Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi

2 शुभ योग : नष्ट होतील अडचणी, 8 राशींसाठी खास राहील शुक्रवार

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 09, 2017, 07:49 AM IST

शुक्रवारचे ग्रह-तारे चर आणि सध्या नावाचे दोन शुभ योग तयार करत आहेत. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस फायदा करून देणारा राहील.

 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  शुक्रवारचे ग्रह-तारे चर आणि सध्या नावाचे दोन शुभ योग तयार करत आहेत. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस फायदा करून देणारा राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी नष्ट होऊ शकतात. पैशांचे टेंशन संपेल. ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे वरिष्ठांची मदत मिळेल. डेअरी उद्योग, पाण्याशी संबंधित व्यवसाय, दूरसंचार, सेना, डॉक्टर, वस्त्रभूषण आणि दगडाचे काम करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल.

  पुढील स्लाईड्सवर वाचा शुक्रवारचे संपूर्ण राशीफळ...

 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  मेष - आज जे कराल ते तब्येतीस जपूनच करा. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. विवाह जुळवण्याविषयी बोलणी आज नकोत. वाहन जपुन चालवा. शुभ रंग : हिरवा, अंक-6.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  वृषभ - मनोबल वाढेल. नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवनांत सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम साथ देईल. मुले शहाण्यासारखी वागतील. शुभ रंग : जांभळा, अंक-९.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  मिथुन - ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. उष्णतेचे विकार त्रास देणार आहेत. वादविवादात मात्र आज तुमची बाजू वरचढ राहील. शुभ रंग : लाल, अंक-3.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  कर्क - व्यवसायात उलाढाल वाढेल. शेअर्स व्यवहारात तुमचे अंदाज अचूक ठरतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर मनाजोगती संधी चालून येईल. शुभ रंग : क्रिम, अंक-2.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  सिंह - राहत्या जागेविषयी प्रश्न सुटतील. आज बांधकाम व्यवसायातील मंडळींसाठी विशेष अनुकूल दिवस. मुलांचे हट्ट पुरवताना नाकी नऊ येणार आहेत. शुभ रंग : मोतिया, अंक-4.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  कन्या - आज काही मनासारख्या घटना घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. लहान भावाकडून एखादी सुवार्ता येईल. आईचे मन दुखाऊ नका. शुभ रंग : मोरपंखी, अंक-८.  
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  तूळ - आर्थिक आवक मनासारखी असून नोकरीतही समाधानकारक स्थिती राहील. खर्च झाला तरी योग्य कारणासाठी होईल. मित्रांचे चांगले सहकार्य राहील. शुभ रंग : आकाशी, अंक-५.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  वृश्चिक - आज तुम्ही काहीसे लहरीपणे वागाल. आपलेच घोडे पुढे दामटवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. तुमच्या अती स्पष्ट बोलण्याने आपलीच माणसे दुखावली जातील.  शुभ रंग : मोरपंखी, अंक-2.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  धनू - आज खर्च प्रमाणाबाहेर जाणार आहे. वडीलधाऱ्या मंडळींचे हट्ट पुरवावे लागतील. ज्येष्ठांचे अध्यात्मात मन रमेल. मित्र आज तुमच्या हिताचेच सल्ले देतील. शुभ रंग : राखाडी, अंक-6.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  मकर - पूर्णपणे अनुकूल दिवस असून आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करुन दाखवाल. दूरावलेली नाती जवळ येतील. गृहीणी आज स्वत:साठी आवर्जुन वेळ काढतील. शुभ रंग : भगवा, अंक-7.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  कुंभ - आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. तुमची कामातील निष्ठा पाहून वरीष्ठ खूष होतील. आज तुम्हाला कुटुंबासाठी वेळ देणे मात्र अवघड होईल. शुभ रंग : पांढरा, अंक-5.
 • Friday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  मीन - नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच उलाढाली कराव्यात. शासकीय कामात अनेक अडचणी येतील. संयम महत्वाचा राहील. शुभ रंग : अबोली, अंक- 1.

Trending