आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपतीचे स्वरूप आणि सुख-समृद्धीचे प्रतीक आहे स्वस्तिक, घरात या दिशेला काढावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू परंपरेमध्ये स्वस्तिकचे खास महत्त्व सांगण्यात आले आहे. हे एक शुभ चिन्ह असून श्रीगणेशाचे प्रतीक मानले जाते. घरामध्ये स्वस्तिकचे चिन्ह अवश्य असावे. घराबाहेर दरवाजावर किंवा दोन्ही बाजूला आणि घराच्या उत्तर-पूर्व दिशेला स्वस्तिक काढावे. शास्त्रामध्ये स्वस्तिक काढण्याची विधी आणि हे काढताना कोणती काळजी घ्यावी याविषयी सांगण्यात आहे आहे.


ज्योतिष शास्त्र आणि पुराणानुसार घरामध्ये स्वस्तिकचे चिन्ह अवश्य असावे. यामुळे घरात कधीही निगेटिव्ह एनर्जी निर्माण होत नाही. परंतु स्वस्तिक काढून त्याविषयी विसरून जाऊ नये. दररोज त्याकडे पाहणेही आवश्यक आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्याठिकाणी स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास त्याचा प्रभाव नष्ट होतो. यामुळे घरामध्ये स्वस्तिक काढताना आणि काढल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो.


अशाप्रकारे काढावे घराबाहेर आणि घरामध्ये स्वस्तिक
1 . घराच्या मेनगेटच्या दोन्ही बाजूला किनगाव गेटच्या वर मधोमध स्वस्तिक काढले जाऊ शकते.

2 . स्वस्तिक सामान्यतः बुधवार सकाळचे शुभ मुहूर्त (अमृत, शुभ)मध्ये काढावे.

3 . ज्या ठिकाणी स्वस्तिक काढायचे असेल ती जागा गायीच्या शेणाने सारवून घ्यावी.

4 . गायीचे शेण नसल्यास गंगाजलचे जागा धुवून घ्यावी.

5 . देवाच्या मंदिरात ठेवलेले कुंकू, गणपती किंवा हनुमानाच्या पूजेमध्ये वापरण्यात आलेला शेंदूर स्वस्तिकसाठी घेऊ शकता.

6 . स्वस्तिक रिंग फिंगरने काढावे. उजव्या हाताच्या रिंग फिंगरने स्वस्तिक चिन्ह काढावे.

7 . त्यावर तांदूळ आणि फुल अर्पण करावेत.

8 . ऊँ गं गणपतये मंत्र किंवा गणपती अथर्वशीर्षचा पाठ करावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या गोष्टींकडे द्यावे लक्ष...

बातम्या आणखी आहेत...