मंगळवारी हनुमानाचे विशेष उपाय केल्यास कुंडलीतील ग्रहदोष दूर होऊ शकतात तसेच धन संबंधित कामामध्ये येणारे अडथळे दूर होऊन गरिबी दूर होते. हनुमान महादेवाचे अवतार आहेत. यामुळे हनुमानाच्या कृपेने महादेव, महालक्ष्मी आणि सर्व देवी-देवता प्रसन्न होऊ शकतात.
श्री रामदूत हनुमान पूजेचा विधी
सर्वप्रथम गणेश पूजन करावे. श्रीगणेशाला अभिषेक करून वस्त्र, गंध, फुलं, अक्षता अर्पण कराव्यात. त्यानंतर बजरंगबलीची पूजा करावी. महावीर हनुमानाला पहिले जल अर्पण करावे त्यानंतर पंचामृत आणि पुन्हा जल. त्यानंतर वस्त्र अर्पण करून आभूषण घालावेत. त्यानतणार फुलांचा हार घालावा. तूप किंवा तेलाचा दिवा लावावा. आरती करावी. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा. पूजा करताना शांत मनाने ऊँ ऐं हनुमते रामदूताय नमः मंत्राचा जप करत राहावे.
पुढे जाणून घ्या, मंगळवारी करण्यात येणारे हनुमानाचे इतर काही खास उपाय...