Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi

शनिवार : नोकरी आणि बिझनेसमध्ये लकी राहतील या 8 राशीचे लोक

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 03, 2017, 12:27 AM IST

शनिवारी उत्पात नावाचा अशुभ योग राहील, परंतु गुरु-चंद्राच्या जोडीमुळे राजयोग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होईल.

  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    शनिवारी उत्पात नावाचा अशुभ योग राहील, परंतु गुरु-चंद्राच्या जोडीमुळे राजयोग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होईल. यामुळे नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या 12 पसिकी 8 राशीच्या लोकांना फायदा होईल . उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे शेअर बाजार, चिकित्सा, वाणिज्य आणि विनिमय संबंधित कामामध्ये फायदा होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.

    पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राहिला कसा राहील शनिवार...
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    मेष - आज अनेक सुसंधी तुमचे दार ठोठावतील. आवक ठिकठाक राहील. काही प्रमाणात तत्वांशी तडजोड मात्र करावीच लागणार आहे. आनंदी दिवस.  शुभ रंग : निळा, अंक-४.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    वृषभ - आज फक्त आपलेच खरे करण्याचा तुमचा हट्ट राहील. आज जोडीदाराचा सल्ला मात्र डावलू नका. पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. शुभ रंग : भगवा, अंक-१.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    मिथुन - आप्तस्वकीयांसह आजचा दिवस अत्यंत मौजमजेत व्यतीत कराल.आर्थिक आघाडीवर सर्वकाही ठिकठाक राहील. मोठेपणा घेण्यासाठी खर्च कराल. शुभ रंग : मोतिया, अंक-३.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    कर्क - काही सुखद समाचार येतील सकाळपासूनच तुमचा मूड एकदम प्रसन्न असेल. आज घरात एखादी मौल्यवान खरेदी कराल. गृहसौख्याचा दिवस. शुभ रंग :पिवळा, अंक-९.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    सिंह - चांगल्या घटनांनी मनाची उमेद वाढेल. परदेशवारीची स्वप्ने पहात असाल तर त्यादृष्टीने अनुकून घटना घडतील. उच्चशिक्षणार्थींच्या महत्वाकांक्षा वाढतील. शुभ रंग: डाळिंबी, अंक-५.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    कन्या - उद्योग व्यवसायात धनाची वृध्दी होईल. खिसा गरम असल्याने मित्रमंडळींत तुमच्या शब्दाला मान राहील. प्रवासात काही हितसंबंध जुळतील. शुभ रंग :  मोरपंखी, अंक-8.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    तूळ - मोठया लोकांच्या ओळखी स्वार्थ साधून घेण्यासाठी कामी येतील. कुसंगतीने धनहानी संभवते. उधारी उसनवारीचे व्यवहार आज टाळलेले बरे. शुभ रंग : आकाशी, अंक-३.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    वृश्चिक - उगीच वाद घालण्यापेक्षा आज संयम व मधुर वाणीने विरोधकांना जिंकता येईल. आज काही भाग्यवान मंडळींना नवीन घराचा ताबा मिळू शकेल. शुभ रंग : सफेद, अंक-७.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    धनू - नोकरदारांच्या कामगिरीस वरीष्ठ दाद देतील. अधिकारी वर्गाने आपल्या कर्तव्यासही प्राधान्य देणे गरजेचे. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की आहे. शुभ रंग: मोतिया, अंक-2.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    मकर - सकारात्मक दृष्टीकोन  ठेवाल तर हाती घेतलेले उपक्रम हमखास यशस्वी होतील. अधिकाराचा वापर याेग्य वेळी कराल. जोडीदाराशी सूर जुळतील. शुभ रंग : जांभळा, अंक-६. 
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    कुंभ - एखादी मनाविरुध्द घटना घडल्याने चिडचिड होईल. प्रलोभने गोत्यात आणतील. जोडीदाराचे वर्चस्व मान्य करणे हिताचे राहील. आज कोणतीही रिस्क घेऊ नका. शुभ रंग : क्रिम, अंक-3.
  • Saturday 3 June 2017 daily horoscope in marathi
    मीन - दिवस थोडासा विरोधी राहील. काही प्रमाणात वरीष्ठांशी मतभेद संभवतात. वाढत्या जबाबदारीचा ताण येईल. सुरक्षिततेस महत्व देणे गरजेचे. शुभ रंग : हिरवा, अंक-९. 

Trending