Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 30, 2017, 12:02 AM IST

शनिवारी बुध-चंद्र समोरासमोर असल्यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे.

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  शनिवारी बुध-चंद्र समोरासमोर असल्यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. या राशीच्या लोकांनी जॉब किंवा बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. काही लोक या पाच राशीच्या लोकांचा गैरफायदा घेऊ शकतात. पैशांच्या बाबतीत धोका होऊ शकतो. या 2 ग्रहांमुळे चुकीच्या ठिकाणी पैसा अडकू शकतो. या व्यतिरिक्त इतर सात राशीचे लोक या वाईट ग्रह स्थितीपासून दूर राहतील. यांच्यासाठी दिवस सामान्य राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  मेष - आज दुपारनंतर आर्थिक अडचणींवर योग्य मार्ग निघेल. आवक सुधारुन जमाखर्चाचा मेळ बसेल. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील.  शुभ रंग: गुलाबी, अंक-२

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  वृषभ - अाज सहकाऱ्यांच्या मदतीने  कामाचा वेेळेत निपटा करता येईल. हाती पैसा असला तरी तो जाण्याचे मार्गही मोठे असतील. आज समाधानी वृत्ती गरजेची. शुभ रंग: डाळिंबी, अंक-६. 

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  मिथुन - इच्छापूर्तीचा दिवस असून प्रपंच व परमार्थ दोन्ही आघाडयांवर समाधान राहील. सज्जनांचा सहवास लाभेल. व्यवसायात फायदेशीर करार होतील.  शुभ रंग : मोतिया, अंक-१.

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  कर्क - अचानक झालेले दूरचे प्रवास कार्यसाधक ठरतील. आज सरकारी कामे विनाव्यत्यय पार पडतील. अधिकार गाजवाल. झाकली मूठ झाकलीच ठेवा. शुभ रंग : पिस्ता, अंक-३

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  सिंह - नोकरदारांवर कामाचा शीण वाढेल. त्यातून जमाखर्चाचा तराजू काहीसा डळमळीत असल्याने आर्थिक धाडस नकोच. आध्यात्मिक मार्गात मन रमेल. शुभ रंग : पांढरा, अंक-१.

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  कन्या - महत्वाची कामे आज दुपारपर्यंतच उरकलेली बरी. तरुणांनी बेफिकीरपणास आवर घालून मर्यादेत राहणे गरजेचे आहे. व्यसने घात करतील. शुभ रंग : मरुन, अंक-७.

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  तूळ - द्वीधा मन:स्थिती मुळे काही महत्वाचे निर्णय घेणे अवघड होईल. वादविवादात प्रसंगी नमते घेऊन आपला स्वार्थ साधून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शुभ रंग : मोरपंखी, अंक-३. 

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  वृश्चिक - दुपारनंतर काही येणी वसूल होतील. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. विद्यार्थी मनापासून मेहनत घेतील. वादविवादात तुमची बाजू वरचढ राहील  शुभ रंग : निळा, अंक-७.  

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  धनू - आर्थिक अडचणींतून मार्ग निघेल. येणी असतील तर निसंकाेचपणे मागा. खेळाडूंचा प्रतिस्पर्ध्यावरील विजय निश्चित आहे. ज्येष्ठांस विश्रांतीच गरजेची. शुभ रंग : केशरी, अंक-८

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  मकर - घरेलू समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. एखद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल. नव्या कलाकारांना सुसंधी चालून येतील. प्रेमप्रकरणांना ग्रीन सिग्नल. शुभ रंग : चॉकलेटी, अंक-९.

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  कुंभ - आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. प्रवास त्रासदायक होतील. ज्येष्ठ मंडळी धार्मिक सहली किंवा तिर्थयात्रांचे बेेत आखतील. शेजारी घरोबा वाढेल. शुभ रंग : तांबूस, अंक-४.

 • Saturday 30 December 2017 free daily horoscope in marathi

  मीन - कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागल्याने निर्धास्त असाल. आज स्वत:साठी वेळ काढू शकाल. हौसमौज करण्याकडे कल राहील. स्वप्नात रमाल.  शुभ रंग :लेमन, अंक-५.

Trending