Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi

शुक्रवार : खास काम करण्यापूर्वी वाचा काय लिहिले आहे तुमच्या राशीत

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 02, 2017, 07:34 AM IST

शुक्रवारचे ग्रह-तारे वज्र आणि ग्रहण योग तयार करत आहेत. या योगांचा अशुभ प्रभाव 12 पैकी सहा राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील.

 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  शुक्रवारचे ग्रह-तारे वज्र आणि ग्रहण योग तयार करत आहेत. या योगांचा अशुभ प्रभाव 12 पैकी सहा राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. यामुळे नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. धनहानी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे इतर सहा राशीच्या लोकांवर या योगांचा अशुभ प्रभाव कमी राहील.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...

 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मेष - आज इच्छापूर्तीचा दिवस असून हितशत्रूंवर सहजपणे मात करू शकाल. विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक मेहनतीस यश मिळेल. गृहिणींना कामाचा उरक राहील. शुभरंग : हिरवा, अंक- ४.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  वृषभ - आज तुमच्या आकर्षक पेहरावाने इतरांचे लक्ष वेधून घ्याल. उद्योग व्यवसायातील उद्दिष्टे सहज गाठू शकाल. गृहिणींना पैशाचे नियोजन कामी येईल. शुभरंग: क्रीम, अंक- ३. 
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मिथुन - किरकोळ घर दुरुस्तीच्या कामात लक्ष घालावे लागेल. आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. वाद टाळा. शुभरंग : स्ट्रॉबेरी, अंक- ६.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कर्क - दिवस अनुकूल असल्याचा फायदा घेऊन महत्त्वाची कामे उरकूनच टाका. आज आवक पुरेशी असेल. लहान भावाशी काही मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभरंग :चंदेरी, अंक- ५.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  सिंह - व्यपारी वर्गास अनुकूल दिवस असून समोरची व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. गोड बोलून स्वार्थ साधाल. विवाहविषयक बोलणी यशस्वी होतील. शुभरंग : केशरी, अंक-८.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कन्या - दुकानदारांनी आज रोख उद्या उधार अशी पाटी लवावी. आज भविष्यकाळाच्या दृष्टीने केलेली एखादी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. खर्चावर ताबा गरजेचा. शुभरंग : निळा, अंक-६.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  तूळ - व्यवसायात उलाढाली वेग घेतील. आज विविध मार्गांनी आर्थिक उन्नत्ती होईल. काही दुरावलेली मित्रमंडळी जवळ येतील. आज प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. शुभरंग : मोतिया, अंक- ५.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  वृश्चिक - आज प्रामाणिक मेहनत सकारात्मकतेने अशक्य कामेही शक्य होतील. आज तुम्ही वादविवादात आपल्या मताशी ठाम असाल. अधिकार वापरावे लागतील. शुभरंग : पिवळा, अंक-२.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  धनू - कार्यक्षेत्रातस तर्कतेने पावले उचलायला हवीत. सरकारी नियमांचे उल्लंघन महागात पडेल. प्रामाणिक कष्टांस दैवाची साथ मिळेलच. दानधर्म कराल. शुभरंग : गुलाबी, अंक-१.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मकर - जमा खर्चाचा तराजू डळमळीत झालेला असताना पैशाचे व्यवहार जपून करावेत. जोडीदारास काही लाभ होण्याची शक्यता आहे. वाहनाच्या वेगावर ताबा ठेवा. शुभरंग : जांभळा, अंक-२.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कुंभ - वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असून काही जुन्या स्मृतींना उजाळा द्याल. मुलेही आज्ञेत वागतील. इतरांच्या भांडणात मध्यस्थी कराल. शुभरंग : सोनेरी, अंक-७.
 • Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मीन - येणी वसूल झाल्याने नव्या व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. प्रकृतीच्या बाबतीत मात्र तुटेपर्यंत ताणून चालणार नाही. बेरोेजगारांची भटकंती थांबेल. शुभरंग : पिवळा, अंक-९

Trending