आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीला घाबरू नका, प्रत्येक शनिवारी करा या 5 पैकी कोणताही एका गोष्टीचे दान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शनी धनु राशीमध्ये असून वक्री आहे. यामुळे अनेक लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धनु राशीतील शनीमुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे. वृषभ आणि कन्या राशीवर ढय्याचा प्रभाव आहे. साडेसाती आणि ढय्यामुळे या राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शनीची भीती आणि दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार शनीचे असेच काही खास उपाय, जे सर्व राशीचे लोक करू शकतात.


> पहिला उपाय 
प्रत्येक शनिवारी काळे तीळ, काळा कापड, छत्री, लोखंडाचे भांडे आणि उडदाची डाळ दान करावी. तुम्हाला या सर्व गोष्टींचे दान करणे शक्य नसल्यास यामधील कोणत्याही एका गोष्टीचे दान करावे. या उपायाने शनिदोष दूर होऊ शकतात.


> दुसरा उपाय
शनीसाठी तेलाचे दान करावे. यासाठी एका भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा. ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा जप करावा. त्यानंतर या तेलाचे दान करावे. हा उपाय प्रत्येक शनिवारी करावा.


> तिसरा उपाय 
शनिवारी स्नान करताना पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करावे. या उपायाने वाईट नजर आणि शनीचे दोष दूर होऊ शकतात.


इतर दोन उपाय पुढील स्लाईडवर जाणून घ्या...

बातम्या आणखी आहेत...