आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज शुभ योग : शिव पूजेत लावा 8 दिवे, इन्कम वाढीसाठी करा हा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (25 जून) ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. यावेळी हे व्रत सोमवारी असल्यामुळे सोम प्रदोषचा शुभ योग जुळून आला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी सर्वार्थसिद्धी योगही राहील. या शुभ योगात महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, या शुभ योगात कशाप्रकारे करावी शिव पूजा आणि उपाय...


व्रत आणि पूजन विधी
पाणी न पिता प्रदोष व्रत करावे. सकाळी स्नान केल्यानंतर शंकर-पार्वती आणि नंदीला पंचामृत, गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर बेलाचे पान, गंध, फुल, अक्षता, अर्पण करून धूप-दीप लावून नावैद्य दाखवून पूजा करावी. संध्याकाळी पुन्हा स्नान करून अशाच प्रकारे महादेवाची पूजा करावी. महादेवाला शुद्ध तूप आणि साखर मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आठ दिशांना आठ दिवे लावावेत. प्रत्येक दिवा लावल्यानंतर महादेवाला नमस्कार करावा. शिव स्तोत्र, मंत्राचा जप करावा. रात्री जागरण करावे. अशाप्रकारे सर्व इच्छापूर्ती आणि कष्टातून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रदोष व्रताच्या धार्मिक विधानाचे नियम आणि संयमाने पालन करावे.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इन्कम वाढवणारा उपाय...

बातम्या आणखी आहेत...