आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 वर्षांनंतर जुळून येत आहे खास योग, शनिदेव बदलू शकतात तुमचे भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

18 नोव्हेंबरला शनी अमावास्येच्या दिवशी 30 वर्षांनंतर शोभन योग जुळून येत आहे. हा योग दान-पुण्यपासून ते बाजार खरेदी, नवीन कार्याच्या प्रारंभासाठी शुभ राहील. या दिवशी शनीसोबतच बुध-चंद्राची युती शेती आणि व्यापारात वृद्धीचे संकेत देत आहे. 


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार शनिवार (18 नोव्हेंबर)ला विशाल नक्षत्रामध्ये शोभन योग राहील. यापूर्वी शनी अमावास्येला 1987 मध्ये हा योग जुळून आला होता. सध्या शनी धनु राशीत मार्गी आहे. या काळात वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. वृषभ आणि कन्या राशीवर ढय्याचा प्रभाव राहील.


शोभन योग खास का?
आनंद आदी 27 योगांमध्ये शोभन नावाचा एक योग आहे. हा योग शनिवारी असल्यास या दिवसाच्या तिथी आणि नक्षत्राचा प्रभाव दुपटीने वाढतो. यासोबतच तिथीमध्ये इतर कोणता दोष असल्यास तोही या योगामध्ये समाप्त होतो. यामुळे शोभन नावाचा हा योग शनिवारचे महत्त्व अधिक वाढवत आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...