आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 2 पैकी कोणताही 1 उपाय केल्यास पूर्ण होऊ शकते विदेश यात्रेची इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतांश लोक विदेशात जाण्याचे स्वप्न बघतात परंतु काही लोकांचेच हे स्वप्न पूर्ण होते. ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीतील काही खास योगावरून व्यक्ती विदेश यात्रा करू शकणार की नाही हे समजू शकते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, विशेष यात्रेशी संबंधित कुंडलीतील काही खास योग आणि चमत्कारी उपाय...


> कुंडलीतील बाराव्या स्थानावरून एखाद्या व्यक्तीला विदेश यात्रेचे योग आहेत की नाही हे समजू शकते. योग असल्यास तो कधी विदेशात जाणार हेसुद्धा समजू शकते.


> कुंडलीतील बारावे स्थान शुभ असल्यास व्यक्ती धन कमावण्यासाठी विदेश यात्रा करू शकतो. 12 वे स्थान बलशाली असल्यास व्यक्ती उत्पन्न आणि खर्च याचा योग्य ताळमेळ बसवू शकतो.


> कुंडलीतील बारावे स्थान कमजोर असल्यास व्यक्ती सहजपणे जॉब प्राप्त करू शकत नाही, जॉब मिळाला तरी यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात.


> एखाद्या व्यक्तीला कुटुंबापासून दूर राहावे लागणार की नाही हेसुद्धा 12 व्या स्थानावरून समजू शकते.


> कुंडलीतील आठव्या स्थानाचा संबंध 12 व्या स्थानाशी असल्यास व्यक्ती विदेश यातर करतो.


विदेश यात्रेसाठी करू शकता हे उपाय 
> रोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. लक्षात लाल मिरचीचे दाणे टाकावेत. हा उपाय रोज करत राहावा. सूर्यदेवाकडे प्रार्थना कारवी. सूर्यदेव पूर्ण ब्रह्माण्डात भ्रमण करतात. यांच्या कृपेने भक्ताचे विदेश यात्रा स्वप्न पूर्ण होऊ शकते.


> दररोज हवेत उडत असलेल्या हनुमानाची पूजा करावी. हनुमानाच्या या स्वरूपाची पूजा केल्यास विदेश यात्रेमध्ये येत असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...