Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017

या महिन्यात 5 मोठ्या ग्रहांची बदलणार चाल, 6 राशीच्या लोकांना होईल धनलाभ

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 01, 2017, 09:42 AM IST

या महिन्यात सूर्य, बुध, शुक्र, शनि राशी बदलतील आणि गुरुची वक्री चाल सरळ होईल. यामुळे मेष, सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीचे लोक विविध गोष्टींमध्ये लकी राहतील.

 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  या महिन्यात सूर्य, बुध, शुक्र, शनि राशी बदलतील आणि गुरुची वक्री चाल सरळ होईल. यामुळे मेष, सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीचे लोक विविध गोष्टींमध्ये लकी राहतील. या लोकांचे इनकम आणि सेव्हिंग वाढू शकते. नोकरती प्रमोशनच्या योगासोबतच बिझनेसमध्ये मोठे फायदे होऊ शकतात. लव्ह-लाईफ आणि आरोग्यासाठी हा काळ चांगला राहील. या व्यतिरिक्त वृषभ, मिथुन, कर्क, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांनी या महिन्यात सांभाळून राहावे. या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या व्यतिरिक्त मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी महिना संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर वाचा संपूर्ण राशीफळ आणि केव्हा काय घडणार तुमच्यासोबत...

 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  मेष 
  आर्थिक समस्यांमुळे मन अशांत राहील. आरोग्याची काळजी घेण्याबाबत केलेली छोटीशी चूकही महागात पडू शकते. जमीन व्यवहारात काही काळासाठी गुंतवणूक करू नका. परदेशात जाण्यास इच्छुक असाल तर आणखी प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. सावधगिरीने घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतात. देण्या-घेण्याच्या व्यवहारात कुटुंब आणि नातेवाइकांकडून सल्ला घ्यायला विसरू नका. आरोग्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. निकटवर्तीयांसोबत सुरू असलेले तणाव कमी हाेतील. मित्र आणि शेजाऱ्यांसोबतचे संबंध मधुर होतील.
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  वृषभ
  सामाजिकतेत वाढ होईल. स्पर्धा परीक्षेद्वारे नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या परिचिताच्या माध्यमातून तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठा बदल येऊ शकतो. जमा असलेले धन काळजीपूर्वक वापरा. व्यापारात काही विदेशी कामे मिळू शकतात.   त्रासदायक ठरणारी आरोग्यविषयक समस्या येणार नाही. थोडा आळस राहील. यामुळे तुमच्या दिनचर्येवर परिणाम होईल.  बहीण-भावांसमवेत अधिकाधिक चांगला वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने सर्वांशीच संबंध चांगले राहतील. ज्येष्ठांचा अाशीर्वाद मिळेल. मित्रांसमवेत वैचारिक मतभेद होऊ शकतात. 
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  मिथुन
  तुम्हाला एक संधी मिळेल. त्यामुळे आपले विचार सकारात्मक पद्धतीने तुम्ही उपयोगात आणू शकाल. त्यामुळे तुम्हाला स्वत:ला समजून घेता येईल. आपल्या काही योजनाही कार्यान्वित करू शकाल. दरम्यान काही मोठी माणसे तुमच्या कामात सहकार्यासाठी हात पुढे करतील. काही मित्र जोडले जातील. मित्रांसमवेत फिरायला जाण्याचाही योग आहे. जीवनसाथीबरोबर मधुर संबंध असतील. मुलांकडून काही शुभ समाचार मिळू शकतो. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मात्र, पदोन्नतीसाठी अजून वाटच बघावी लागणार, असे दिसते. कर्ज म्हणून दिलेले पैसे परत घेताना कसरत कराल. व्यवसायासाठी कर्ज घ्यायच्या विचारात असाल तर यशस्वी व्हाल.
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  कर्क 
  सध्याची नोकरी, व्यवसायात अडचणी येतील. परंतु, आपण त्यांचा केवळ चांगला सामना करणार नाही तर त्यांचे निराकरणही कराल. जर विदेशात जाण्यास इच्छुक असाल तर विदेशात नोकरी, व्यवसायाच्या शोधमोहिमेत गती आणा. यश मिळेल. आर्थिक विषयांबाबत सावधानता बाळगावी लागेल. कौटुंबिक जीवन थोडे कष्टदायी असेल. भाऊ-बहिणीत ताळमेळ बसविण्यात अडचण येऊ शकते. पत्नीबरोबर वाद-विवाद होऊ शकतात. त्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आपण रागावर नियंत्रण मिळविल्यास घरात सुख व शांती नांदेल. 
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  सिंह
  ज्या व्यक्ती कला क्षेेत्रात स्वत:ला सिद्ध करू इच्छितात त्यांनी त्यांच्या प्रयत्नांमध्ये असलेल्या उणिवा शाेधून त्यावर मात करणे 
  गरजेचे अाहे. मधूनमधून काही अडचणींचाही सामना करावा लागू शकताे. मात्र, अापल्या प्रगतीत त्याची काही अाडकाठी येणार नाही. 
  अापला प्रियकर/प्रेयसीच अापला जीवनसाथी हाेऊ शकताे. जीवनसाथीबराेबर काही वाद असतील तर माेकळेपणाने चर्चा करून ते साेडवा. व्यवसायात अापले भागीदार अापल्यावरच फसवणुकीचा अाराेप लावण्याची शक्यता अाहे. प्रकृती जास्त तणावामुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकताे. जेवणावर विशेष लक्ष ठेवा नाही तर वजन वाढण्याचा अाजार बळावू शकताे.
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  कन्या
  विरुद्धलिंगी व्यक्ती आकर्षित होतील आणि नवे प्रेमसंबंधही निर्माण होऊ शकतात. परिस्थिती बदलत असल्याने ही बाब तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर, हा कालावधी अनुकूल आहे. तुमच्या नि:पक्ष आणि संतुलित स्वभावामुळे लोक स्वतःच्या समस्यांवर चर्चा करतील आणि त्याचे उपायदेखील त्यांना मिळतील. अविवाहित व्यक्तींसाठी चांगले स्थळ येऊ शकते. मोठे आर्थिक निर्णय घेताना कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याचा सल्ला घ्या. निर्धारित केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही अडथळे पार करावे लागतील. 
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  तूळ 
  गरजेपेक्षा जास्त धावपळ करावी लागेल. आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक तितके पाठबळ निश्चित मिळेल. व्यवसायात अधिक आव्हाने समोर येऊ शकतात. परंतु, आपल्याला त्याचा अधिक त्रास होणार नाही. कुटुंबातील ज्येष्ठांच्या तब्येतीमुळे चिंता वाढेल.  
  उत्पन्नाच्या तुलनेत खर्चावर नियंत्रण ठेवल्यास गुंतवणूकही होईल. आप्तस्वकीय आपल्याकडून पैसे उधार घेऊ शकतात.शेअर बाजारात लाभ होईल, असे योग आहेत. मनोरंजनावरही खर्च होऊ शकतो. मनात एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम भावना असल्यास ती लपवून ठेवू नका. व्यक्त करा, नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. 
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  वृश्चिक 
  जे लोक सृजनशील क्षेत्राशी जुडलेले अाहेत, त्यांनी कल्पनाशक्तीचा अधिकाधिक प्रयोग केल्यास अधिक लाभ शक्य. वेळेवर काम करण्यात समस्या येतील. अाेव्हरटाइम करावा लागेल. जवळच्या लाेकांच्या भेटी शक्य. तुम्ही ज्या कामात हात टाकाल त्या कामात सफलता प्राप्त होईल. यंदा तुम्ही आळस टाळा, मेहनत करा अाणि त्याचा दुप्पट लाभ प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. सर्व प्रकारच्या गंुतवणुकीत चांगला फायदा होईल. पगार वाढीचा याेग अाहे. भागीदारीत काही कामे करीत असल्यास फायदा होईल. कार्यवश विदेश यात्रा संभव. नात्यात उतार-चढाव राहतील. परंतु त्यामुळे नुकसान मात्र हाेणार नाही. तुमचा स्वभाव इतरांची मने जिंकण्यात पुन्हा एकदा मदत करेल.
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  धनू
  येत्या काळात तुमच्यासमाेर अशी अाव्हाने येतील, जी पार करताना तुम्हाला पराक्रमाबराेबर धैर्य अाणि संयमाने काम करावे लागेल. एक छाेट्या पिकनिकसाठी तुम्ही अनेक दिवसांपासून याेजना करत हाेते, ती पूर्ण हाेईल. मित्रांचा उत्साह अाणि परिवारातील सदस्य त्याला यशस्वी करतील. स्वत:चे मानसिक संतुलन सांभाळून ठेवा, नाहीतर शारीरिक कष्ट हाेण्याची शक्यता अाहे.  वाहनाच्या खरेदीत थाेडा खर्च हाेऊ शकताे. परिवारात मांगलिक कार्य हाेण्याची शक्यता अाहे. जुने मित्र अचानक भेटतील. भाऊ-बहिणीचे संबंध चांगले राहतील.
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  मकर 
  या महिन्यात आपल्याला दोन वेगवेगळ्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. तुमच्याकडे नोकरी तर राहील मात्र त्यातून अपेक्षित लाभ मात्र होणार नाही. नोकरीमध्ये विराेधक द्वेष करून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील, मात्र सावधगिरीमुळे त्यांचे सर्व प्रयत्न हे अयशस्वी होणार आहेत. लवकरच तुमचे इच्छित कार्य पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत पैशाची आवक चांगली राहील, मात्र खर्चावर नियंत्रण आणणे कठीण जाणार आहे. जेथे गरज असेल तिथेच खर्च व्हावा, असा प्रयत्न करा. काही नवीन कार्यासाठी कर्ज घेण्याची गरज पडू शकते. 
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  कुंभ
  यावेळी अनेक कार्य व योजना आपल्या मनात गतीने येत व जात राहतील. अनेकदा ठरवण्यामध्ये समस्या राहील. खरोखरच आपण काय मिळवू इच्छिता? आर्थिक, भावनात्ती अनुकूल न राहिल्यास सामान्यतः निर्णय घेण्याची क्षमता ही अस्त-व्यस्त होत राहील. संयमाने काम करा. मानसिक तणाव काही काळासाठी राहू शकतो. परिवारात चांगले कार्य होऊ शकते, ज्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. आपणास जीवनसाथी व मुलांसोबत वेळ घालवण्याची पूर्ण संधी मिळेल. 
 • monthly horoscope rashifal of 1st june to 30th june 2017
  मीन
  आपण संभ्रमात राहणार, की ही संपत्ती खरेदी करण्यासाठी चांगली वेळ आहे आणि नाही, परंतु लवकरच आपलेे कार्य बनेल. एखादा नवीन रोमांटिक व्यक्ती जीवनात काही बदल घडवून आणेल. आणि जीवन प्रकाशमान होईल. दूरचा प्रवास लाभदायक ठरेल. जास्तीत जास्त प्रकरणात सखोल समजदारी आणि तर्क दीर्घकाळ चालतील. स्वास्थ्य चांगले राहील आणि ऊर्जेचा स्तर उंचावेल.  दीर्घ काळापासून असलेल्या आजारापासून मुक्ती मिळेल.

Trending