Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2018, 12:00 AM IST

आज वृषभ, कर्क, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकतात. या 5 राशींच्या लोकांना पैशांच्या अडचणी येऊ शकतात.

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  आज वृषभ, कर्क, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकतात. या 5 राशींच्या लोकांना पैशांच्या अडचणी येऊ शकतात. धनहानिची शक्यता आहे. पैशांमुळे वाद होण्याची शक्यता आहे. विनाकारण पैसा खर्च होईल. जॉब आणि बिझनेसचे काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. यासोबतच 7 राशींसाठी ग्रहतारे शुभ असल्याने दिवस चांगला जाऊ शकतो.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर राशीभविष्य...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  मेष                                 
  नोकरीत  कामातील  जुन्या  चुका निस्तराव्या लागतील. सहकारी वर्ग बंड पुकारण्याची शक्यता. विरोधकांशी गोड बोलूनच वेळ मारुन न्यावी लागेल.      
  शुभ रंग : निळा, अंक-२.       

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  वृषभ 
  कार्यक्षेत्रातील लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. भिडस्त स्वभावास आवर घाला. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकाव्यात.      
  शुभ रंग : क्रिम, अंक-३.

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  मिथुन 
  आज तुम्ही घेतलेले अचूक निर्णय तुमच्या प्रगतीचा वेग वाढवतील. आर्थिक विवंचना कमी होतील. जोडीदाराची स्तुती करण्याची एकही संधी वाया घालवू नका.           
  शुभ रंग: स्ट्रॉबेरी, अंक-४.

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  कर्क                     
  प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर अशक्य कामेही शक्य होतील. मात्र आज कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागेल. तुमचा कामातील उत्साह सहकाऱ्यांस प्रेरणा देईल.       
  शुभ रंग : जांभळा, अंक-३.
   
 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  सिंह
  व्यवसायात लक्षणिय प्रगती होईल. आज प्रिय व्यक्तीसाठी पैसा खर्च कराल. चैनीस प्राधान्य द्याल. भावना व कर्तव्य यांचा योग्य समन्वय साधूू शकाल        
  शुभ रंग :नारिंगी, अंक-५.

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  कन्या 
  नोकरीच्या ठीकाणी तुमच्या नियोजनबध्द कामाचे कौतुक होईल. सहकाऱ्यांशी सुसंवाद राहील. वैवाहीक जिवनांत आज चांगले सूर जुळतील. शुभ रंग: अबोली, अंक-८.   

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  तूळ
  दैनदीन वेळापत्रक बिघडणार आहे. आज तुम्ही अनावश्यक धावपळ टाळा. महीलांना काही कौटुंबिक गैरसमज मनस्ताप देतील. सुसंवादातून मार्ग निघेल.          
  शुभ रंग: मोतिया, अंक-४.

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  वृश्चिक                        
  आज उत्साहवर्धक दिवस अाहे. तरूणांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. जमेचे पारडे जडच असल्याने विलासी वृत्ती बळावेल.   
  शुभ रंग : मरुन, अंक-१. 

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  धनू
  आज भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. सामाजिक जिवनात काही मानापमानाचे प्रसंग येतील. अतीश्रम तब्येत बिघडण्यास कारणीभूत होतील.   
  शुभ रंग: पिस्ता, अंक-७.
   
 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  मकर
  स्वाभिमान दुखावेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वडीलधाऱ्या व्यक्तींशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. आज रागावर ताबा असलेला बरा. शुभ रंग : पांढरा, अंक-८.

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  कुंभ
  घरात व घराबाहेरही आज तुमचीच मर्जी चालेल. मित्र तुमचा शब्द प्रमाण मानतील. मुले आज्ञा पाळतील. उपवर मुलामुलींना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील.        
  शुभ रंग : राखाडी, अंक-४.

 • Tuesday 9 January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  मीन
  पूर्वीची रेंगाळलेली किचकट कामे आज निपटावी लागतील. अहंकार दुखावणारी एखादी घटना घडू शकेल. सरकारी कामे वशिल्याशिवाय होणार नाहीत.       
  शुभ रंग : चंदेरी, अंक-९
   
Trending