Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

5 राशींसाठी थकवा आणि टेंशन देणारा ठरु शकतो सुट्टीचा दिवस...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 07, 2018, 12:00 AM IST

रविवारी चंद्रावर शनिची वक्र दृष्टी असल्यामुळे 5 राशींसाठी चांगला राहणार नाही. मेष, वृषभ, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकां

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  रविवारी चंद्रावर शनिची वक्र दृष्टी असल्यामुळे 5 राशींसाठी चांगला राहणार नाही. मेष, वृषभ, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांना दिवसभर सांभाळून राहावे लागेल. या 5 राशींसाठी दिवस थकवा आणि तणावपुर्ण ठरु शकतो. धावपळ होऊ शकते. स्वतःसाठी वेळ काढू न शकल्यामुळे काही लोक टेंशनमध्ये राहू शकतात. तर इतर 6 राशींसाठी सुट्टीचा दिवस ठिक राहिल.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीभविष्य...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  मेष                                  
  संकुचित मनोवृत्तीस आवर घालून आज मनासारख्या घटनांचा दिवस सत्कारणी लावा. प्रयत्नांना नशिबाची साथ नक्कीच मिळेल. तब्येत जरा नरम राहील.        
  शुभ रंग: राखाडी, अंक-५.

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  वृषभ 
  स्वत:ची विवेकशक्ती वापरा, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. आज विरोधक काढता पाय घेतील. कुटुंबियांचे सहकार्य मोलाचे राहील. प्रसन्न दिवस.                     
  शुभ रंग: मोरपंखी, अंक-३. 

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  मिथुन 
  कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागल्याने निर्धास्त असाल. आज स्वत:साठी वेळ काढू शकाल. हौसमौज करण्याकडे कल राहील. स्वप्नात रमाल.    
  शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-७.

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  कर्क                     
  आज व्यस्त दिवस असून विरोधकांना तुमच्या कार्यशक्तीचा प्रत्यय येईल. तुमची ध्येयाकडे वाटचाल होईल. दगदग झाली तरीही स्वप्नपूर्तीचे समाधान मिळेल.          
  शुभ रंग: क्रिम, अंक-४.      
    
 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  सिंह
  उद्योग व्यवसायातील अनुकूल वातावरणामुळे मनाचे नैराश्य दूर होईल. काही नवे हितसंबंध जुळून येतील. कुटुंबियांच्या भावनांचा आदर कराल.         
  शुभ रंग : गुलाबी, अंक-६.

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  कन्या 
  पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ पदरी पडल्याने जमेचे पारडे जड असेल. वादविवादात नरमाईचे धोरण ठेवा. आज पत्नीच्याच सल्ल्याने वागा.            
  शुभ रंग : लाल, अंक-८.   

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  तूळ
  राशीच्या व्ययातून भ्रमण करणारा चंद्र एखाद्या अनपेक्षित खर्चास आमंत्रण देत आहे. घराबाहेर वादविवाद टाळावेत. कायद्याची प्रकरणे लांबतील.                    
  शुभ रंग : पिस्ता, अंक-२.

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  वृश्चिक                        
  सज्जनांचा सहवास लाभेल. व्यवसायात फायदेशीर करार होतील. काही अनपेक्षित लाभ होतील. घराबाहेर आज तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल‌.    शुभ रंग : पिवळा, अंक-७.        

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  धनू
  उद्योग व्यवसायात उत्साही वातावरण असेल. अधिकार गाजवण्याची संधी मिळेल. वादविवादात तुम्ही वरचढ ठराल. वादास आमंत्रण देणारी वक्तव्ये टाळा.         
  शुभ रंग : जांभळा, अंक-९. 

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  मकर
  आज मोडण्यापेक्षा थोडेसे वाकणे हिताचे. तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेऊनच आपला कार्यभाग साधणे गरजेचे आहे. उपासनेची प्रचिती येईल. शुभ रंग : पांढरा, अंक-६.

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  कुंभ
  व्यवसायातील मंदीने थोडे नैराश्य येईल. कष्टानेच यश साध्य होऊ शकेल. वादविवादात प्रसंगी नमते घेऊन आपला स्वार्थ साधून घेणे अत्यंत गरजेचे आहे.          
  शुभ रंग : मरुन, अंक-४.

 • Sunday Rashifal 7 January 2018 Free Daily Horoscope In marathi

  मीन
  कौटुंबिक जिवनांत सुसंवाद  राहील. तरुणांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. मोठेपणा जोपासण्यासाठी खिशावर ताण पडेल. शुभ रंग : डाळिंबी, अंक-१. 

Trending