आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमध्ये नुकसान किंवा पैसा अडकला असेल तर कामी येतील या 7 टिप्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसायात फायदा आणि घरामध्ये धनाची आवक वाढवण्यासाठी वास्तूमध्ये विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. व्यवसायात फायद्यासाठी केवळ ऑफिस किंवा दुकानात नाही आर घराच्या वास्तूमध्येही बदल करणे आवश्यक आह. वास्तवामध्ये हे बदल करण्यासाठी कोणत्याही प्रकराची तोडफोड करण्याची आवश्यकता नाही. काही वस्तूंची जागा बदलूनही वास्तूमध्ये बदल केला जाऊ शकतो.


व्यवसायात जास्त फायदा होत नसेल आणि ऑफिस किंवा दुकानाचा वास्तू बदलणे शक्य नसल्यास घरामध्ये काही बदल करून लक्ष्मीची आवक वाढवू शकता. वास्तू विशेषज्ञ व्हाय.पी. कुशवाह यांच्यानुसार घरामध्ये जल तत्त्वाचे संतुलन, बसण्याच्या जागेत बदल, घड्याळ योग्य ठिकाणी लावणे आणि योग्य रंगाची निवड केल्यास यश आणि संपत्ती वाढवली जाऊ शकते. यासाठी कोणतेही मोठे बदल करण्याची आवश्यकता नाही.


या 7 गोष्टींकडे दयावे लक्ष 
1. घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला सच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. याठिकाणी जड सामान ठेवू नये.


2. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला तुळशीचे रीप लावावे किंवा पाण्याने भरलेले भांडे ठेवावे.


3. उत्तर किंवा पूर्व दिशेला घड्याळ लावावी. हा उपाय तुमच्यासाठी शुभ काळ घेऊन येऊ शकतो.


4. कामाशी संबंधित कागदपत्र घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे, काम लवकर पूर्ण होईल.


5. आपल्या कंपनीचे नाव लाल रंगाच्या पेंटने दक्षिण दिशेच्या भिंतीवर लिहावे, लाभ होईल.


6. घरातील ड्रॉईंग रम किंवा ऑफिसमधील रिसेप्शन उत्तर-पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बनवावे.


7. घराच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात बसण्याचे स्थान बनवावे. व्यवसायात फायदा होईल.

बातम्या आणखी आहेत...