आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी रात्री पिठाचे 2 दिवे दारावर लावावेत, शनी दोषातून मिळू शकते मुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांवर शनिदेवाची वक्रदृष्टी किंवा साडेसाती चालू असेल त्यांनी शनिवारी काही खास उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होऊ शकतात. यामुळे जीवनातील अडचणी कमी होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, शनिवारी रात्री काही विशेष उपाय करून शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी केला जाऊ शकतो. येथे जाणून घ्या, शनिदेवाचे काही खास उपाय...


1. शनिवारी रात्री पिठाचे 2 दिवे तयार करून घराच्या मेनगेटच्या दोन्ही बाजूला लावावेत. दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकावे. यासोबतच दिव्यामध्ये काळे तीळ आणि उडीद दाणे टाकावेत. या उपायाने शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते.


2. शनिवारी संध्याकाळी हनुमान मूर्तीच्या पायावरील शेंदूर घरी घेऊन यावा. त्यानंतर या शेंदुराने काळ्या कपड्यावर स्वस्तिक काढावे. रात्री या कपड्याचे तावीज बनवून घराच्या मुख्य दरवाजावर बांधावे. यामुळे शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात.


3. शनिवारी रात्री पोळीवर तेल लावून त्यावर गोड पदार्थ ठेवावा. त्यानंतर ही पोळी काळ्या रंगाच्या श्वानाला खाऊ घालावी. हे शक्य नसल्यास एखाद्या चौकामध्ये पोळी ठेवून यावी. यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते.