Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal

बदलणार गुरुची चाल, 12 राशींवर असा राहील शुभ-अशुभ प्रभाव

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 08, 2017, 03:46 PM IST

मागील चार महिन्यांपासून कन्या राशीमध्ये वक्री (तिरकी चाल) चालत असलेला गुरु ग्रह 9 जूनला मार्गी (सरळ चाल) होईल.

 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  मागील चार महिन्यांपासून कन्या राशीमध्ये वक्री (तिरकी चाल) चालत असलेला गुरु ग्रह 9 जूनला मार्गी (सरळ चाल) होईल. यानंतर 12 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून तूळ राशीत जाईल. गुरूने चाल बदलल्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. नोकरी, बिझनेस, संपत्ती, आरोग्य, वैवाहिक जिंव्हा आणि लव्ह-लाईफसाठी काही लोकांना हा काळ चांगला राहील तर काहीसांठी अडचणींचा ठरेल. गुरु ग्रह धर्मस्थळ, राजकारण, बँक, मौल्यवान धातू-रत्न, न्याय, मंत्रिपद, दान-पुण्य इ. गोष्टींमध्ये कारक ग्रह आहे. गुरूने रास बदलल्यामुळे या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडू शकतात. खगोलशास्त्र आणि ज्योतिष विद्येमध्ये लोकांची रुची वाढू शकते.

  पहिली स्लाईड : तुमच्या नोकरी आणि बिझनेसवर कसा राहील प्रभाव.
  दुसरी स्लाईड : पैसा आणि प्रॉपर्टीसाठी कसा राहील काळ.
  तिसरी स्लाईड : वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफमध्ये होतील हे बदल.
  चौथी स्लाईड : तुमच्या आरोग्यावर कसा राहील प्रभाव.

  पाचव्या स्लाईड्सपासून वाचा, 12 राशींचे पूर्ण राशीफळ आणि उपाय....

 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  नोकरी आणि बिझनेससाठी काहीसा असा राहील काळ
  गुरूने रास बदलल्यामुळे नोकरी आणि बिझनेसवर याचा विशेष प्रभाव पडतो. बँकिंग सेक्टर, राजकारण, शिक्षण, धर्म, न्याय विभाग इ. क्षेत्राशी संबधित लोकांच्या आयुष्यात विशेष बदल घडण्याचे योग आहेत. तुमची करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहाल, जॉब बदलण्याची इच्छा असल्यास काही लोकांसाठी हा काळ चांगला आहे. रिसर्च, इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि टिचिंग फिल्डशी संबंधित लोकांसाठी हा काळ चॅनल आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांनी योजना आणि रणनीती आखून काम केल्यास यश प्राप्त करू शकतात.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  पैसा आणि प्रॉपर्टीसाठी कसा राहील हा काळ
  कन्या राशीमध्ये गुरु मार्गी झाल्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे शुभ राहील. गुरूच्या प्रभावाने सेविहंग वाढू शकते. राशीनुसार तुमच्यासाठी विमा, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी किंवा इतर गोष्टींमध्ये पैसा गुंतवणे फायद्याचे ठरू शकते. या काळात तुम्ही व्यर्थ खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. पैसा आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला नवीन माहिती मिळू शकते.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  दाम्पत्य आणि प्रेम संबंध
  नवीन लोकांच्या ओळखी होण्याचे योग जुळून येत आहेत. एखाद्या खास व्यक्तीमुळे तुम्ही तुमच्या सवयी आणि विचारांमध्ये बदल करू शकता. लाईफ पार्टनर किंवा लव्हरशी संबंधित तुम्ही एखादा ठोस निर्णय घेऊ शकता. काही लोक स्वतःची जबाबदारी, समाज आणि कर्तव्याकडे पाहून लव्ह लाईफमध्ये मोठा निर्णय घेऊ शकतात. काही वैवाहिक लोक आपल्या संबंधामध्ये धर्म, अध्यात्म आणि नीतीनुसार बदल करू शकतात. काही अविवाहित लोकांचे लग्न या काळात जुळू शकतात.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  आरोग्य 
  कन्या राशीमध्ये गुरु मार्गी झाल्यामुळे काही लोकांना पोटाचे आजार त्रस्त करू शकतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे काही लोक लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात. गुरूच्या प्रभावामुळे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आणि कावीळ रोग होण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. किडनीच्या रुग्णांनी या काळात सांभाळून राहावे. श्वसन तंत्र आणि गळ्याचे रोग त्रासदायक ठरू शकतात. गुरूच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी काही लोकांनी प्राणायाम, आयुर्वेद, योग यासारख्या वैदिक आणि प्राचीन पद्धतींचा वापर करावा.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  मेष : या दिवसांमध्ये प्रवासाचे योग जुळून येत आहेत. लिव्हर, किडनीचे आजार होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहील. प्रगतीचे योग जुळून येत आहेत. या दिवसांमध्ये कर्ज घेण्यापासून दूर राहावे. वादापासून दूर राहावे, परंतु वाद-विवाद पाठ सोडत नसल्यास घाबरू नका. या काळात तुमचा पराक्रमही वाढू शकतो. विरोधकांशी संघर्ष करण्याची ताकद वाढेल. आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी ठीक राहील.

  उपाय : पिवळे कपडे आणि चंदनाचे दान करावे.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  वृषभ : गुरुची सरळ चाल तुमच्यासाठी विविध गोष्टींमध्ये चांगली ठरेल. या दिवसांमध्ये तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग जुळून येत आहेत. एखादी मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. बिझनेसमध्ये पैसा मिळू शकतो. फायद्याची स्थिती जुळून येत आहे. नोकरदार लोकांना एखाद्या प्रकारचा धनलाभ होऊ शकतो. पोट आणि पायाचे आजार होण्याची शक्यता आहे. कोणाच्याही वादामध्ये अडकू नका, यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते. अपत्य आणि शिक्षणाशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होईल.

  उपाय : केळीच्या झाडाची पूजा करावी.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  मिथुन : या दिवसांमध्ये प्रॉपर्टी आणि नवीन गाडी खरेदी करण्याचे योग जुळून येत आहेत. नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. मोठे तुमच्या कामावर खुश होऊ शकतात. लाईफ पार्टनरच्या धनामध्ये वृद्धी होऊ शकते. धार्मिक कामामध्ये मन लागेल. पैसा येईल. अविवाहित लोकांची लव्ह लाईफ मजबूत होईल. आरोग्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये काही बदल करण्याची इच्छा असल्यास हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या मान-सन्मानामध्ये वाढ होईल.

  उपाय : मंदिरात हरभरा डाळ दान करा.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  कर्क : मार्गी गुरूमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. लोकांशी चांगले संबध टिकवून ठेवा. प्रॉपर्टीचे महत्त्वपूर्ण काम समोर येऊ शकते. या संदर्भात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत वाद होण्याचे योग जुळून येत आहेत. धार्मिक कामामध्ये खर्च होऊ शकतो. विवाहित लोकांच्या जीवनातील प्रेम वाढेल. काही कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घेऊनच प्रवास करावा.

  उपाय : देवी दुर्गाची पूजा करावी. मुलींना मिठाई आणि फळ दान करावेत.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  सिंह : धनलाभ होईल परंतु सेव्हिंग होऊ शकणार नाही. खर्चही वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. डोळे आणि दाताचे रोग होऊ शकतात. अपत्य सुख मिळेल किंवा एखादे अपत्य होईल. मंगलकार्य होतील. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा अन्यथा पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहू शकते. अचानक धनलाभाचे योग आहेत. अडकलेला पैसा मिळेल. कुटुंब आणि एक्स्ट्रॉ इनकमच्या साधनांवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.

  उपाय : पिवळ्या कपड्यामध्ये हळकुंड बांधून मंदिरात दान द्यावे.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  कन्या : मार्गी गुरूमुळे तुमचे उत्पन्न वाढण्याचे योग जुळून येत आहेत. कोणावरही डोळे बंद घेऊन विश्वास ठेवू नये. घरामध्ये एखादे मंगलकार्य घडू शकते. मित्र आणि बहीण-भावंडांकडून तुम्हाला मदत मिळू शकते. लाईफ पार्टनरसोबतचे संबंध मधुर राहतील. या काळामध्ये मानसिक तणाव कमी होण्याचेही योग आहेत. गुरु ग्रहामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. कार्यक्षेत्रामध्ये पदोन्नती आणि बिझनेसमध्ये फायदा होण्याचे योग आहेत.

  उपाय : गाईची सेवा करावी. शक्य असल्यास पिवळ्या रंगाच्या गाईला हळद लावलेली पोळी खाऊ घालावी. 
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  तुळ - आत्मविश्वास कमी होईल. व्यर्थ कामांमध्ये टाइम वेस्ट होऊ शकतो. एक्स्ट्रा मेरिटल अफेयर ओपन होऊ शकतात. सोबतच्या लोकांसोबत वाद होण्याचे योग आहेत. मित्र आणि भाऊ-बहिणींचा सहयोग मिळेल. शत्रू त्रास देतील. कामाच्या ठिकाणी तुमचा परफॉर्मेंस चांगला नसल्यामुळे टेंशन होऊ शकते. काही लोक तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील. जास्त धाव-पळ होईल. शेजा-यांशी चांगले संबंध ठेवा. व्यर्थ खर्चावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा.

  उपाय : गुरु आणि साधूची सेवा करणे शुभ राहील.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  वृश्चिक - गुरुची सरळ चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जास्तीत जास्त गोष्टींमध्ये शुभ असेल. आर्थिक बाबतीत परिस्थिती तुमच्या फेव्हरमध्ये होऊ शकते. इनकम सोर्स मिळतील. एक्स्ट्रा इनकम होण्याचे योग जुळत आहेत. आपल्या शिक्षणाविषयी विचार करत असाल तर यश मिळू शकते. आपत्यासाठी काही करण्याचा विचार करत असाल तर सफलता मिळण्याचे योग आहेत. पॉझिटिव्ह होऊन जगला तर फायदा होईल. विवाह योग्य लोकांचा प्रेम विवाह होण्याचे योग आहेत. घरात मंगल कार्य होण्याचे योग आहेत. बिझनेसमध्ये मोठी गुंतवणूक करु शकता. खर्चावर कंट्रोल ठेवा. फॅमिली लाइफ चांगली होईल. समाजिक स्तराव भेटीगाठी वाढतील. सोबत काम करणा-या लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करु शकता. न्यायालय प्रकरणांमध्ये जिंकण्याचे योग आहेत. 

  उपाय - पिंपळाला जल अर्पण करा.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  धनु 
  धनु राशीचे लोक प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतील. याचा चांगला परिणाम होईल. बिझनेस करणा-या लोकांसाठी वेळ चांगली आहे. आपले काम वाढवण्याचा विचार करत असाल तर यश मिळू शकते. बिझनेस आणि नोकरीसंबंधीत प्रवासात यश मिळण्याचे योग आहेत. मान-सन्मान मिळेल. कौंटूबिक जीवनात सकारात्मकता येईल. जास्तीत जास्त प्रकरण तुमच्या फेव्हरमध्ये असू शकतात. वाहन, भूमि आणि घराच्या बाबती सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. काही बाबतीत परिक्षांचा काळ असू शकतो. लव्ह लाइफमध्ये थोड्याश्या अडचणी येऊ शकतात. अधर्मापासून दूर राहून धार्मिक काम करा. कोणाविषयी वाईट विचार करु नका. स्वतःवर कंट्रोल ठेवा. नियोजित केलेले जास्तीत जास्त काम पुर्ण होतील. नोकरीमध्ये पदोन्नती आणि स्थान परिवर्तनाची शक्यता आहे.

  उपाय : मंदिरात बदामाचे दान करा.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  मकर - गुरुच्या सरळ चालीमुळे काही गोष्टींमध्ये तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल यासोबत काही वेळी विनाकारण धावपळ होऊ शकते. नोकरीमध्ये पदोन्नतिचे योग आहेत. विदेश आणि तीर्थ यात्रा होऊ शकते. धार्मिक कामात मन लागेल. एखाद्या धार्मिक किंवा समाजिक क्षेत्रात मोठ्या लोकांसोबत तुमचा संबंध येईल. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. सोबत काम करणा-या लोकांसोबत चांगले संबंध ठेवा. वेळ आल्यावर मदत मिळेल. सोबत काम करणा-या लोकांच्या मदतीमुळे अनेक महत्त्वपुर्ण काम पुर्ण होतील. काम वासनेमुळे मानसिक उत्तेजना वाढेल. इंद्रिय वशमध्ये ठेवा. वयक्तीक आयुष्य सामान्य राहिल. बिझनेस करणा-या लोकांनी जास्त मेहनत केल्यास यश अवश्य मिळेल.

  उपाय - व्यसनांपासून दूर राहा. विष्णु किंवा कृष्ण मंदिराचे शिखर दर्शन करा. फायदा होईल.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  कुंभ - आर्थिक कामांमध्ये सावध राहा. मोठी गुंतवणूक करणे टाळा, तसेच अचानक धनलाभही होऊ शकतात. खर्चानुसार इनकम खुप कमी असू शकते. नात्यांमध्ये अहंकार आणू नका यामुळे अडचणी वाढू शकतात. वैवाहिक जीवनात तनाव वाढू शकतो. जीवनसाथीसोबत वाद करणे टाळावे. कुटूंबाच्या लोकांसोबत वाद होण्याचे योग आहेत. या काळात एखादी रहस्यमयी गोष्टी किंवा विद्येविषयी माहिती मिळू शकते. पुजापाठ करण्यात मन लागू शकते. नोकरी आणि बिझनेस करणा-या लोकांचा परफॉर्मेंस चांगला असू शकतो. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. मनात अनामिक भिती राहिल. आरोग्यात चढ-उतार येतील.

  उपाय - चंदन आणि केशरचा तिळा लावा.
 • Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal
  मीन - कार्यक्षेत्रासाठी हा काळ मीन राशीच्या लोकांच्या फेव्हरमध्ये असेल. तुमची नियोजित कामे आणि इच्छा पुर्ण होतील. नोकरी आणि बिझनेसमध्ये तुमची वेळ चांगली आहे. नवीन काम सुरु करण्यासाठी काळ चांगला आहे. विवाह योग्य लोकांचे विवाह होण्याचे योग आहेत. प्रेम संबंधांमध्ये मधुरता राहिल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखी राहिल. कोणाविषयी त्यांच्यामागे वाईट बोलू नका. स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल करण्याचे प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. लाइफ पार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड कराल. बिझनेसमध्ये मोठे फायदे होऊ शकतात. घरात विवाह आणि मंगल कार्य होतील. 

  उपाय - विष्णु, कृष्ण किंवा कोणत्याही राम मंदिरात पिवळा ध्वज लावा किंवा दान करा.

Trending