आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती प्रकारचे असते पंचक, यामध्ये कोणकोणती कामे करू नयेत, कोणते शुभ काम करावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदु धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी मुहुर्ताचा विचार केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार काही नक्षत्र स्वयंसिद्ध असतात. म्हणजेच या नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करणे चांगले ठरते. तर काही नक्षत्रांमध्ये ते वर्ज्य मानले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार पंचकमध्ये धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. धनिष्ठा सुरू झाल्यापासून रेवती नक्षत्र संपेपर्यंतच्या काळास पंचक म्हणतात. या वेळी 2 जुलैला सोमवारी सकाळी 08.54 पासून पंचक सुरु होईल जे 6 जुलै शुक्रवार रात्री 03.23 पर्यंत राहील. पंचकाची सूर्योदय तिथी सोमवार असल्यामुळे याला राज पंचक म्हटले जाईल. जाणून घ्या, किती प्रकारचे असते पंचक...


1. राज पंचक
सोमवारी सुरु होणार्‍या या पंचाकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावाने पाच दिवसांमध्ये सरकारी कामामध्ये यश प्राप्त होते. राज पंचकमध्ये संपत्तीशी संबंधित कार्य करणे शुभ राहते.


2. रोग पंचक
रविवारी सुरु होणार्‍या पंचकाला रोग पंचक म्हणतात. याच्या प्रभावाने हे पाच दिवस शारीरिक आणि मानसिक अडचणींचे राहतात. या पंचकमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य करू नये. प्रत्येक प्रकरच्या मंगलकार्यामध्ये हे पंचक अशुभ मानण्यात आले आहे.


3. अग्नि पंचक
मंगळवारी सुरु होणार्‍या या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट प्रकरण, वाद इ. गोष्टींचे निर्णय, स्वतःचा हक्क मिळवून देणारे काम केले जाऊ शकतात. या पंचकामध्ये अग्नीची भीती राहते. हे अशुभ आहे. या पंचकामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्माण कार्य, अवजार आणि मिशनरी कामांची सुरुवात अशुभ मानली गेली आहे. यामुळे नुकसान होऊ शकते.


4. मृत्यू पंचक
शनिवारी सुरु होणार्‍या या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. नावावरूनच लक्षात येथे की, अशुभ दिवसापासून सुरु होणारे हे पंचक मृत्यूसमान त्रासदायक ठरू शकते. या पाच दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे धाडसी काम करू नये. याच्या प्रभावाने वाद, दुखापत, दुर्घटना होण्याची शक्यता राहते.


5. चोर पंचक
शुक्रवारी सुरु होणार्‍या या पंचकाला चोर पंचक म्हणतात. शास्त्रानुसार या पंचाकात प्रवास करणे वर्ज्य मानले गेले आहे. या पंचकात देण्या-घेण्याचे, व्यापार आणि इतर कोणत्याही प्रकारचे सौदे करू नयेत. वर्ज्य सांगण्यात आलेले कार्य केल्यास धनहानी निश्चित आहे.
या व्यतिरिक्त बुधवार आणि गुरुवार या दिवशी सुरु होणार्‍या पंचकात येथे सांगण्यात आलेल्या सर्व गोष्टींचे पालन करणे आवश्यक मानण्यात आले आहे.


पुढे जाणून, घ्या कोणती पाच कामे या काळात करायला नको ते...

बातम्या आणखी आहेत...