचे चिन्ह असेल तर राजपत्नी होऊन भूमीचे पालन करणार्‍या पुत्राला जन्म देते.
  ज्या स्त्रीच्या हातावर दक्षिणावर्त मंडळाचे चिन्ह असते ती चक्रवर्ती राजाची पट्टराणी होते. शंख, छत्र आणि कासवाचे चिन्ह असलेली स्त्री राजमाता होते.

   

 • Samudra Shastra

  तुलामानाकृती रेखा वणिक्पत्नित्वहेतुका ।1। गजवाजिवृषाकारा करे वामे मृगीदृशा ।2। रेखा प्रसादज्राभा सूते तीर्थकरं सुतम्। कृषीबलस्य पत्नी स्याच्छकटेन मृगेण वा ।2।
  अर्थ - ज्या स्त्रियांच्या उलट्या हातावर तराजू, हत्ती, घोडा आणि बैलाचे चिन्ह असते ती व्यापार्‍याची स्त्री होते. ज्या स्त्रीच्या हातावर वज्राचे चिन्ह असेल तर ती स्त्री तीर्थ करणार्‍या पुत्राला जन्म देते. मोराचे चिन्ह असेल तर शेतकर्‍याची स्त्री होते.

   

 • Samudra Shastra

  त्रिशूलासगदाशक्ति - दुन्दुभ्याकृतिरेखया ।1। नितम्बिनी कीर्तिमती त्यागेन पृथिवीतले ।2। शुभद: सरलोअंगुष्ठो वृत्तो वृत्तनखो मृदु:।


  अर्थ - ज्या स्त्रीच्या हातावर त्रिशूळ, तलवार, गदा असे चिन्ह असतात, ती स्त्री दान करून कीर्ती प्राप्त करणारी असते. ज्या स्त्रीचा अंगठा सरळ तसेच नख गोल आणि कोमल असतात ती शुभप्रद (शुभफळ प्रदान करणारी) असते.
   

Trending