Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

3 शुभ योग, तुमच्यासाठी खास राहू शकतो वर्षाचा शेवटचा दिवस

जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 31, 2017, 12:02 AM IST

31 डिसेंबरला धाता, शुभ आणि लक्ष्मी नावाचे तीन शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील.

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  31 डिसेंबरला धाता, शुभ आणि लक्ष्मी नावाचे तीन शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. वर्षातील शेवटच्या दिवशी या आठ राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. यासोबतच कामामध्ये येत असलेल्या अडचणी नष्ट होतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांची ठरवलेली कामे पूर्ण होतील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील वर्षातील शेवटचा दिवस...

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  मेष - आज काही अनपेक्षित येणी वसूल झाल्याने जमेचे पारडे जड असेल. जमाखर्चाचा तराजू समतोलच राहील.आज पत्नीच्याच सल्ल्याने वागलेले बरे. शुभ रंग: मोरपंखी, अंक-३

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  वृषभ - आज दिवसभर कार्यमग्न असाल. परीवारात तुमच्या शब्दाला मान राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या मताचा आदर होईल. अहंकार वाढण्याची शक्यता. शुभ रंग: केशरी, अंक-८. 

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  मिथुन - राशीच्या व्ययातून भ्रमण करणारा चंद्र आज काही अनपेक्षित खर्चास आमंत्रण देत आहे. घराबाहेर वादविवाद टाळलेले बरे कायद्याची प्रकरणे लांबतील. शुभ रंग : निळा, अंक-७.

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  कर्क - अधिकार गाजवण्याची संधी मिळेल. एखादा अकस्मिक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. मित्रांच्या मर्जीत रहाल. गृहीणी आवर्जुन दानधर्म करतील. शुभ रंग : चॉकलेटी, अंक-९.

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  सिंह - नोकरीच्या ठिकाणी आपल्या कार्यपध्दतीचे कौतुक होईल. वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. आर्थिक कामे मात्र रखडण्याची शक्यता आहे. शुभ रंग : डाळिंबी, अंक-५.

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  कन्या - एका महत्वाच्या कामासाठी आज बरीच भटकंती होणार आहे. दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी  आज तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.  शुभ रंग : तांबूस, अंक-४.

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  तूळ - महत्वाचे निर्णय उद्यावर ढकला. वादास आमंत्रण देणारी वक्तव्ये टाळा. आज मोडण्यापेक्षा थोडेसे वाकणे हिताचे. जोडीदारास आकस्मिक धनलाभ संभवतो. शुभ रंग : गुलाबी, अंक-२ 

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  वृश्चिक - नोकरी व्यवसायात उत्तम प्रगती आणि पदोन्नती. आज गृहसौख्याचा दिवस अाहे. घरात हुकुमशाही तत्वप्रणाली नको. मुले आज्ञाधारकपणे वागतील. शुभ रंग : मोतिया, अंक-१. 

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  धनू - स्वत:ची विवेकशक्ती वापरा, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. आज विरोधक काढता पाय घेतील. कुटुंबियांचे सहकार्य मोलाचे राहील. प्रसन्न दिवस. शुभ रंग : डाळिंबी, अंक-६.

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  मकर - कौटुंबिक जिवनांत सुसंवाद राहील. मुलांच्या वाढत्या मागण्या हौशीने पुरवाल. नव्या ओळखी फायदेशिर ठरणार आहेत. गृहीणींवरील जबाबदारी वाढेल.शुभ रंग : पिस्ता, अंक-३.

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  कुंभ - कठीण प्रश्न सहजच सुटणार आहेत. कौटुंबिक स्तरावर नव्या योजना आखाल. गृहीणी सासूबाईंकडून कौतुकाचे शब्द ऐकतील. धवपळीत प्रकृती दुर्लक्षीत होईल. शुभ रंग : मरुन, अंक-७.

 • Sunday 31 December 2017 free daily horoscope marathi

  मीन - आज तुम्ही निस्वार्थीपणे काही समाजोपयोगी कामे कराल. परिवाराच्या हितासाठीच तुम्हाला एखादी कठोर भूमिका घ्यावी लागणार अाहे.  शुभ रंग :पांढरा, अंक-१.

Trending